AfPak region

ग्रेट गेम: भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान: मोठी खेळी

अफगाण-अमेरिका डिप्लोमॅट झाल्माय खालिजाद सध्या भारत भेटीवर आले आहेत. गेलं एक वर्षभर ते तालिबान आणि अमेरिका यांच्यात समेट घडवून आणायच्या प्रयत्नात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान मधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे वचन दिले आहे. परंतु त्यासाठी तालिबान आणि अमेरिका यांच्यात बैठक होणे गरजेचे आहे. तालिबानला अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी तयार करण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारताचा काहीच सहभाग नाही. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्री असल्याने खालिजाद यांनी भारताला या प्र

Read More

३७० नंतर युद्धासाठी पाकिस्तानी जनतेचा सैन्यावर दबाव!

काश्मीर यापुढे "द्विपक्षीय" मुद्दा नाही?? भारताने कलम ३७० आणि ३५-अ ला एका झटक्यात मुठमाती देऊन आणि सध्याच्या जम्मू काश्मीर राज्याचे २ केंद्रशासित प्रदेशात विभाजन करून पाकिस्तानला आणि जगाला जो धक्का दिलाय तो अनपेक्षित आणि जीवघेणा आहे. आजपर्यंत काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तानमधील "द्विपक्षीय" मुद्दा आहे यात तिसऱ्या देशाची मध्यस्थी चालणार नाही, अशी भारताची भुमिका होती. ३७० रद्द करून भारताने काश्मीरचं देशात संपूर्ण विलीनीकरण केल्यानंतर आता कोणत्याही क्षणी भारतीय विदेश मंत्रालय, काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्

Read More

पाकिस्तान यापुढे आपल्या भूमीवर कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही युद्ध लढणार नसल्याचे इम्रान खान यांचे वक्तव्य.

गेली कित्येक वर्षे पाकिस्तान लढत असलेले 'देशांतर्गत दहशतवाद विरोधातील युद्ध' म्हणजे खरेतर पाकिस्तानवर जबरदस्तीने लादण्यात आलेले युद्ध असून यापुढे पाकिस्तान असे कोणतेही 'लादलेले युद्ध' त्यांच्या भूमीवर लढणार नाही असा निर्धार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उत्तर वजिरीस्तान येथे बोलताना त्यांच्या भाषणात व्यक्त केला. गेले कित्येक आठवडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानवर करीत असलेल्या "पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस पाऊले न उचलता केवळ तसा देखावा निर्माण करून अमेरिक

Read More