Insurgency And Militancy

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतंय.

काश्मीर प्रश्न सतत खदखदत ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा याकडे वळविण्यासाठी पाकिस्तान काहीतरी भयंकर करेल. पाकिस्तानचे लाडके पंतप्रधान आणि लष्कर यांची झालेली मानहानी भरून काढण्यासाठी आणि काहीतरी करून देशांतर्गत असंतोषाला चुचकारण्यासाठी पाकिस्तान नक्कीच काहीतरी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे हे आपल्या सॅटेलाईट ने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे आपण सहज बघू शकतोय. यासाठी सॅटेलाईट बेस्ड ओपन सोर्स इंटेलिजन्स ( ओएसआयएनटी) चे आभार मानावे तितके थोडे आहेत. खालील तीन छायाचित्रे बघता आपल्या लक्षात येईल

Read More

भारतीय सेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोचली आहे का? पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीय सैनिकी कारवायांचे आकलन

काल नामवंत सुरक्षा विश्लेषक सुशांत सरीन यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या २ मोठ्या हल्ल्यांबद्दल एक ट्विट केलं आणि काही वेळात ते त्यांनी काढुनही टाकलं. त्यानंतर दिल्लीमधुन प्रकाशित होणाऱ्या द वीक या इंग्लिश साप्ताहिकाच्या वेबसाईटवर भारताने व्याप्त काश्मीरमध्ये मागील ४ दिवसात २ मोठे हल्ले केल्याचं आणि त्यात अनेक अतिरेक्यांसह कित्येक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची बातमी प्रकाशित केली. ही बातमी ६ परिच्छेदांची होती. पण अर्ध्या तासात तीही बातमी वेबसाइटवरून काढुन टाकण्यात आली.

Read More

भारतीय सेनेने नियंत्रण रेषेजवळील नौगाम सेक्टर मध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानच्या बॅटचा प्रयत्न उधळून लावला.

रविवारी जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यावर भारतीय लष्कराने बोळा फिरविला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात घुसून मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) डाव होता. या घुसखोरांनी भारताच्या नियंत्रण रेषेजवळील जंगलातून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पाकिस्तानी चौक्यातून मोर्टार आणि रॉकेट लॉन्चर सारख्या शस्त्रांनी कव्हरिंग देण्यात आले होते. परंतु त्यांच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चांगलेच प्रत्युत्तर दिले.

Read More

लष्करासाठी काश्मिरमधील वर्षांतील सर्वात जास्त व्यस्त महिना.

आज संपणाऱ्या महिन्यात आपल्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत एकूण ३९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत संरक्षण दलांसाठी सर्वात व्यस्त गेला असेच म्हणावयास लागेल. लष्कर ए तोयबाचा कमांडर नावीद जट हे मारल्या गेलेल्या अतिरेक्यांपैकी मुख्य नाव आहे. याला आपल्या लष्कराने याच आठवड्यातील बुधवारीच टिपले. लष्कराने अश्या काही प्रमुख दहशतवाद्यांची यादीच तयार केलेली असून एकामागोमाग एक प्रत्येकाला टिपण्याचा कार्यक्रमच हाती घेण्यात आलेला असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्य

Read More