सुएझ कालव्यातील दळणवळण ठप्प.

26 Mar 2021 17:41:19

सुएझ कालव्यातील दळणवळण ठप्प - फसलेल्या सुपर कार्गोमुळे ऐतिहासिक व्यापार कोंडी !

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Content Generation )

  

अजस्त्र मालवाहू जहाज अरुंद अश्या सुएझ कालव्यात अडकलेल्याला आज तीन दिवस झाले. हे जहाज कालव्यात अश्या तऱ्हेने फसले आहे की ते तिथून बाहेर काढण्यास एक आठवडा तरी नक्की जाईल असे तज्ज्ञांना वाटतेय.

 

या कालव्यामधून जहाजांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालते. हे जहाज फसल्यामुळे कितीतरी जहाजे अडकून पडली आहेत. तर कित्येक जहाजांना सोडण्यातच आलेले नाही.

 

जहाजाचे मालक जपानी असले तरी जहाजावर २५ भारतीय कर्मचारीआहेत. हे सर्व कर्मचारी सुखरूप असून तेल गळती वगैरे झालेली नसल्याचे जहाजाच्या मालकांनी निवेदन दिले आहे.

 

सुएझ कालवा खूप अरुंद म्हणजेच जेमतेम अर्धा मैल आहे आणि त्याची लांबी १२० मैल एवढीच आहे.

मंगळवारी जोरदार वारा सुटल्यामुळे सुएझ कालव्याच्या काठावर वाळूचा मोठा थर जमला. वाऱ्याचा वेग तशी ४६ मैल असल्याने खूप धूळ उडत होती आणि म्हणून जहाजाने आपले नियंत्रण गमावले आणि जहाज भरकटून वाळूत अडकले. २ लाख टन वजन घेऊन हे जहाज चीन कडून रॉटरडॅमकडे निघाले होते.

 

हे जहाज एखाद्या व्हेलमाशासारखे आहे. अवाढव्य वजनामुळे वाळूत ते खूप खोलवर रुतले आहे. याचे वजन कमी करण्यासाठी त्यातील मोठे मोठे कंटेनर्स, तेल आणि पाणी यांचे वजन कमी करावे लागेल. जहाजाचा पुढचा साधारण ५ मीटर लांबीचा भाग कालव्याच्या भिंतीत घुसला आहे. तो बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु आहे.

 

suez canal_1  H
 

या ४०० मीटर लांबीच्या जहाजाने आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या सगळ्यात व्यस्त अश्या कालव्यातील दळणवळण ठप्प करून टाकले आहे. १५६ मोठी मालवाहू जहाजे, तेल आणि गॅस वाहून नेणारे टँकर्स आणि अन्नधान्य नेणारी जहाजे या सर्वानी तिथे चांगलीच गर्दी केली आहे. जगातील सुमारे ३० टक्के जहाजे या कालव्यातून जातात आणि जागतिक व्यापाराच्या १२ टक्के व्यापार या अरुंद कालव्यातून केला जातो. एवढी वर्दळ असूनही कित्येक वर्षात जहाजांनी असा ट्रॅफिक जॅम पहिला नसेल. जहाजाचे मालक शोई किसेन कैशा यांनी गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.

 

वाळू उपसण्याचे काम जोरात सुरु आहे. असे असले तरी वाहतूक सुरळीत व्हायला रविवार किंवा सोमवार उजाडेल असे सुएझ कालवा अथॉरिटीजनी सांगितले.

 

बाकीच्या जहाजांना रस्ता मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागेल किंवा केप ऑफ गुड होप वरून जावे लागेल. पण या मार्गावरून जायचे तर प्रवास दोन आठवडे लांबेल.

 

कालवा अरुंद असल्याने आणि वर्दळ जास्त असल्याने जहाज वाळूत फसण्याचे अनेक प्रसंग येत असतात. परंतु हा प्रसंग सगळ्यात मोठा आहे.

 

Source : youtube, wikipedia, hindustan times, ndtv, indianexpress

Giant cargo ship with all Indian crew blocks the Suez Canal.

 

 

 

Powered By Sangraha 9.0