पाकिस्तानकडे अतिशय शक्तिशाली नौकाविरोधी शस्त्र?

01 May 2020 22:33:36

पाकिस्तानकडे अतिशय शक्तिशाली नौकाविरोधी शस्त्र?

 

पाकिस्तान लवकरच एक शक्तिशाली आणि जहाजांना मारक असे लढाऊ शस्त्र प्रक्षेपित करण्याच्या तयारीत असावे.

 

जुन्या एफ-१६ आणि मिराज जे-७ याच्या जोडीला पाकिस्तानने चीनकडून शंभरहून अधिक जेएफ -१७ विमाने मागवली आहेत. ही लढाऊ विमाने शत्रूच्या युद्धनौकेचा अचूक वेध घेण्यास सक्षम असतील. ही विमाने एकाच इंजिनावर चालतात. भारताकडे लढाऊ विमानांचा ताफा आहे. त्यापैकी अनेक विमाने युद्धनौकेवर आहेत. या विमानांना जेएफ-१७ भारी पडू शकते. २०१७-२०१८ मध्ये इस्लामाबादच्या हवाई दलाने साठ सीएम -४०० एकेजी नौकाविरोधी मिसाईल्स खरेदी केली होती.

 

चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनची सीएम-४०० ही विलक्षण निर्मिती आहे. खूप मोठ्या उंचीवर उड्डाण करणारे हे नौकाविरोधी मिसाईल इतर मिसाईलच्या तुलनेत शक्तिशाली आहे.

 

सुपरसोनिक स्टँडऑफ क्षेपणास्त्र सर्वप्रथम २०१२ मध्ये चीनच्या झुहाई येथे एका एअर शोमध्ये दिसून आले. जेएफ-१७ च्या प्रक्षेपणाच्या वेळी हे क्षेपणास्त्र दाखविण्यात आले. चीनने पाकिस्तान, म्यानमार आणि नायजेरियाला जे मिग-२० प्रति २० मिलियन डॉलर्सला विकले त्याच्यापेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली असे हे जेएफ-१७ आहे. 

 
400 AKG_1  H x

 

सहा वर्षांनंतर पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की त्यांनी एकूण १०० मिलियन डॉलर्स किमतीची साठ सीएम- ४००एकेजी खरेदी केली होती.  यामुळे जेएफ-१७ हे सगळ्यात प्रभावशाली नौकाविरोधी ठरले आहे.

 

सीएम -४०० एकेजीचे वजन सुमारे 2 हजार पौंड आहे आणि ते एकतर ३०० पौंडचे फ्रेगमेंटेशन वॉरहेड किंवा ४०० पौंडचे पेनिट्रेटिंग वॉरहेड घेऊ शकते. हे सुमारे १५० मैलांपर्यंत उड्डाण करू शकते.

 

या क्षेपणास्त्रामध्ये एक अंतर्गत नेव्हिगेशन सिस्टम बसविली आहे जी लक्ष्याचा अचूक मार्ग काढू शकते. यामध्ये कमीत कमी त्रुटी आहेत. लक्ष्याचा मार्ग १५ फूट इकडे तिकडे होऊ शकण्याची शक्यता पन्नास टक्के आहे. सूत्रांनी सांगितले की शत्रूवर काही सेकंदातच मारा करण्याची याची क्षमता आहे. ते आवाजाच्या पाचपट वेगाने बाहेर येऊन मारा करते. 

 

काहींनी तर भारतीय सशस्त्र दलाच्या ब्राम्होस क्रूझ क्षेपणास्त्राची तुलना याच्याशी केली आहे. सोव्हिएत ओनीक्स क्रूझ क्षेपणास्त्र, हवेत, समुद्रात, समुद्रतळाशी आणि जमिनीवर चालणाऱ्या आणि वेगाने उड्डाण करून ३७० मैल अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या ब्राम्होसची याच्याशी तुलना.

 

सीएम -४०० एकेजीचा आकार, श्रेणी आणि अचूकता इतर नौकाविरोधी शस्त्रास्त्रांसारखीच आहे. यांच्यामध्ये वेगळेपण काही असेल तर ते म्हणजे याची उड्डाण करण्याची पद्धत. सापडले जाण्याच्या भीतीपोटी इतर नौकाविरोधी क्षेपणास्त्रे कमी उंचीवरून उडविली जातात. पण त्याउलट सीएम -४०० एकेजी एकदम उंचावरून उडविली जातात. समुद्रसपाटीपासून २६,२०० आणि ३९,४०० फुटांवरून ही उडविली जातात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांप्रमाणे यासाठी घन इंधन वापरले जाते. कमी उंचीवरून उडणारी  क्षेपणास्त्रे द्रव इंधन आणि मोटार वर चालणारी असतात.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

source: nationalinterest

 

Pakistan’s Got a Weird and Powerful Anti-Ship Weapon (Can It Sink India's Aircraft Carrier?)

Powered By Sangraha 9.0