भारत-फिलिपिन्स ब्रह्मोस करार - चीनला उघड उघड संदेश.

07 Mar 2021 18:19:57

भारत-फिलिपिन्स ब्रह्मोस करार - चीनला उघड उघड संदेश.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

शस्त्रात्रं निर्यातदार होण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. फिलिपाइन्ससोबत " बचावात्मक साहित्य आणि उपकरणे" यांच्या विक्रीचा भारताने करार केला आहे. ज्यात ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

 

दोन कारणासाठी ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. पहिलं म्हणजे क्षेपणास्त्र प्रणालीसाठी फिलिपाइन्स हा भारताचा पहिला ग्राहक असेल आणि दक्षिण चीन समुद्रात (साऊथ चायना सी ) चीनपासून फिलिपाइन्सचा बचाव होण्यात भारताचा हात असेल.

 

दक्षिण चीन समुद्र हा केवळ आशियातच नव्हे तर संपूर्ण जगात एक ज्वलनशील बाब बनून राहिला आहे. संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीनने दावा ठोकला आहे. या दाव्याचा परिणाम फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या पाच देशांवर होतोय. आणि हेच दक्षिण चीन समुद्रातील संघर्षाचे मुख्य कारण आहे. आणि म्हणूनच फिलिपाइन्स चीनच्या विरोधात आहे.

 

भारत फिलिपाईन्सला शस्त्रास्त्रे विकतोय. या कराराचे सामरिक महत्त्व स्पष्ट केले पाहिजे. स्वावलंबनाने चीनच्या धोक्याला फिलिपाइन्स आज सामोरा जातोय. भारत आणि फिलिपाइन्स यांनी "अंमलबजावणी करार " केला आहे. हा करार आणि त्याच्या अटी सरकार ते सरकार करारावर आधारित आहेत. फिलिपाइन्सना ब्रह्मोस मिसाईल हवे आहे. फिलिपाईन्सचे संरक्षण सचिव डेलफिन लोरेन्झाना यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळी त्यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेत असल्याची घोषणा केली. आता त्यांच्या या मागणीविषयी करार होण्याकरिता चर्चा होईल.

 

मनिलाला ( फिलिपाइन्स ) हे भारतीय क्षेपणास्त्र का हवे आहे?

 

ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्र मानले जाते. सुपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा वेगवान. क्षेपणास्त्रांच्या या श्रेणीत ब्रह्मोस अग्रस्थानी आहे. एका अहवालानुसार ते ध्वनीच्या वेगाच्या तीन पट वेगाने प्रवास करते. या क्षेपणास्त्राचा मारा जहाजे आणि पाणबुड्यातून केला जाऊ शकतो. विमाने आणि जमिनीवरून ते २९० किलोमीटर पर्यंत पोहचू शकते. फिलिपाइन्सना किनारपट्टीवरील संरक्षण आणि जमिनीवरून हल्ला करण्यासाठी ब्रह्मोसचा वापर करायचा आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनची वाढती आक्रमकता लक्षात घेता सुरक्षेचा उपाय त्यांना हवा आहे. परदेशी जहाज दिसल्यावर गोळीबार करण्याचा कायदा चीनने जानेवारीमध्ये संमत केला.

 

फिलिपाइन्सने या निर्णयावर कडक निषेध नोंदविला. " युद्धाची नांदी " असे ट्विट परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे. याच कारणामुळे फिलिपाइन्सना किनाऱ्यावर आपले संरक्षण वाढविण्याची गरज भासतेय. भारताला त्यांची मदत करण्याची इच्छा आहे. फिलिपाइन्ससाठी ब्रम्होस एकदम योग्य आहे असे तज्ञांना वाटते.
 
BrahMos_1  H x
 
 
भारताने ब्रह्मोसच्या अनेक यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. फिलिपाइन्स ही क्षेपणास्त्रे केवळ जमिनीवरूनच नाही तर जहाजावरूनही प्रक्षेपित करू शकतात. ही क्षेपणास्त्रे चीनच्या नियंत्रण रेषेवरील अनेक मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सुखोई लढाऊ विमानांवरही ते वापरण्यात येईल. भारत या कामीही फिलिपाइन्सना मदत करत आहे.

 

भारताने फिलिपाईन्सला डिसेम्बरमध्ये क्षेपणास्त्रांचे अधिग्रहण करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले होते. आवश्यकता भासल्यास त्याची मुदत वाढविण्यात येईल.

 

हा करार झाला तर भारताला बराच फायदा होईल. शस्त्रास्त्रांचा निर्यातदार म्हणून तो भक्कमपणे पाय रोवू शकेल. या करारामुळे जागतिक संरक्षण मार्केटमध्ये ( ग्लोबल डिफेन्स मार्केट ) प्रतिस्पर्धी निर्यातदार म्हणून भारताची ओळख होण्याच्या दिशेने भारताचे पाऊल पडेल.

 

आधीच ब्रह्मोस विषयी जागतिक उत्सुकता आहे. फिलिपाइन्स शिवाय व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती हे ब्रह्मोस खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जाते. अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसमवेतही भारताची बोलणी झाल्याचे म्हटले जाते.

 

२०२५ पर्यंत पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि या मोहिमेचा ब्रह्मोस हा कणा असेल. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाहीये तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे.

 

भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल.

 

Source - youtube, google, wion

 

 

Powered By Sangraha 9.0