३७० च्या अंताचे मूक शिल्पकार- जम्मु काश्मीर स्टडी सेंटर...
डावे जेवढं करतात आणि जाणतात त्याच्या हजार पटीने दाखवतात. आणि उजवे जेवढं जाणतात आणि करतात त्याच्या लाखावा भाग जगाला कसाबसा दिसेल अशी व्यवस्था करतात. हा उजव्यांचं गुण आहे का दोष हा महत्वाचा मुद्दा नाही, पण ही उजव्यांची कामाची पद्धत आहे. आणि १९२५ पासुनचा अनुभव बघता, जे करतोय ते "दाखवण्याची" घाई नं करणे उजव्यांच्या कामाच्या दृष्टीने मोठ्या फायद्याचे सिद्ध होत आले आहे. याचा एक मोठा तोटा उजवे रोज अनुभवतात, तो असा कि एखाद्या डाव्याला "मॅगसेसे" मिळाला, कि लोक त्याला आधार मानुन उजव्यांना अभ्यासाची सवयच नाही, ..