भारताच्या दृष्टीने महत्वाचे असे एक धोरण म्हणजे दक्षिण पूर्वेकडच्या देशांशी संबंध निर्माण करण्यासाठी आपण आखलेली ''ऍक्ट ईस्ट पॉलिसी''. १९९३ साली काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या 'लुक ईस्ट पॉलिसी'चा विस्तार करून त्यात महत्वाच्या सुधारणा, बदल घडवून मोदी सरकारने 'नोव्हेंबर १४ साली ऍक्ट ईस्ट पॉलिसीची घोषणा केली. या धोरणांतर्गत भारत, दक्षिण पूर्वेकडील विविध देशांशी संबंध प्रस्थापित करू लागला आहे. यात प्रामुख्याने आपले मित्रराष्ट्र जपान, ऑस्ट्रेलिया आणि 'आसियान म्हणजे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज' म्हणून ओळखली जाणारी सिंग
Read More
आपल्या 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' धोरणांतर्गत बऱ्याच काळापासून चीन दक्षिण आशियात छोट्याछोट्या देशांमध्ये आपले स्ट्रॅटेजिक आणि आर्थिक तळ उभारीत आहे. खरेतर भारताच्या बाजूने अश्याप्रकारे कुंपणच उभे करून भारताची कोंडी करण्याचाच त्यांचा मनसुबा असावा. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र भारताच्या जवळपास चीनला स्थिरावू न देण्यासाठी कणखर भूमिका घेतलेली आहे. भारताच्या परसात चीनच्या वर्चस्व निर्माण होऊ न देण्याच्या भारताच्या धोरणामुळे दक्षिण आशिया या दोन सत्तांमधील संघर्षभूमी ठरत आहे.