चीनने जगाची दिशाभूल केली.- डॉ. अँथनी फॉसी.

15 Apr 2020 20:40:48


चीनने जगाची दिशाभूल केली.- डॉ. अँथनी फॉसी.

 

 

मानवाला एकमेकांच्या संपर्कामुळे कोविद-१९ ची लागण होऊ शकते ही महत्त्वाची बातमी चीनने लपवून ठेवली. हा संसर्गजन्य रोग नसून तो केवळ प्राण्यांच्यातच संक्रमित होतो असे सांगून चीनने जगाची दिशाभूल केली. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने अमेरिकेसह संपूर्ण जगाची फसवणूक केली आहे. डिसेंबरच्या मध्यातच या रोगाचा उद्रेक चीनमध्ये झाला. आणि जानेवारीमध्ये संपूर्ण वुहान आणि त्याच्या जवळच्या हुबेई प्रांतात तो जोमाने पसरला. पण त्यावेळी मानवामध्ये याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चिनी सरकारचे म्हणणे होते असे डॉ. अँथनी फौकी यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोनाव्हायरस टास्क फोर्सचे डॉ. फॉसी हे महत्त्वाचे सदस्य आहेत.

 

कम्युनिस्ट सरकारने सुरुवातीपासूनच या व्हायरसबाबत खूप लपवाछपवी केली. कोविद-१९ हा संसर्गजन्य आणि प्राणघातक रोग आहे हे जगाला आधीपासून प्रामाणिकपणे सांगायला हवे होते. खरी माहिती लपवून खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी चीनला शिक्षा झाली पाहिजे. असे डॉ. फॉसी म्हणतात.

 

रिपब्लिक पक्षाने चीनच्या कम्युनिस्ट पक्षावर जाणूनबुजून कोविद-१९ चा प्रसार लपवून ठेवल्याचा आरोप केला आहे. जागतिक महामारीबद्दल सोशल मीडियाद्वारे जगाला इशारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ डॉक्टर्सना कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीने धमकावले.

 
Dr. Anthony_1  

 

चीनने या आजाराबद्दल लपवून तर ठेवलेच पण त्यासोबत एकीकडे तो जगभरातून मोठ्या प्रमाणात  वैद्यकीय उपकरणांची खरेदी करत होता. जेव्हा जगात ही महामारी पसरली आणि अनेक देशातील अनेक लोक या रोगाला बळी पडू लागले आणि काही देशांनी तर आपल्या रुग्णांना ठार मारायला सुरुवात केली तेव्हा चीनची प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली. अनेक देश या चिंतेत असताना चीनने हा रोग पसरवण्यास अमेरिका कारणीभूत आहे असे सांगायला सुरुवात केली. अमेरिकन सैन्याने वुहानमध्ये हा विषाणू जाणूनबुजून पेरला असा प्रचार चीनने सुरु केला.

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इंफेक्शस डिसीजेसचे संचालक असलेले डॉ. अँथनी फॉसी हे अमेरिकनांचं जीवन वाचविण्यासाठी स्वतः कोविद-१९ बद्दलच्या माहितीसाठी चीनवर अवलंबून होते. जेव्हा पश्चिमेला हा व्हायरस पसरायला सुरुवात झाली तेव्हा डॉक्टर फॉसी यांनी " अमेरिकेतील लोकांना याचा काहीच धोका नाही आणि त्यांनी अजिबात काळजी करू नये." असे विधान केले होते.

 

डॉ. फॉसी म्हणाले की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनने माहिती दिली की हा रोग प्राण्यांकडून माणसाकडे जात आहे. पण जेव्हा तिथे रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा ते म्हणाले की माणसांना हा रोग होण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. आणि त्यांचे हे ऐकून मी वरील स्टेटमेंट केले. 

 

जर चीनने प्रथम दिलेली बातमी खरी असती तर माझे हे स्टेटमेंट खरे सिद्ध झाले असते. एवढेच नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा बातमीची शहानिशा न करता चीनचीच ' री ' ओढली. चीनमधील काही डॉक्टर्स याबद्दल खरी माहिती सोशल मीडियावर देत असले तरी त्या संबंधीची पडताळणी सुद्धा डब्ल्यूएचओने केली नाही.

 

चीनने दिलेल्या खोट्या माहितीवर विसंबून राहिल्याने अमेरिकेवर हा प्रसंग उद्भवला असल्याचे डॉ. फॉसी म्हणाले.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk )

 

Source : The Washington Times

 

Dr. Anthony Fauci: China misled the world; virus erupted in mid-December

 

 

 

Powered By Sangraha 9.0