भारत आणि अर्मेनिया दक्षिण काकेशस मधील तुर्की-पाकिस्तान संबंध कसे हाताळणार?
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
भारत आणि अर्मेनिया यांच्यातील संबंध पुन्हा एकदा भारतीय आणि अर्मेनियाच्या पत्रकार, राजकारणी आणि मीडियामध्ये चर्चेत येण्यास नागरोनो काराबाख मधील ४४ दिवसांचे युद्ध कारणीभूत ठरले आहे. पूर्वी अझरबैजानने तुर्कीच्या मागणीनुसार सीरियामध्ये हजारो जिहादी पाठविले असल्याने आणि त्यांना लष्कर देखील पुरविल्यामुळे या युद्धामध्ये तुर्की आणि पाकिस्तान्यांनी अझरबैजानला आपला पाठिंबा दिला. पाकिस्तानने त्यांना तार्किक आणि तांत्रिक मदत केली.
अश्याप्रकारे या दोन घटनांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष दक्षिण काकेशसकडे वेधले गेले. या घटनेमुळे तुर्कीची पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्य विस्तारण्याची आणि रेसेप तय्यप एर्दोगन यांची जगातील तुर्की सैन्य उभारण्याची घोषणा प्रत्यक्षात उतरण्याची मनीषा जगापुढे आली.
भारत- अर्मेनिया यांच्यातील सांस्कृतिक इतिहास -
भारतामधील अर्मेनियम समाजामुळे ( दिल्ली, सुरत, मद्रास, मुर्शिदाबाद आणि कलकत्ता ) भारत आणि अर्मेनिया यांच्या संबंधातील सत्यता स्पष्ट होते. थॉमस कॅना हे भारत आलेले पहिले आर्मेनियन होते. ई. स. ७८० मध्ये ते मलबार बंदरावर पोचले आणि कोडुन्गल्लूरच्या शासनकर्त्यांनी त्यांना व्यापाराची परवानगी दिली. अर्मेनियाच्या समुदायाबद्दल अजून एक माहिती आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या एका पत्रामधून मिळते. "खरोखरच जगातील ते सर्वात प्राचीन व्यापारी आहेत. त्यांनी मुघल राजवटीत जवळपास सर्वच खेडी पादाक्रांत केली आहेत. आणि अतिशय कुशल तऱ्हेने अनेक वस्तूंची त्यांना पारख आहे. आपल्या पूर्वजांपेक्षा त्यांना अनेक गोष्टी ज्ञात आहेत आणि आमच्या लिनन ड्रेपर पेक्षा ते प्राचीन आहेत." असे पत्र ईस्ट इंडिया कंपनीने बंगालला पाठविले आहे. तसेच कलकत्त्याच्या अर्मेनियन महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या अर्मेनियन इतिहासकार मेसरोवब जेकब सेठ यांनी त्यांच्या " अर्मेनियन्स इन इंडिया " या पुस्तकात " युरोपियन लोकांसारख्या अर्मेनियम लोकांनी भारतात वसाहती वसवल्या नाहीत " असे नमूद करून ठेवले आहे. हे सत्य भारत आणि अर्मेनियामधील फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. ते अनेकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे.
अर्मेनियामध्ये भारतीयांची संख्या फार थोडी आहे. असे असले तरी, येरेवान मध्ये वैद्यकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. अर्मेनिया ने २०१७ मध्ये भारतीयांसाठी व्हिसा-रहित प्रवेश देऊ केला आहे. एवढेच नाही तर तेथे भारतीय रेस्टॉरंट्सची संख्या वाढत आहे. नागरोनो काराबाख युद्धात बेघर झालेल्यांना " इंडियन मेहक रेस्टॉरंट अँड बार " या भारतीय रेस्टॉरंटने तयार अन्नाची पाकिटंही पुरविली आहेत. अर्मेनियन सैनिकांना वैद्यकीय शाळेत शिकणाऱ्या २१ वर्षाच्या संजय यादव या मुलाने पाणी आणि अन्न पुरविले.
तथापि, सांस्कृतिक संबंधांच्या पलीकडे हे संबंध आहेत. दोन्ही देशांचा दक्षिण काकेशसमध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टीने सामरिक संबंध प्रस्थापित करण्याकडे जास्त कल आहे.
अर्मेनिया आणि दक्षिण काकेशस यांच्याविषयी भारताचा सामरिक दृष्टिकोन -
सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या नागरोनो काराबाख युद्धाचा भारताने व्यवस्थित आढावा घेतला. स्पष्टपणे बोलायचे झाले तर, दक्षिण काकेशसमध्ये धोरणांचा अभाव असूनही, भारताने शांततेने समस्येचे निराकरण करण्यावर भर दिला आहे.
अर्मेनियाशी १९९२ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा विसाव्या शतकातील पहिला देश म्हणजे भारत. १९९५ मध्ये आर्मेनिया आणि भारत यांच्यात मैत्रीचा करार झाला.
जरी भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी २०२० मधील युद्धाविषयी भारतीय माध्यमांनी अर्मेनियाला आपलं जोरदार समर्थन दिलं आहे. हा योगायोग नसून भारत आणि अर्मेनिया यांच्यातील जिओपॉलिटिकल संबंध याला कारणीभूत आहेत. भारत आणि अर्मेनिया दोघेही मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करतात. आणि या सामायिक गोष्टीमुळे ते एकत्र आले आहेत.
दक्षिण काकेशसमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ओएससीई मिन्स्क ग्रुपच्या माध्यमातून रशिया, फ्रांस आणि अमेरिका खूप काळापासून प्रयत्नशील आहेत. परंतु तुर्कीने या प्रयत्नात चुकीची भूमिका घेतल्याने सगळे बिघडले.
तुर्की किंवा पाकिस्तानी असलेले परंतु सीरियाच्या बाजूने लढणारे हेर सैनिक अझेरी सैनिकांना पाठिंबा देत होते. यामुळे तुर्की- पाकिस्तानी आणि अझरबैजान यांची युती उघडकीस आली. इस्लामाबादमधील सरकार आणि सोशल मीडियानेही बाकू च्या समर्थनार्थ जोरदार हल्ले केले. या सर्वांमुळे भारत आणि अर्मेनियाला कट्टर इस्लामीकीकरणाच्या धोक्याला तोंड द्यावे लागेल. पाकिस्तान आणि तुर्कीची विस्तारवादी आणि साम्राज्यवादी महत्वाकांक्षा ही मोठी भौगोलिक राजकीय चिंता भारत आणि अर्मेनियाच्या समोर आहे. दक्षिण काकेशस मधील एनर्जी पॉलिटिक्समध्ये अधिक बलवान होण्याच्या हव्यासापायी आणि मॉस्कोच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या उद्देशाने अंकाराने इस्लामाबाद आणि बाकू यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. रिसेप तय्यप एर्दोगन आणि इम्रान खान यांचे इस्लामिक जगताचे नेते होणे हे स्वप्न आहे. हाच त्रिकोण आर्मेनिया आणि भारताच्या चिंतेचं कारण बनला आहे.
भारताने संरक्षण, अर्थकारण, संस्कृती आणि मुत्सद्दीपणाने दक्षिण काकेशस मधील धोरण तयार केले पाहिजे. भारत ' आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' च्या माध्यमातून संरक्षणाच्या बाबतीत स्वदेशीकरांचे युग निर्माण करीत असताना त्याच्यासाठी अर्मेनिया ही मोठी बाजारपेठ ठरेल. त्याचबरोबर ग्रीस, सायप्रस, फ्रांस, युएई , सौदी अरेबिया आणि इजिप्त या तुर्कीविरोधी असलेल्या देशांच्या युतीमध्ये भारत आणि अर्मेनिया जाऊ शकतात.
त्याचबरोबर संयुक्त व्यवसाय मंच स्थापन करणे आणि गुंतवणुकीची क्षेत्रे शोधणे हे ही दोघांसाठी फायद्याचे ठरेल. अर्मेनिया आणि भारत यासारख्या आयटी हब असणाऱ्या देशाने आपल्या देशातील तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. त्यांना तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या साहाय्याने एकत्र आणले पाहिजे.
भारत आणि आर्मेनियन धोरणकर्त्यानी अर्मेनिया आणि बांगलादेशातील अमानुष नरसंहार उघड करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. जर भारत आणि अर्मेनिया यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या धोरणात सुधारणा केली तर दोघांसाठी ती फायद्याचीच गोष्ट ठरेल.
अरारात कोस्टानियां आणि भावदीप मोदी यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद.
Source- The Daily Guardian, youtube, Wikipedia, google