भारत आणि चीन यांच्या लडाख जवळील सीमेवरील सैनिकांच्या तैनातीबद्दल भारत सरकार मौन बाळगून आहे. सरकारचे मौन अनेक अफवांना जन्म देतंय. या सगळ्या अफवा आणि सरकारकडून अधिकृत बातमी नसल्यामुळे लडाखमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. एका रात्रीत अचानक सैनिकांची संख्या वाढली असल्याने सगळीकडे अजूनच दहशत निर्माण झालीय असे श्लोक गावातील नगरसेवक नामग्याल याकझी यांनी सांगितले.
Read More
२६ फेब्रुवारीला केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकने भारताला दहशतवादाच्या लढाईत एका उंचीवर नेऊन ठेवलं. शत्रूच्या प्रदेशात सैन्य न उतरवता जलद गतीने आणि कमीत कमी वेळात शत्रूवर हल्ला करून परत येण्याचे कसब हवाई दलात असल्याने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अनेक देश हवाई दलाला महत्त्वाचा घटक मानतात. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारताने दहशतवादासंबंधी सगळ्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच दहशतवादी व्यक्ती, गट, त्यांचे तळ, त्यांच्या सुरक्षित लपून बसण्याच्या जागा (सेफ हेवन्स ) आणि त्यांचे लाँच पॅड्स यांची इत्यंभूत माह
काश्मीर प्रश्न सतत खदखदत ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा याकडे वळविण्यासाठी पाकिस्तान काहीतरी भयंकर करेल. पाकिस्तानचे लाडके पंतप्रधान आणि लष्कर यांची झालेली मानहानी भरून काढण्यासाठी आणि काहीतरी करून देशांतर्गत असंतोषाला चुचकारण्यासाठी पाकिस्तान नक्कीच काहीतरी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे हे आपल्या सॅटेलाईट ने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे आपण सहज बघू शकतोय. यासाठी सॅटेलाईट बेस्ड ओपन सोर्स इंटेलिजन्स ( ओएसआयएनटी) चे आभार मानावे तितके थोडे आहेत. खालील तीन छायाचित्रे बघता आपल्या लक्षात येईल
कलम ३७० आणि ३५-अ रद्द केल्यानंतर भारतात दिवाळी फिकी पडेल असा प्रचंड विजयोत्सव सुरू आहे. जे झालंय ते अविश्वसनीय आणि अकल्पनीय नक्कीच आहे. हे स्वप्न बघत राष्ट्रवाद्यांच्या जवळपास २ पिढ्या गेल्या. अशी जी पिकली पानं अजुन ऐशी- नव्वदीत आहेत त्यांना जीवनाचं सार्थक झाल्याची भावना आहे.
काल नामवंत सुरक्षा विश्लेषक सुशांत सरीन यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या २ मोठ्या हल्ल्यांबद्दल एक ट्विट केलं आणि काही वेळात ते त्यांनी काढुनही टाकलं. त्यानंतर दिल्लीमधुन प्रकाशित होणाऱ्या द वीक या इंग्लिश साप्ताहिकाच्या वेबसाईटवर भारताने व्याप्त काश्मीरमध्ये मागील ४ दिवसात २ मोठे हल्ले केल्याचं आणि त्यात अनेक अतिरेक्यांसह कित्येक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची बातमी प्रकाशित केली. ही बातमी ६ परिच्छेदांची होती. पण अर्ध्या तासात तीही बातमी वेबसाइटवरून काढुन टाकण्यात आली.
दहशतवादी कृत्यांसाठी निधी पुरवल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) जम्मू - काश्मीर मधील फुटीरतावादी गटाची लीडर आसिया अंद्राबी हिला अटक केली आहे. तसेच तिचे राहते घर सील करण्यात आले आहे. तिच्या घरातून अनेक देशविघातक कृत्ये केली जात असल्याचे ठोस पुरावे एनआयए ला मिळाले असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अंद्राबी ते घर विकू शकत नाही.
एका अहवालानुसार आयएसआयएसने पुनरागमनाची जोरदार तयारी केली आहे. एवढेच नाही तर या वेळी ती संपूर्ण ताकदीने आणि जोमाने धडक मारणार असे दिसतेय.
लंडन-आधारित अरबी वृत्तपत्र अशार्क अल्-अवसत यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाने गेल्या आठवड्यात युनायटेड किंग्डमच्या लेबनानी हिजबुल्ला गटांना दहशतवादी संघटना म्हणून ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसेच दहशतवादाच्या विरोधातील हे अतिशय "महत्त्वाचे आणि विधायक" पाऊल आहे असेही म्हटले.
बालाकोटवर भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने जराही उसंत घेतली नाही. आततायीपणे भारतावर प्रतिहल्ला करून आपण सुद्धा काही तरी करू शकतो हे जगाला दाखवायचा प्रयत्न करून पाहिला. तथापि, आर्थिकदृष्ट्या खिळखिळा झालेला देश शत्रूचा रोष फार काळ सहन करू शकत नाही कारण भारत केव्हाही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतो. याचमुळे पाकिस्तानचे लष्कर हे युद्ध नाही असे ठामपणे सांगत आहे. म्हणजेच भासवत आहे.
रविवारी जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यावर भारतीय लष्कराने बोळा फिरविला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात घुसून मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) डाव होता. या घुसखोरांनी भारताच्या नियंत्रण रेषेजवळील जंगलातून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पाकिस्तानी चौक्यातून मोर्टार आणि रॉकेट लॉन्चर सारख्या शस्त्रांनी कव्हरिंग देण्यात आले होते. परंतु त्यांच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चांगलेच प्रत्युत्तर दिले.
आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये किंवा इंटरनेटवर व्हिडिओज मध्ये काश्मिरात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पाहिले आहे. ते कायम तोंडाला रुमाल बांधूनच हे काम करीत असतात. सरतेशेवटी इंडिया टीव्ही च्या एका अंडरकव्हर रिपोर्टर ला यांच्या तोंडावरील हा रुमाल खाली करवून त्यांच्याकडून सत्य वादविण्यात यश आलंय. आणि त्याच बरोबर मागील वर्षी हिजबुल मुजाहिदीनचा नेता बुरहान वानी याला लष्कराने ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पसरलेल्या अशांततेमागील भेदक सत्यदेखील समोर आलंय.
आज संपणाऱ्या महिन्यात आपल्या जवानांनी काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत एकूण ३९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत संरक्षण दलांसाठी सर्वात व्यस्त गेला असेच म्हणावयास लागेल. लष्कर ए तोयबाचा कमांडर नावीद जट हे मारल्या गेलेल्या अतिरेक्यांपैकी मुख्य नाव आहे. याला आपल्या लष्कराने याच आठवड्यातील बुधवारीच टिपले. लष्कराने अश्या काही प्रमुख दहशतवाद्यांची यादीच तयार केलेली असून एकामागोमाग एक प्रत्येकाला टिपण्याचा कार्यक्रमच हाती घेण्यात आलेला असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्य
हिंद महासागरामधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच कोची येथे इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटरची (IFC) उभारणी करण्यात येण्याची घोषणा १३ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलातील द चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ऍडमिरल सुनील लांबा यांनी इंडियन ओशियन नेव्हल सिम्पोजिअमच्या (IONS) दहाव्या बैठकीत सर्व सभासदांसमोर बोलताना केली.
जून २०१९ पर्यंत भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात 'वॉल रडार्स' याच नावाने प्रसिद्ध असलेली आणि खरोखरच भिंतीच्या पलीकडले पाहू शकणारी १५० 'थ्रू वॉल रडार सिस्टिम्स' दाखल होण्याची शक्यता आहे. या रडार्समुळे एखाद्या घरात लपून बसलेले अथवा एखाद्या भिंती आड दडलेले दहशतवादी टिपण्यास आपल्या लष्कराला फार मोठी मदत मिळणार आहे.
दक्षिण काश्मीरच्या शोपीयन जिल्ह्यातील नाडीगम भागात मंगळवारी पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री होऊन चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेले आहे. ठार झालेले चारही जण हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे स्थानिक सदस्य होते. याच संघटनेने काही दिवसांपूर्वी लष्कराचा खबरी असल्याच्या संशयावरून एकाची हत्या केली होती आणि हत्या करताना त्याचे चित्रीकरणही केले होते. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ચાલો જાણીએ આ નવી તોપો વિષે ખાસ કરીને 1980 ના દાયકાના અંતમાં સ્વીડિશ બોફોર્શ તોપની આયાત કરવામાં આવી. ત્યાર બાદ પ્રથમવાર ભારે આર્ટિલરી શસ્ત્રનો સમાવેશ કરવાનું પગલું લેવામાં આવ્યું છે. ભારતીય સૈન્ય અને સૈન્ય વિશેષજ્ઞો છેલ્લા અનેક વર્ષોથી આ પ્રકારની સુવિધા સભર શસ્ત્રોની શોધમાં હતા. આ લાંબી સોધનો અંત ગત 9 નવેમ્બરના રોજ આવી ગયો. આ દિવસે રક્ષા મંત્રી નિર્મલા સીતારામન અને સૈન્ય પ્રમુખ બિપિન રાવતની ઉપસ્થિતિમાં આ શસ્ત્રો આપવામાં આવ્યા હતા. આ તોપ પ્રકારની બંદૂક સિસ્ટમમાં એમ 777 અમેરિકન અલ્ટ્રા લાઈટ હોવિત્ઝર, કે