जल साम्राज्यवाद,भविष्यातील पाण्याचे युद्ध आणि चीनचा तिबेटमधील वसाहतवाद ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा चीनने तिबेटमध्ये वसाहती केल्या तेव्हा चीनी राज्यकर्त्यांचा मुख्य उद्देश हा सुरक्षेसाठी बफर स्टेट तयार करणे होता.२० व्या शतकात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने तिबेटमध्ये जबरदस्तीने आपले पाय रोवले आणि त्यांच्या विस्तारवादी धोरणातील एक साधन म्हणून तिबेटकडे पाहिले गेले. तिबेटवर जबरदस्तीने कब्जा करून चीनने भविष्यात प्रादेशिक हक्क सांगण्याच्या उद्देशाने भारत, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तानशी थेट सीमा संबंध प्रस
Read More
चीनमधील झिनझियांग प्रांतातील किमान पाच लाख उयघूर मुस्लिम मुलांना त्यांच्या पालकांपासून जबरदस्तीने वेगळे करून ‘बोर्डिंग स्कूल’ मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे.
दलाई लामा हे नाव नसून उपाधी आहे. याचा अर्थ ज्ञानाचा महासागर. बौद्ध धर्माचे नेतृत्त्व करणाऱ्याला ही उपाधी मिळते. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक गुरु आहेत. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकात सुरु झाली. जेनडून द्रुप हे पहिले लामा आहेत. बौद्ध धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणजे तिबेट मधील ड्रेपुंग विहार. या विहारामध्ये दलाई लामा बौद्ध धर्मियांना दिक्षा देण्याचे काम करीत असत.
दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरविण्याच्या चीनच्या दाव्याला या गुरुवारी अमेरिकेने फेटाळून लावले. संयुक्त राष्ट्र संघासह इतर आंतरराष्ट्रीय संघटना या मुद्द्यावर आपले मत मांडतील असेही अमेरिकेने खडसावून सांगितले.
तिबेटमध्ये सुरु असलेल्या रोड प्रकल्पाच्या आडून चीन नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण करीत असल्याचे नेपाळच्या सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.
१५ वे दलाई लामा कोण असतील याविषयी गेल्या अनेक दशकांपासून चर्चा सुरु आहे. परंतु आता मात्र हा प्रश्न अगदी ऐरणीवर आला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे झालेल्या सौहार्दपूर्ण भेटीनंतर सुद्धा चीनने तिबेट मध्ये लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. ही युद्धासाठीची तयारीच आहे.
चीनमधील उयघूरमध्ये चीन सरकारकडून एक अजब सर्व्हे करण्यात आल्याचे समजत आहे. येथे सरकारच्या सांगण्यावरून १० लाखांपेक्षा जास्त हान वंशाच्या चिनी नागरिकांवर मुस्लिम नागरिकांच्या घरात प्रवेश करून काही विशिष्ठ गोष्टींचे परीक्षण करून त्याची नोंद करण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. मुख्यत्वे येथील मुस्लिम त्यांच्या धर्माविषयी किती कट्टरता बाळगतात हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता.
The apothegm that tomorrow is a new day seems to have betrayed the aspirations of Uyghurs in China. Apart from being stripped of their rights to worship and practice religion , the Uyghurs are facing a dilemma of state funded cultural terrorism at the hands of Han Chinese nationals.