चायना व्हायरस- कम्युनिस्टांची दडपशाही आणि सामान्य चिनी नागरिक.
कम्युनिस्ट ही अशी जमात आहे जी स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे आपली मते बदलत असते. कम्युनिस्ट म्हणजे हुकूमशाही. कम्युनिस्ट देश कधीही लोकशाहीचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विचार रुजू देत नाहीत. पोपच्या हुकुमाप्रमाणे जसा राज्यकारभार चालतो तश्याचप्रकारे कम्युनिस्ट सरकार आपल्या पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालते. पोपच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यावर जसा ब्लास्फेमीचा आरोप ठेवला जातो त्याला पाखंडी समजले जाते त्याप्रमाणे चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना ( सीसीपी ) यांच्या एखाद्या आदेशाचे उल्लंघन हा गुन्हा ठरवलं जातो. त्यांच्या इच्छेविरुद्ध गेलेली व्यक्ती राजद्रोही ठरते. डॉक्टर ली वेनलिंग यांनी चीन व्हायरसच्या धोक्यांविषयी जगाला सावध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना सीसीपीने देशद्रोही ठरविले.
डॉ. ली यांच्या जगाला या व्हायरस विषयी अवगत करण्यामुळे त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला त्याचे उत्तम वर्णन न्यूयॉर्क टाईम्सचे निकोलस डी. क्रिस्तोफ यांनी केले आहे. " चिनी सरकारने व्हायरस विरुद्ध ठोस पाऊल उचलण्याऐवजी याविषयी जगाला अवगत करणाऱ्याविरुद्धच कारवाई केली. डिसेंबर २०१९ मध्येच या व्हायरसची लक्षणे आणि कारणे या शास्त्रज्ञाने ओळखली होती. हा संपूर्ण जगाचा नाश करू शकतो हे त्यांच्या तेव्हाच लक्षात आले होते. त्यांनी ३ जानेवारीला बीजिंगला याविषयीची संपूर्ण माहिती दिली होती. चीनने त्या माहितीकडे दुर्लक्ष करून त्यांची मुस्कटदाबी केली आणि त्यांना सगळे नमुने आणि पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले. आणि यामुळेच हा रोग जगापासून लपून राहिला."
कम्युनिस्ट पार्टी त्यांच्या प्रचारातच गुंतून राहिली आणि अश्या प्रकारच्या साथीच्या रोगात घ्यावयाच्या खबरदारीकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. आरोग्यसेवा हा महत्त्वाचा भाग आहे हेच ते आपल्या प्रचाराच्या धामधुमीत विसरले. एवढेच नाही तर सर्वात भव्य अश्या रात्रीच्या मेजवानीत ते अडकून पडले. या मोठ्या पार्टी मध्ये ४०,००० हून अधिक कुटुंबे सामील झाली होती. त्यांचे हे वागणे खूपच संशयास्पद आहे. जणूकाही कम्युनिस्ट पार्टीला हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरायला हवा होता असेच त्यांचे वागणे होते. त्यांना या व्हायरस संबंधी वेळीच सावध केलेले असूनही त्यांनी सुमारे २,००,००० प्रवासी तिकिटे विनामूल्य जनतेमध्ये वाटली. प्रवासबंदी खूप उशिरा घातली. प्रवसबंदीचे आदेश देईपर्यंत जवळपास ५ लाख नागरिकांनी वुहानमधून संपूर्ण जगभर प्रवास केला होता. जाणूनबुजून केलेले असो किंवा सरकारचा मूर्खपणा असो एक मात्र खरे की सीसीपीने जगाला या महामारीत ढकलले. सिसीपीने जगाची माफी मागितली पाहिजे. खरंतर अश्या हुकूमशाही राजवटीपासून जगाला मुक्ती मिळाली पाहिजे. या हुकूमशाही राजवटीने केवळ आपल्या देशातील नागरिकांचे जीवन पणाला लावले नाही तर या भूतलावरील प्रत्येक मनुष्याचे जीवन धोक्यात घातले आहे.
१९९० मधील एक घटना या निमित्ताने आठवतेय. जग शापिंग वांग आणि गाओ याओजी या दोन डॉक्टरांच्या कायम ऋणात राहील. १९९० मध्ये हेनान मधील रक्ताचा बेकायदेशीर व्यापार यांनी उघडकीस आणला म्हणून त्यांना खूप मोठा छळ सहन करावा लागला. रक्ताच्या बेकायदेशीर व्यापारामध्ये एड्स बाधित रक्तही होते. जीव वाचविण्यासाठी त्यांना अमेरिकेत पळून जाऊन निर्वासितांचे आयुष्य जगावे लागले. त्याचप्रमाणे २००८ मध्ये सिचुआन भूकंपात शालेय इमारती पडल्यामुळे झालेल्या मोठ्या दुर्घटनेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडल्याप्रकरणी तान झुरेन नावाच्या एका कार्यकर्त्याचा कम्युनिस्ट सरकारने जबरदस्त छळ केला. कम्युनिस्ट राजवटीचे सिंहासन रक्ताने माखलेलं आहे.
जग कोरोना व्हायरसवर उपाय शोधून आपापल्या नागरिकांना वाचविण्यासाठी धडपडत असताना कम्युनिस्ट शासन आपल्याच नागरिकांना शिक्षा करण्यात व्यस्त आहे. चीनमधील कासी मार्शल लॉचा आधार घेत कम्युनिस्टांनी हाँगकाँगच्या कॉजवे बे पुस्तक विक्रेता गुई मिन्हाई यांना पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. हे पुस्तक चिनी अधिकाऱ्यांच्या दुष्कृत्याविषयी होते. २०१५ मध्ये सिसीपी ने थायलंड मधून त्यांना उचलले होते. त्याचप्रमाणे, त्सिंगुआ विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक झू झांग्रुन आणि झू झियॉंग हे फेब्रुवारीमध्ये अचानक गायब झाले. व्हायरस बद्दलच्या कम्युनिस्ट सरकारच्या कारभाराविषयी सरकारवर टीका केल्यानंतर अचानक ते गायब झाले. सिसिपीच्या कारभाराला तेव्हा जोरात धक्का बसला जेव्हा सरकारच्या गटातील रेन झिकियांग नावाच्या चिनी व्यापाऱ्याने शी जिनपिंगवर एक लेख लिहिला. ज्यात त्याने ," संपूर्णपणे विवस्त्र होऊन देखील आणि विदुषकासारखा दिसत असून देखील राजा होण्याची मनीषा बाळगणारा विदूषक." असे शी जीनपिंगचे वर्णन केले आहे. हा लेख सोशल मीडियावर खूप गाजला. नंतर तो तिथून गायब केला गेला आणि त्या लेखाबरोबरच रेन झिकियांग सुद्धा गायब झाला.
गेल्या काही वर्षांतील जुलमी कम्युनिस्ट राजवटीमुळे आणि नागरिकांवरील अत्याचारामुळे चिनी विचारवंत, मुक्त विचारसरणीचे लोक आणि तरुण यांच्या मनात या राजवटीविषयी असंतोष खदखदतोय. या राजवटीपासून चिनी नागरिकांना सुटका हवी आहे. येत्या काही वर्षात चिनी नागरिकांना जागतिक शक्तींच्या मदतीने या लाल जुलमी राजवटीतून मुक्तता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. कदाचित भविष्यकाळाची गरज ओळखून अमेरिकेने तैवान ला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला असावा.
सिसिपीचे अस्तित्व हे प्रसार यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे देश-विदेशातील मीडियाला त्यांनी विकत घेतले आहे. जागतिक पातळीवर आपली बोली बोलण्यास ते त्यांना भाग पाडतात. जगभरातील पत्रकारांना हाताशी घेऊन चीनने आपली 'व्हायरस पसरवणारा' ही प्रतिमा पुसून 'व्हायरस रोखण्यात यशस्वी' अशी करून घेतली आहे. नंतर त्यांनी याच लोकांना हाताशी घेऊन सर्वसामान्य जनतेला याच्या उगमस्थानाबद्दल संभ्रमित केले. हा व्हायरस अमेरिकेने विकसित केलेले जैविक शस्त्र असल्याची बोंब मारायला त्यांनी सुरुवात केली. हा व्हायरस अमेरिकी सैनिकांनी २०१९ मध्ये वुहान येथे आणला अश्या प्रकारच्या भ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या त्यांनी पसरवल्या. यासाठी अब्जावधी खर्च करून सुद्धा चिनी नागरिक अथवा जगाने यावर विश्वास ठेवला नाही. एवढेच नाही, स्वतःचा ऱ्हास करून घेतानाच त्यांनी डब्ल्यूएचओ ची विश्वासार्हता देखील लोकांच्या मनातून घालवली. इतकी की जपानने त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऐवजी चायना हेल्थ ऑर्गनायझेशन म्हटले आहे.
आपल्या कृत्याविषयी दिलगीर असण्याऐवजी सिसीपी राजकारण खेळण्यात मग्न आहे. यापुढे तरी सगळ्या जगाने एकत्र येऊन चीनला थांबवले पाहिजे.
मूळ लेखक - श्रुतिकार अभिजीत
अनुवाद- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source : ICRR
China Virus: Communist Cover-Up, Suppression & Chinese Civil Society