अदानी- हिंडेनबर्ग नाट्यामागील अमेरिकन आर्थिक कारण...
(ICRR- Diplomacy & Foreign Affairs)
अडानी वरील हिंडेनबर्ग रिपोर्ट अदानी समूहाच्या शस्त्र उत्पादनाशी संबंधित आहे का? राजकीय कारणापेक्षा अमेरिकन अर्थव्यवस्थेतील शस्त्र व्यापाराच्या आर्थिक महत्वाचं कारण जास्त मोठं आहे का? याचा पडताळा...
गेले काही दिवस अदानी उद्योगसमूहावरील हिंडेनबर्ग रिपोर्टने भारतीय राजकारण, अर्थकारण आणि शेयर बाजार ढवळून निघालेला आहे. एका लहानशा संस्थेने (?) भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहावर केलेल्या आरोपांनंतर समूहाच्या सर्व प्रमुख कंपन्यांचे शेयर मूल्य निम्म्याच्या खाली आले, लाखो गुंतवणूकदारांचा शेयर पोर्टफोलिओ डळमळला आणि राजकीय पक्षांना अचानक नवा मुद्दा मिळाला. यामागे अदानीला धक्का देऊन केंद्र सरकारला अडचणीत आणणं हा सकृतदर्शनी मुख्य अजेंडा वाटत असला तरी यामागे खरं कारण समूहाची शस्त्र उद्योगात वाढणारी गुंतवणूक आहे हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.
शस्त्रजीवी अमेरिकन समाज आणि अमेरिकन शस्त्रास्त्र उद्योग!
प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी याने पश्तुन लोकांना (सध्या आपण ज्यांना पठाण/ पख्तुन म्हणतो ते) "शस्त्रजीवी समाज" म्हटलं होतं कारण प्रत्येक पश्तुन सतत आपल्या सोबत एक हत्यार बाळगतो. आजही पाकिस्तानी खायबर पख्तुनख्वा प्रांतात किंवा अफगाणिस्तानात राहणारे पश्तुन सोबत एक खंजीर, तलवार किंवा रायफल घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यांची शत्रावर मोठी भक्ती आहे. अमेरिकन समाज असाच एक शस्त्रजीवी समाज आहे. त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्यासाठी परवाना लागत नाही आणि ते विकणारी दुकाने राजरोसपणे चालवली जातात. "कॅसल डॉक्टरीन" मुळे आपल्या हद्दीत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला गोळी मारणे तिथे वैध आहे. त्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्थेत शस्त्रविक्रीचा वाटा थक्क करणारा आहे.
अमेरिकन शस्त्रविक्रीचा आर्थिक आकार...
जागतिक शस्त्रविक्रीमध्ये अमेरिकन वाटा ३७% असून अमेरिकन घरगुती वार्षिक उत्पन्नात (जीडीपी) शस्त्रविक्रीतून आलेल्या उत्पन्नाचा वाटा ३.३% म्हणजे ७४२ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा ६१ लाख ४० हजार ७९२ कोटी भारतीय रुपये (६१,४०,७९२ कोटी रुपये!) इतका प्रचंड आहे. या व्यापाराला भारतासारख्या देशातून हळूहळू स्पर्धा वाढत आहे आणि त्यासाठी अशी स्पर्धा करणाऱ्या भारतीय उद्योगांना वेळीच जेरीस आणणं हि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी काळाची गरज आहे!
अदानीचा समूहाचा शस्त्रउद्योगात वावर...
अदानी समूहाच्या अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ऑर्डफेन्स सिस्टिम्स लिमिटेड, अदानी एरोस्पेस अँड डिफेन्स, अदानी नेव्हल डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज, पीएलआर सिस्टम्स आणि अदानी एलबीट ऍडव्हान्स सिस्टम्स. यापैकी पीएलआर सिस्टम्स अदानीने ताब्यात घेतल्यावर ती इस्राईली वेपन इंडस्ट्रीज( IWI) सोबत आपोआप जॉईंट व्हेंचर झाली.
अदानी समूह सध्या एयर डिफेन्स सिस्टम्स सह मानवरहित टेहळणी, सर्व्हिलन्स आणि इंटेलिजन्स गॅदरिंग करणारी विमाने अर्थात UAV उत्पादन करतो. याशिवाय सैन्यासाठी सर्वात जास्त लागणारी छोटी शस्त्रे आणि उपकरणे, अचूक मारा करणारी शस्त्रे (Precision Guided Munitions), इलेकट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम्स, सिम्युलेटर्स आणि सेन्सर्स या क्षेत्रात अदानी मोठा उत्पादक म्हणून समोर येत आहे.
सैन्यासाठी हवाई सुरक्षा देणारी एयर डिफेन्स रडार्स पुरवण्याबाबतचा करार सुद्धा झालेला असून त्याचा प्रत्यक्ष पुरवठा २०२४ ला होईल. पूर्वी इस्राईल कडून आयात होत असलेल्या टावोर असौल्ट रायफल, नेगेव्ह लाईट मशीन गन्स, गाली स्नायपर रायफल्स या आता जॉईंट व्हेंचर मधून अदानी समूह भारतात तयार करतो.
वायुसेनेसाठी लागणारे ग्लाईड बॉम्ब, पायदळाच्या चिलखती गाड्यात बसवलेले अत्याधुनिक रेडिओ सेट्स, विमानांसाठी लागणारी फायर कंट्रोल रडार्स, लढाऊ विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देणारी सिम्युलेटर मोड्यूल्स, इस्रायली कंपनीसोबत लांब पल्ल्याची हर्मिस मानवरहित विमाने, ड्रोन विरोधी रडार उपकरणे आणि ड्रोन विरोधी रुद्रव सिस्टम हि सैन्य उपकरणे सध्या अदानी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्या भारतात तयार करते. आगामी काळात लढाऊ विमाने तयार करणाऱ्या स्वीडिश विमान कंपनीसोबत ग्रीपेन फायटर जेट्स भारतात तयार करण्यासाठी करार करण्याची अदानी ची योजना आहे.
भारतीय शस्त्र उद्योगाचा वाढता विस्तार आणि अमेरिकन चिंता....
भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेमुळे डीआरडीओ, इसरो या सरकारी कंपन्यांनी आणि टाटा, एल अँड टी , अदानी यांच्यासारख्या खाजजी उद्योगांनी सध्या लहान शस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि काही अत्याधुनिक उपकरणे लहान लहान देशांच्या सैन्याला अमेरिकन आणि युरोपियन किंमतीच्या पेक्षा कितीतरी स्वस्त दरात विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भारताची शस्त्र आयात भविष्यात वेगाने घटेल आणि आणि एक मोठा शात्र निर्यातदार देश म्हणून भारत पुढे येईल. याला खोडा घालण्यासाठी अमेरिकन "वेपन्स लॉबी" कंबर कसून मैदानात उतरली आहे.
अमेरिकन फार्मा आणि वेपन्स लॉबी...
फायझर ची कोविड लस नं घेता भारताने स्वतःची लस तयार करून जगभर वितरित केली आणि देशांतर्गत १३० कोटींचं मार्केटही अमेरिकन लशीपासून मुक्त ठेवलं, भारतीय बनावटीच्या तेजस फायटर जेटचा भारतीय वायुसेनेसोबत १८३ विमाने खरेदी करायचा करार झाला आणि याचा बदला म्हणून फार्मा आणि वेपन्स लॉबीने भारतात नद्यांवर तरंगणारी प्रेते, कृषी कायदे याविरोधात आंतरराष्ट्रीय खेळाडू मैदानात उतरवले. अमेरिकन गायिका रिहानाला कृषी कायद्यांच्या विरोधात ट्विट करण्यासाठी कोट्यवधी रुपये बिदागी देण्यात आली, तरीही भारतीय सरकार दबत नाही त्यामुळे आता भारतीय उद्योगांना ठोकण्याची नवी खेळी सुरु झाली आहे.
गांबिया कफ सिरप आणि अदानी समूह...
भारतीय कफ सिरप पिऊन गांबिया देशात ६५ बालके दगावली याचा अर्थ भारतीय औषधे स्टॅंडर्ड नाहीत असा प्रचार जगभर करून झाला पण अपवाद वगळता भारतीय औषधे दर्जा आणि किंमत याबाबतीत जगभर लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे आता शस्त्रनिर्मितीत आघाडी घेऊ पाहणाऱ्या भारतीय उद्योगांना ठोकण्याची मोहीम सुरु झाली आहे.
राजकीय सोय म्हणून अदानी अंबानीला ठोकत राहू पण खाजगी उद्योगांना पर्याय नाही आणि नवीन पिढी ८०-९० च्या दशकात जशी शाळा मास्तर, बँक, पोस्ट यात नोकरी करून संसार चालवत होती तशी नवीन पिढी जगू शकत नाही कारण शाळा मास्तर, बँक, पोस्ट यात रोजगाराला मर्यादा आहेत, खाजगी उद्योगांना नियमात बांधून ठेऊन ते जनहिताच्या विरोधात जाणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जावी परंतु संपत्ती आणि रोजगार निर्माण करणारे उद्योगपती गुन्हेगार नाहीत हि खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे...
लोकसभा निवडणूक वर्षभरात होणार आहे त्यामुळे दर आठवड्याला एक नवा मुद्दा येऊ घातला आहे, सावध असायची गरज आहे...
---- विनय जोशी