२०० अमेरिकन कंपन्या चीन सोडून भारतात उत्पादन हलविण्याच्या विचारात.

01 Apr 2020 20:52:44

२०० अमेरिकन कंपन्या चीन सोडून भारतात उत्पादन हलविण्याच्या विचारात.

 

 

सार्वत्रिक निवडणुकांनंतर सुमारे 200 अमेरिकन कंपन्या आपला चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग बेस भारतात हलविण्याच्या प्रयत्नात आहेत. कम्युनिस्ट चीन पेक्षा भारत हा खूप चांगला पर्याय आहे असे अमेरिकेतील वकिलांच्या एका गटाचे म्हणणे आहे.

 

चीनला पर्याय म्हणून भारतात गुंतवणूक कशी करता येईल याविषयी चर्चा सुरु असल्याची माहिती यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे (यूएसआयएसपीएफ) अध्यक्ष मुकेश आघी यांनी दिली.

 

नवीन सुधारणांना वाव देण्याची आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची शिफारस यूएसआयएसपीएफ नवीन सरकारकडे करेल असेही आघी म्हणाले.

 

" मला वाटतं हे खूप क्लिष्ट आहे. आम्ही पारदर्शकतेचा आणि कंपन्यांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला नवीन सरकारला देऊ कारण गेल्या वर्ष-दीडवर्षात ठोस निर्णय होईल याकडे अमेरिकेतील कंपन्या डोळे लावून बसल्या आहेत. ई-कॉमर्स किंवा डेटा लोकलायझेशन जास्तीत जास्त देशांतर्गत असावा असा त्यांचा आग्रह आहे," आघी म्हणाले.

 
Make in India_1 &nbs

 

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारताच्या नवीन सरकारचे काय धोरण असेल याविषयी बोलताना ते म्हणाले, "मी भारतसरकारला विनंती करतो की त्यांनी या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता दाखवून अधिक गुंतवणूकदारांना खेचून घ्यावे. या गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी त्यांना जमिनी देण्यापासून ते कस्टम ड्युटी संदर्भात सगळ्या गोष्टीत पारदर्शकता ठेवावी लागेल. जागतिक पुरवठा शृंखलेत सहभागी करून घ्यावे लागेल. हे म्हणावे तितके सोपे नाही. पुढे जाण्यासाठी अनेक सुधारणा कराव्या लागतील आणि या सगळ्या प्रक्रियेत अनेक रोजगार उपलब्ध होतील."

 

अमेरिकन साऊथ अँड सेंट्रल एशियन अफेयर्सचे माजी व्यापार प्रतिनिधी मार्क लिन्स्कॉट युएसआयएसपीएफच्या सदस्य कंपन्यांसोबत काम करीत असल्याची माहिती आघींनी दिली. आपली निर्यात वाढविण्यासाठी आणि त्या दृष्टीकोनातून पुढे जाण्यासाठी भारताने काय करण्याची गरज आहे यासंबंधी त्यांचा सल्ला घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने आता अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान मुक्त व्यापार कराराचा (फ्री ट्रेड ऍग्रिमेंट ) विचार करायला हवा हा त्यांनी दिलेला सल्ला भारताला नक्कीच मोलाचा ठरेल असे आघी म्हणाले.

 

चीन आपल्याला जर स्वस्त दरात वस्तू देत असेल तर एफटीए ने ती गरज भागवली पाहिजे. चिनी माल विकत न घेता आपण अमेरिकेच्या वस्तूंना भारतात आणि भारताच्या वस्तूंना अमेरिकेत बाजारपेठ मिळवून देऊ शकतो.

 

सिस्को येथील सप्लाय चेन ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन केर्न यांच्या नेतृत्त्वाखाली एक उच्चं स्तरीय मॅन्युफॅक्चरिंग काउन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. या काउन्सिलमध्ये कंपन्या आणि सदस्य मिळून भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब मध्ये बदलण्यासाठी काय करावे लागेल यासंबंधी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. निवडणुकीची धामधूम संपली की त्याविषयी व्यवस्थित कागदपत्रे सादर करता येतील. या कामात अगदी किरकोळ अडथळे आहेत. पण ते लवकरच दूर होतील. त्यांना भारतात केवळ उत्पादन करण्यात रस नाहीये तर त्यांना देशांतर्गत बाजारपेठेत सुद्धा स्थान हवं आहे.

 

या कंपन्या भारतात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील. गेल्या चार वर्षात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून झाली आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

Source : economictimes

 

About 200 US companies seeking to move manufacturing base from China to India: USISPF

 

 

Powered By Sangraha 9.0