रिहानाचे किसान प्रेम हा तेजस जेट खरेदी आणि भारतीय कोरोना लसीचा परिपाक तर नव्हे?

07 Feb 2021 13:43:45

रिहानाचे किसान प्रेम हा तेजस जेट खरेदी आणि भारतीय कोरोना लसीचा परिपाक तर नव्हे?

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk )

 

 

काही महिन्यांपूर्वी संसदेने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यासंदर्भात गेल्या ३ महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला २ फेब्रुवारी,२०२१ रोजी अमेरिकेतील पॉप स्टार रिहाना हिने ट्विट केले. तिचे ट्विट पाहून भारतीय राजकारणी, सामान्य जनता, सरकारविरोधी शक्ती तसेच सामाजिक-राजकीय गट अवाक झाले. रिहानाने सलामी दिली आणि तिच्यापाठोपाठ पॉर्न स्टार मिया खलिफा, तथाकथित पर्यावरण युवा कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग यांच्यासह अमेरिका आणि युरोपातील अनेक जणांनी तिचीच री ओढली आणि आंदोलन भडकवले.

 

कोणत्याही भारतीय विचारवंत, प्रसारमाध्यमे, राजकीय नेते, विश्लेषक किंवा बुद्धिजीवी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने रिहाना-मिया-ग्रेटा यांच्या ट्विटर वरील उद्रेकाचा सम्बन्ध भारतीय हवाईदलाच्या तेजस फायटर जेटच्या मोठ्या ऑर्डरशी आणि ईएएम श्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कोविड लस सध्या विशेष भारतीय विमानांद्वारे जगातील प्रत्येक कोपऱ्यात युद्धपातळीवर पोहचवण्यात येत असल्याशी जोडला नाही हे विशेष.

 

समांतर बाबी- अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव आणि त्यांची नो वॉर पॉलिसी आणि मोदीविरोधी अशांतता:

 

तेजस जेट ऑर्डर आणि भारतीय कोरोना लस यांचा संबंध मी रिहानाशी जोडतोय याच्या मागचं कारण म्हणजे " ट्रम्प चा पराभव आणि मोठ्या प्रमाणात त्याच्याशी संबंधित असलेला निवडणूक घोटाळ्याचा आरोप."  गल्फ कंट्रीज आणि नाटोच्या सदस्यांसह जगभरातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना ट्रम्पनी अगोदरच अमेरिकन सैन्य तैनातीचे बिल पाठवावे लागेल हे स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र लॉबीमुळे त्यांचा अफगाणिस्तानला खेचून काढण्याचा निर्णय फसला. ट्रम्पच्या कारकिर्दीत संपूर्ण जगात अमेरिकन सैन्याचा अनावश्यक हस्तक्षेप नव्हता. त्यांच्या युद्धविरोधी भूमिकेची त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली.  अमेरिकेतील उदारमतवादी शस्त्रास्त्रांच्या लॉबी सह आणि युद्धाच्या अर्थव्यवस्थेवर उपजीविका करणार्यांनी ट्रम्प विरोधात कट रचून जोरदार मोहीम चालवली आणि ट्रम्पचा पराभव झाला.

 

भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय हवाई दलाने ४७००० कोटी रुपये खर्चून ८३ स्वदेशी फायटर जेट विमाने बुक केली आहेत. तेजस प्रकल्प ३८ वर्षांपूर्वीच सुरु करण्यात आला होता. परंतु आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र लॉबीच्या ढवळाढवळीमुळे आणि विशेषतः भारत सरकारच्या उदासीनतेमुळे त्यास उशीर झाला आणि आतापर्यंत तो सुरु झाला नाही. पंतप्रधान मोदींनी अंतर्गत विरोध, लाल फितीचा कारभार आणि कटकारस्थाने यांच्यावर मात करत यशस्वीपणे ते पुढे रेटलं.

 

कोविड १९ च्या लसीच्या बाबतीतसुद्धा, सर्व भाकितांना छेद देत भारतीय औषध कंपन्यांनी कोविड लस नुसती शोधून काढली नाही तर खूप मोठ्या प्रमाणात तिचं उत्पादन ही केलं. तसेच देशांतर्गत मागणीबरोबरच संपूर्ण जगभरातील लोकांची मागणी देखील पूर्ण करण्यास सुरुवात केली. कोट्यवधी डॉलर्सची स्वप्ने पाहणाऱ्या परदेशी फार्मा कंपन्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांची स्वप्ने भंग पावली. त्यामुळे मोठ्या औषध कंपन्या मोदींना मोठा दणका देतील.


Rihanna Mia Khalifa Greta

 

रिहाना - मिया - ग्रेटा या त्रिकुटातील साम्य म्हणजे त्यांच्या ट्विट्स साठी किंवा पांढरपेशा वक्तव्यांसाठी कोणी पैसे दिलेत याची त्यांना पुसटशी सुद्धा माहिती नसते. या जगात शस्त्रे आणि औषध कंपन्या यांचीच वट असते. सर्वात सामर्थ्यवान हीच लॉबी आहे. आतापर्यंत कोणीही त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक हल्ल्याचा सामना करू शकला नाही. भारतीय सशस्त्र दलाच्या स्वदेशीकरणाला तेजस फायटर जेटच्या रूपाने गती देऊन आणि कोविड लसीच्या बाबतीत जगभरात विक्रमी वेळात क्रांती करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शक्तिशाली, क्रूर आणि सर्वात घाणेरड्या लॉबीला चिथवले आहे. मोदींना नमविण्यासाठी त्यांच्या पाडाव करण्यासाठी या सर्व शक्ती ५-डी द्वारे सज्ज झाल्या आहेत. 

 

भारतीय नेतृत्त्व नष्ट करण्यासाठीचे ५- डी मॉडेल -

 

Defame – Denigrate – Delegitimise – Destabilise – Dethrone ( बदनामी - कमी लेखणे - बेकायदेशीर - अस्थिरता - पदच्युत ) हे ते ५- डी मॉडेल आहे जे त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यशस्वीपणे वापरले आहे. या मॉडेलच्या यशस्विततेची पारख झाल्यामुळे या लॉबीना रेडिमेड सेटअप देण्यात आला आहे. आता या मॉडेलची पुनरावृत्ती नरेंद्र मोंदींवर करण्यास सुरुवात झाली आहे. यांच्यातील मोठी त्रुटी म्हणजे त्यानी हे मॉडेल वापरण्याची घाई केली. ग्रेटाने केलेल्या घोडचुकीमुळे हे मॉडेल उघडकीस आले आहे. नजीकच्या काळात, भविष्यात जर भारतीय धोरणांविरुद्ध कोणत्याही परदेशी व्यक्तीने सहजच अगदी मनापासून एखादी कमेंट केली तरी " टूलकिट कुठे आहे?" हा प्रश्न विचारला जाईल. ग्रेटाच्या वेंधळेपणामुळे हे उघडकीस आले आणि आता हाच वारसा तिने मागे सोडला आहे.

 

म्हणूनच, रिहाना - मिया- ग्रेटा यांचा कृषी कायद्याशी काही संबंध नसला तरी पंतप्रधान मोदींसाठी नक्कीच एक संदेश आहे.

 

विनय जोशी यांच्या आर्टिकलचं भाषांतर

 

Source :  https://www.icrr.in/Encyc/2021/2/5/Rihanna-Mia-Greta-Outrage-Of-The-Trio-More-to-do-with-Tejas-Jets-order-and-Indian-Covid-Vaccine-Blitzkrieg-Connecting-it-with-Farmers-Protest-is-an-act-of-easy-acquittal-.html 

 

 

Powered By Sangraha 9.0