अवकाशस्थित आण्विक कमांड आणि पारंपरिक आक्रमण क्षमता वापरण्याची अमेरिकेची योजना.
ट्रम्प प्रशासनाच्या २०१८ च्या न्युक्लियर पोश्चर रिव्ह्यू (एनपीआर) च्या अहवालात अमेरिका गरज भासल्यास अण्वस्त्रे वापरेल असे आडवळणाने म्हटले आहे. जर तशीच आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर अमेरिका असे करू शकते असा इशारा या अहवालात दिला गेला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेय की "नॉन न्यूक्लियर हल्ले होऊ शकतात पण तशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही त्याची लेव्हल वाढवू शकतो." अश्याप्रकारे या अहवालात शाब्दिक खेळ केलेले आहेत.
अंतराळ सुरक्षेविषयी चाललेल्या एका ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान स्टेट डिपार्टमेंटच्या ब्युरो ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड नॉनप्रोलीफरेशनचे यूएसचे सहाय्यक सचिव क्रिस्तोफर फोर्ड यांनी आलेल्या टिप्पणीविषयी चर्चा केली. २०१७ च्या नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी मध्ये अमेरिका स्पेस-बेस्ड ड्युअल - यूज ( आण्विक आणि नॉन आण्विक ) दोन्ही मधील म्हणजे प्रभुत्व आणि नियंत्रण यांच्या कसोट्यांवर पात्र ठरला आहे हे अमेरिकन विरोधकांनी २०१८ एनपीआरच्या त्या वाक्याच्या अर्थाचे विश्लेषण करण्याआधी हे लक्षात घेतले पाहिजे असे फोर्ड म्हणाले.
"मी पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका - यू.एस. नॅशनल न्यूक्लियर कमांड, कंट्रोल आणि कम्युनिकेशन्स (एनसी 3) आर्किटेक्चर काही प्रमाणात स्पेस-बेस्ड सिस्टमवर अवलंबून आहे म्हणूनच या आर्किटेक्चरवर हल्ले झाले तर त्याचा परिणाम उलटटपाली आण्विक हल्ल्यात होऊ शकतो. आमच्या स्पेस आर्किटेक्चरच्या अश्या घटकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला किंवा त्यात कुणीही हस्तक्षेप करायचा प्रयत्न जरी केला तर आम्ही त्याच्यावर हल्ला करणारच. तो आण्विक हल्ला नसला तरी समोरून झालेला हल्ला किती क्षमतेचा आहे त्यावर पुढील हल्ला अवलंबून असेल. आमची पुढची पायरी काय असेल हे त्या हल्ल्याच्या तीव्रतेवर ठरविले जाईल." फोर्ड म्हणाले.
फोर्डनी कोणतीही नवीन किंवा आश्चर्यकारक गोष्ट सांगितलेली नाही. आपणा सर्वांना ती माहित आहे. किंबहुना आपण ती गृहीत धरून चाललोय. परंतु चीनसारख्या एखादा अमेरिकेला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशामुळे अडचणी वाढू शकतात. अवकाशातील संकट वाढू शकते. चीन अमेरिकेच्या अवकाशातील जागेवर लक्ष ठेवून आहे. अमेरिकेने जरी अवकाशस्थित न्युक्लियर मालमत्तेच्या कमांड अँड कंट्रोल ची उघडपणे कबुली दिली असली तरी त्यांनी त्यातील मिलिटरीचे किती उपग्रह "आण्विक" आणि किती " आण्विक नसलेले" आहेत याची माहिती स्पष्टपणे दिलेली नाही.
उपग्रहांना घातक अशी शस्त्रे आणि अवकाशाला हानिकारक असलेल्या बाबी अनेक देशात विकसित होत आहेत. त्यांची वाढ द्रुतगतीने होतेय. यामध्ये रशिया आणि चायना आघाडीवर आहेत. त्यामुळे या बाबींवर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच फोर्डने आवर्जून नमूद केली की कोणत्याही संभाव्य शत्रूंनी अतिशय स्वच्छपणे हे समजून घेणे आवश्यक आहे. ही केवळ एक सैद्धांतिक किंवा काल्पनिक बाब नाही हे आमच्या एनसी 3 सिस्टमच्या कक्षेतील उपग्रहांवर हल्ला करणार्यांनी समजून घ्या.
अमेरिकेतील न्यूक्लियर कमांड, कंट्रोल, आणि कम्युनिकेशन्स (किंवा एनसी 3) सिस्टीम खूप मोठी आहे. ज्यामध्ये अतिशय सतर्कतेने काम करणारे उपग्रह, कोणत्याही धोक्याची लगेच जाणीव करून देणारे सेंसर, टेरेस्ट्रियल रडार्स आणि खूप मोठ्या नेटवर्कचे जाळे आहे. २०१८ एनपीआरच्या नंतर अणू वापरासाठी स्पेस बेस्ड एनसी ३ असेट्स किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना समजून चुकले. दुर्दैवाने युनायटेड स्टेट्स आणि चीन यांच्यात सामरिक स्थैर्याबाबत कोणतीही गंभीर चर्चा न झाल्यास खूप मोठा धोका उद्भवू शकतो. या दोन्ही देशांनी परस्पर सामंजस्य राखले पाहिजे.
- प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source : THE DIPLOMAT
Space-Based Nuclear Command and Control and the ‘Non-Nuclear Strategic Attack’