तुम्ही जगाला धोक्यात घालत आहात : जर्मनीचे चीनला खुले पत्र.

22 Apr 2020 22:18:44

तुम्ही जगाला धोक्यात घालत आहात : जर्मनीचे चीनला खुले पत्र.

 

जर्मनीमधील सर्वात मोठ्या बिल्ड या पेपरने कम्युनिस्ट पक्षाला आणि शी जिनपिंग यांना  कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाबद्दल आणि त्यांनी केलेल्या मानवी हक्कांच्या पायमल्ली बद्दल दोषी ठरवून त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

 

बिल्डचे प्रमुख संपादक ज्युलियन रॅशेल यांनी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात," बर्लिनमधील आपल्या दूतावासाने मला खुले पात्र लिहून संबोधित केले आहे. कारण आम्ही आमच्या वृत्तपत्रात बीजिंगला प्रश्न केला होता की कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीसाठी जगातील देशांस चीन नुकसानभरपाई देणार की नाही? " असा प्रश्न विचारला आहे.

 

त्यांनी लिहिले की, " कोरोनाव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे हे तुमच्या सरकारला आणि शास्त्रज्ञांना फार पूर्वीच माहित असावे, पण असे असूनसुद्धा तुम्ही जगाला या महाभयंकर रोगाच्या खाईत लोटले आहे. पाश्चात्य शास्त्रज्ञांनी वुहानमध्ये काय चालले आहे असे विचारले असता तुमच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी यावर मौन पाळले. त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. या रोगासंबंधी माहिती देणे म्हणजे आपल्या राष्ट्राची बदनामी करणे असे तुम्हाला वाटत होते. परंतु ते तसे नसून उलट तुम्ही वेळेवर लोकांना सावध केले असते तर त्याचा तुम्हाला खूप अभिमान वाटला असता."

 

रॅशेल म्हणाले की, " तुम्ही पाळत ठेवून राज्य करता. आणि पाळत ठेवल्याशिवाय तुम्ही अध्यक्ष राहणार नाही. तुम्ही सगळ्यांवर हुकूमत गाजवता. अगदी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकावर. पण तुम्हाला तुमच्या प्राणी मार्केट मधून पसरलेल्या एका रोगावर नियंत्रण ठेवता आले नाही. तुम्ही तुमच्याविरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक वर्तमानपत्रावर, वेबसाईटवर बंदी घातली. पण तुम्ही वटवाघळाचं सूप विकणाऱ्या दुकानावर बंदी घातली नाही. तुम्ही तुमच्या लोकांवर नुसतीच हुकूमत गाजवत नाही तर त्यांच्या आयुष्याशी खेळत आहात. पर्यायाने तुम्ही संपूर्ण जगाला वेठीस धरलंय.

 

 "पाळत ठेवणे म्हणजे स्वातंत्र्य नाकारणे. जे राष्ट्र स्वतंत्र नाही ते कधीच सर्जनशील राहू शकत नाही. ते कधीच नाविन्यपूर्ण कल्पना अमलात आणू शकत नाही. नवीन गोष्टींचा शोध लावू शकत नाही. त्यामुळेच बौद्धिक मालमत्ता चोरीमध्ये आपण आपल्या देशाला जागतिक विजेते बनविले आहे. चीन स्वतः काही शोध लावायच्या ऐवजी इतरांचे शोध चोरून स्वतःला समृद्ध बनवते. तुम्ही तुमच्या देशातल्या नवीन पिढीला मोकळेपणे विचार करू देत नसल्याने चीन नवनिर्मिती करत नाही. आणि नवनवीन शोध लावत नाही. यातूनच कोरोनाव्हायरसचा जन्म झाला आहे."

 

xi_1  H x W: 0

 

चीनच्या दूतावासातील प्रवक्ते ताओ ली यांनी दूतावासाच्या वेबसाईटवर जर्मन मधून एक खुले पत्र  लिहिले आहे. " मी कोरोनाव्हायरस संदर्भातील तुमचे प्रत्येक वार्तापत्र वाचतो. आणि आज तर तुम्ही चीन दोषी असल्याची बातमी दिली आहे. एखाद्या देशाला जागतिक महामारीबद्दल अश्याप्रकारे दोषी ठरवणे चुकीचे आहे. चीनच्या कर्जाखाली आपला देश दबलेला असताना तर अश्या प्रकारची लेखनाची शैली वाईट आहे. हे आर्टिकल लिहिताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालंय असं दिसतंय. अनेक देश या महामारीविरुद्ध लढत आहेत. आणि चीनने डब्ल्यूएचओला या महामारीविषयी पूर्ण माहिती दिल्यानंतर आता अनेक देश आपल्या सीमा बंद करून आहेत. हे लक्षात घ्यायला हवे. "

 

कोरोनाव्हायरसच्या हानीसाठी चीनने जर्मनीला १४९ अब्ज डॉलर्स दिले आहेत. आणि त्यामुळेच दूतावासातून हा संतापजनक प्रतिसाद बिल्डला ऐकावा लागला.

 

बिल्डच्या प्रमुख संपादकांनी वॉशिंग्टन पोस्ट लेखाचा हवाला देऊन म्हटलंय, " वुहानमधील आपली प्रयोगशाळा सुरक्षेची सर्वोच्च मानके न पाळता वटवाघळामधील कोरोनाव्हायरसवर प्रयोग करीत आहेत. राजकीय कैद्यांसाठी ज्याप्रमाणे तुमचे तुरुंग सुरक्षित नाहीत त्याप्रमाणे आपल्या प्रयोगशाळा विषारी का आहेत? जगातील कोरोनाबाधितांच्या दुःखी विधवा, मुली, मुले, पती, पालक यांना तुम्ही कोणते स्पष्टीकरण देऊ इच्छिता? "

 

"तुमच्या देशात तुमच्याविरुद्ध लोक कुजबुजत आहेत. तुमची शक्ती क्षीण होत चाललीय. तुम्ही चीनची प्रतिमा अविश्वसनीय, अपारदर्शक अशी तयार केलीय. कोरोनाच्या आधी चीन एक पाळत ठेवणारा देश  म्हणून ओळखला जात होता. आता तो जगाला महामारीच्या खाईत लोटणारा म्हणून ओळखला जातोय. हाच तुमचा राजकीय वारसा आहे." रॅशेल आपल्या खुल्या पत्रात म्हणतात.  

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : THE JERUSALEM POST

 

Germany’s largest paper to China's president: You're endangering the world

 

Germany, China, Xi Jinping

 

Powered By Sangraha 9.0