भारत तैवान भागीदारी- काळाची गरज (ICRR South China Sea/ Senakaku Islands) ---सारंग लेले, आगाशी. न्येमा तेंझिन हा तिबेटी वंशाचा भारतीय सैनिक मागच्या आठवड्यात भारत चीन सीमेवर मृत्युमुखी पडला. तदपश्चात तैवानी राष्ट्रपतींच्या अधिकृत प्रवक्त्या कोलास योकाता ह्यांनी ह्या मृत्यूबद्दल ट्विटरवर जाहीरपणे दुःख व्यक्त केलं. जून महिन्यात सीमेवर भारत आणि चिनी सैन्यात घडलेल्या चकमकीची दखलसुद्धा कोलास ह्यांनी घेतली होती. चीन व भारत ह्याबरोबर चीन व तैवान ह्या देशांमध्ये उद्भवलेल्या तणावप
Read More
त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"(ICRR South China Sea/ Senkaku Islands) ५ सप्टेंबरला मलाक्काच्या तोंडावर असलेल्या साबांग बंदराला दोन भारतीय युद्धनौकांनी भेट दिल्याने चीनचे कान टवकारले (साबांग बंदराचे स्थान बघण्यासाठी आय.सी.आर.आर. लिंक क्लिक करा.) भारत, थायलंड, सिंगापुर यांच्या नौसेना सप्टेंबर १६ ते २० च्या दरम्यान अंदमान येथे संयुक्त युद्धाभ्यास करतील. चिंचोळ्या मलाक्का सामुद्रधुनीतून कोणत्याही अडथळ्याशिवाय सागर
हाँगकाँग जनतेचा पहिला विजय- चीन पुरस्कृत 'प्रत्यर्पण विधेयक' मागे घेत असल्याची चीफ एक्सिक्युटिव्ह लाम यांची घोषणा(ICRR South China Sea- Senkaku Islands)हॉंगकॉंगमधील सामान्य जनता चिनी महासत्तेला टक्कर देऊन विजयाच्या टप्प्यात आत्ताच मिळालेल्या माहि
हॉन्गकॉन्गचे नागरिक, प्रस्तावित प्रत्यार्पण कायद्याच्या विरोधात रस्त्यांवर आले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. इथल्या लोकांच्या मते हा कायदा प्रामुख्याने चीनी महासत्तेच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी वापरला जाण्याची मोठी शक्यता आहे. हॉंगकॉंग हे चीनचा भाग असले तरी 'विशेष प्रशासकीय क्षेत्र' असा विशेष दर्जा त्याला मिळालेला आहे. इथली कायदेव्यवस्था चिनी प्रशासनापेक्षा वेगळी आहे. 'स्पष्ट बोलण्याचे स्वातंत्र्य' जे चिनी राजवटीतील जनतेला दुष्प्राप्य आहे
जपान सध्या त्यांच्या नौदलाच्या सेवेत असलेल्या एका हेलिकॉप्टर कॅरिअर मध्ये दुरुस्ती व आधुनिकीकरण करून त्याचे रूपांतर एका विमानवाहू युद्धनौकेत करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त मंगळवारी सूत्रांकडून समजले आहे. इतर देशांसाठी संरक्षण क्षेत्रातील आवश्यक आणि सर्वसाधारण प्रकारातील हा निर्णय असला तरी ज्या देशाची घटना ही आक्रमणाच्या नाही तर स्वसंरक्षणाच्या मूल्यांवर आधारित आहे अश्या जपानसारख्या देशाने असा निर्णय घेणे हे खरंच विशेष आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी यूएस व्हाईस प्रेसिडेंट माईक पेन्स असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन (ASEAN) च्या बैठकीसाठी सिंगापूर येथे गेले होते. या प्रवासादरम्यान त्यांचे विमान वादातीत स्पार्टली बेटांवरील चिनी तळाच्या५० मैलांच्या परिघातून गेले.
काल गुरुवारी सिंगापूर येथे भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि यूएस यांच्या दरम्यान क्वाड्रीलॅटरल बैठकीची तिसरी फेरी पार पडली. या बैठकीत चारही देशांनी 'क्वाड' मध्ये इतर देशांचा समावेश करून क्वाडची कक्षा वाढविण्याच्या प्रस्तावास सहमती दर्शविली. इंडो पॅसिफिक क्षेत्रात मुक्त, खुले, नियमबद्ध आणि समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे चारही देशांचे मत पडले.