वुहान मधील जवळपास ५९ % लोकांना व्हायरसची लागण झाल्याचे सरकारने लपविले.

30 Mar 2020 22:08:57

वुहान मधील जवळपास ५९ % लोकांना व्हायरसची लागण झाल्याचे सरकारने लपविले.

 

चायना व्हायरसची खरी व्याप्ती लपवण्यासाठी चिनी सरकारने केलेल्या उपाययोजना जगासमोर आल्यानंतर चिनी सरकार सर्व दोष वुहानच्या नागरिकांच्या माथी मारत आहे, तो कसा याचं उत्तम उदाहरण खालील लेख आहे.

 

व्हायरसची बाधा झाल्याची बाह्य लक्षणे न दिसल्याकारणाने वुहान मधील लोकांनी चीन सरकारपासून आपला आजार लपवून ठेवला असे चिनी संशोधकांचे म्हणणे आहे. १८ फेब्रुवारीला या आजाराची लागण झालेल्या लोकांची अधिकृत नोंद ३८,०२० एवढी होती. पण लोकांनी सरकारपासून लपविले नसते तर या आकडेवारीच्या तिप्पट नोंद झाली असती. या व्हायरसच्या प्रसाराच्या वास्तविक व्याप्तीचा आढावा घेण्यासाठी केलेल्या संशोधनात याची स्पष्ट लक्षणे असलेल्या लोकांचीच फक्त मोजणी केली गेली असे एक अहवाल सांगतो. 

 

वुहानमधील हुअझोंग युनिव्हॅर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, शांघाय मधील फुदान युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हा अहवाल डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान वुहानमध्ये नोंदविलेल्या सुमारे २६,००० रुग्णांच्या खात्रीशीर रिपोर्टवर आधारित होता.

 

या अभ्यासामध्ये रोगाची लक्षणे नसलेला आणि अगदी हलका संसर्ग झालेल्या रुग्णाला ' अनिश्चित केस ' असे संबोधण्यात आले होते. आणि या रुग्णांच्या संख्येत आणि त्यांच्या संसर्गात कितपत वाढ होतेय यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले होते. हे रुग्ण " कोणतीही वैद्यकीय मदत न घेता बरे होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल सरकारला कळविण्यात आले नाही" असे संशोधकांनी सांगितले.

 
corona researchers_1 

 

संशोधकांनी हा अहवाल तयार करताना चिनी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीपेक्षा लॅबोरेटरीमध्ये केल्या गेलेल्या चाचण्यांच्या आधारावर केला कारण अधिकाऱ्यांनी रुग्णांचे वर्गीकरण  त्यांची केवळ लक्षणे पाहून आणि अगदीच अपवादात्मक केसेसमध्ये त्यांचे फुफ्फुस स्कॅन करून केले आहे. संशोधकांनी या अहवालाचे मॉडेल सादर करताना या आजाराच्या संक्रमणाची संख्या मोजण्यासाठी आणि संसर्गाची लागण झालेल्या लोकांचे लिंग, वय, व्यवसाय आणि त्यांचे रहाण्याचे ठिकाण या सर्वांची माहिती गोळा करण्यासाठी लॅबोरेटरीमधील चाचण्यांचा आधार घेतला. या लोकांच्या प्रवासावरील निर्बंध, त्यांच्या हालचाली आणि त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्याचा काय परिणाम होतो हे देखील या मॉडेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

पूर्वीच्या मॉडेल मध्ये लपवून ठेवलेल्या किंवा काही केसेसमध्ये अनवधानाने स्थलांतर केलेल्या / प्रवास केलेल्या लोकांची शक्यता गृहीत धरली नव्हती. परंतु अलीकडील मॉडेल मध्ये या शक्यता पुराव्यानिशी गृहीत धरल्या गेल्या आहेत.

 

परंतु चॉवेल म्हणाले की कदाचित या मॉडेलने आकडेवारी फुगवून सांगितली असेल. कारण हे मॉडेल असे गृहीत धरते की या रोगाची लागण झालेली व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्यात हा विषाणू संक्रमित करू शकते. म्हणजे प्रत्यक्षात ही व्यक्ती फक्त आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना भेटली असली तरी हे मॉडेल त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाकडे संशयित नजरेने पहाते.

 

या रोगाची लक्षणे दिसत असणाऱ्या आणि रोगाची प्रत्यक्ष लागण झालेल्या लोकांना एकाच गटात ठेवता येणार नाही. त्यांच्यासाठी वेगवेगळी श्रेणी ठरवली जावी म्हणजे त्याचा मागोवा घेणे सोपे आणि अधिक बिनचूक होईल.

 

बाह्य लक्षणे दिसत नसली तरी असे रुग्ण ओळखता येण्याचा एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे व्हायरसची बाधा झालेल्या लोकांच्या थेट संपर्कात कोण कोण आले आहेत ते शोधून काढणे आणि अश्या संपर्कात आलेल्या लोकांना इतर लोकांपासून विलग करून ठेवणे होय. जेणेकरून समाजातील इतरांना याची बाधा होणार नाही.

 

शिन्हुआ मधील स्टेट न्यूज एजन्सीने कालच एक बातमी प्रसिद्ध केली. त्यात त्यानी म्हटले आहे की वुहान मध्ये या विषाणूमुळे बाधित झालेला एक नवीन रुग्ण सापडला आहे. याची लॅबोरेटरी टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्याच्यात या रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसून आली नाहीत तसेच त्याचे फुफ्फुसांचे स्कॅन सुद्धा नॉर्मल होते. त्यामुळे या रुग्णाची  'बाधित रुग्ण' म्हणून गणना करता  येणार नाही. त्याचवेळी वुहान मधील दुसऱ्या गावात एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्याची मात्र 'बाधित रुग्ण' म्हणून गणना करावी लागेल. कारण त्याच्यात कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसली तरी त्याच्या  फुफ्फुसांचे स्कॅन केले असता त्यामध्ये या विषाणूची लागण दिसून येतेय.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: inkstone

 

Coronavirus: At least 59% of cases in Wuhan, China went unreported, study says

 

 

 

Powered By Sangraha 9.0