सर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे.

25 Mar 2020 18:15:40

सर्वांनी कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस म्हटले पाहिजे.

 

आज एका विषाणूने अख्ख जग वेठीस धरलंय. याचा प्रादुर्भाव झपाट्याने होतोय. सरकार हताश झालंय. याचा प्रसार थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन शिकस्त करतंय. डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. या एका विषाणूने जगाच्या सीमा धूसर केल्यात. उच्च-नीच, जात- पात-धर्म सगळं काही याने विसरायला लावलंय.

 

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना जनता कर्फ्यूपाळण्याचे आवाहन केले. त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा धार्मिक प्रगतीसाठी किंवा कोणा एकट्याच्या हितासाठी असे आवाहन केले नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी केले. या विषाणूबाबत गांभीर्य लोकांना कळावे हा त्यामागचा उद्देश होता.

 

जगावर हे संकट चीनमुळे आले आहे हे आता सिद्ध झालेय. याचे उगमस्थान चीनमधील वुहान शहर आहे हे आता सर्वश्रुत आहे. चीनच्या हलगर्जीपणामुळे हा रोग संपूर्ण जगात पसरला. चीनने या विषाणूबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवली याचा चीनला खेद ना खंत वाटत आहे. उलट कम्युनिस्ट चीन आपल्याकडील गोपनीयतेच्या भिंती किती मजबूत आहेत यावर खुश होतोय. चीनच्या दडपशाहीच्या आणि क्रूरतेचा बातम्या अनेक वेळा आपल्या कानावर पडल्या आहेत. पण याविषयी  चीनला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणत्याही देशात नाही. कदाचित चीन यूएनएससी चा सभासद असल्यामुळे कोणी असे धाडस करत नसावे. अतिशय कमी किमतीच्या वस्तू पुरविण्यात चीनचा हातखंडा असल्यामुळे चीन आर्थिक वर्चस्व ठेऊन आहे आणि व्हिटो पॉवर सुद्धा त्यांच्या बाजूने मिळू शकते.

 

या विषाणूचे नाव कोरोना असे पसरविण्यात चीनला यश आले आहे. सतत या नावाचा उल्लेख करून जग सुद्धा याला कोरोना या नावानेच ओळखू लागले. हे दुसरे तिसरे काही नसून चीनचा परराष्ट्र विषयक धोरणाचा विजय म्हणावा लागेल. या विषाणूला जग चीनमधील शहराच्या नावाने ओळखू नयेत हीच चीनची इच्छा होती. ज्या प्रांतातून हा पसरला त्या प्रांताचे नाव या विषाणूला गेले असते तर चीनचे नाव खराब झाले असते. खरंतर हुबे किंवा वुहान हेच नाव असायला पाहिजे होते. या नावामुळे लोकांच्या मनात सतत चीनचे नाव घोळत राहील आणि चीनला काही दिवसानंतर बाजारपेठ मिळणे दुरापास्त होईल आणि चीनमध्ये आर्थिक मंदी येईल याची चीनला खात्री होती. यामुळेच चीनने अतिशय धूर्तपणे या साथीच्या रोगाला अमेरिकेला जबाबदार धरून त्यांनी हा रोग पसरविल्याचे आरोप केले. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले. परंतु यामध्ये ट्रम्प यांचे म्हणणे अधिक तर्कसंगत वाटले.

 

रोगांची किंवा विषाणूंची नावे ठेवताना ती अश्याप्रकारे निवडली जातात की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा त्याच्या नावावरून सहज त्याची लक्षणे आणि उगम समजू शकेल. यापूर्वी अनेकवेळा व्हायरस, रोग आणि सिंड्रोम यांची नावे त्यांच्या मूळ ठिकाणांवरून किंवा त्यांच्या उगमस्थानावरून ठेवण्यात आली होती. सिंगापूर इअर, यलो फिवर, स्पॅनिश फ्लू मंगोलियन सिंड्रोम, मंगोलियन स्पॉट, जर्मन गोवर, जपानी एन्सेफलायटीस, वेस्ट नाईल व्हायरस, स्वाइन फ्लू, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, सार्स ही काही वानगीदाखल उदाहरणे देता येतील. जर हे सर्व रोग त्यांच्या मूळ ठिकाणांच्या नावावरून ठरवले गेले तर मग कोविद - १९ हे नाव का? वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस असे त्याचे नाव का नाही?

 

कोरोनाच्या ऐवजी त्याला वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस असे नाव दिले तर त्याची सामान्य ओळख न राहता स्वतःची अशी एक विशिष्ट ओळख त्याला मिळेल. कारण कोरोना हा अनेक विषाणूंचा समूह आहे. यात इन्फ्लूएंझा व्हायरस, सार्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लूचा समावेश आहे. त्यामुळे या विषाणूला विशिष्ट नाव ठेवले तर त्याचे डिकोडिंग करणे आणि त्याला ओळखणे सोपे जाईल.

 
China virus _1  

 

कोरोनाची पॉसिटीव्ह टेस्ट आलेल्या माणसाला कोविद-१९ झाला आहे असे ठामपणे सांगू शकत नाही. भारतामध्ये नुकत्याच अश्या अनेक केसेस झाल्या आहेत. लोकांनी स्वेच्छेने कोरोनाची टेस्ट करून घेतली आणि कोरोना पॉझिटिव्ह आल्याने घाबरून गेले आहेत. तो प्राणघातक कोरोना नसून (नोवेल कोरोना किंवा कोविद-१९) इन्फ्लूएंझा किंवा फ्लू कोरोना आहे हे त्यांना कळत नाही. हे सगळे प्रकार या गोंधळात टाकणाऱ्या "कोरोना" नावामुळे झाले आहेत. अशी पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या माणसावर यामुळे किती भयानक परिस्थिती ओढवली असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही. आपल्याला कोरोना झाला म्हणून तो माणूस हाय खाऊनच अर्धा खचून जात असेल. आपल्या मृत्यूची कल्पना करून गर्भगळीत झाला असेल. आता संपूर्ण जग आपल्या बोटांच्या एका टॅप वर आलेले असताना अशी भीती सगळीकडे पसरायला कितीसा वेळ लागणार आहे? आपल्याला किती काळजीपूर्वक आणि जबाबदारीने राहायला लागणार आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच या विषाणूला चायना व्हायरस किंवा वुहान व्हायरस हेच नाव योग्य आहे. जेणेकरून लोक कोरोना या नावाने घाबरून जाणार नाहीत. त्यांना वुहान किंवा चायना व्हायरस आणि कोरोना यातला फरक ठळकपणे जाणवेल.

 

अजून एक हास्यास्पद परंतु गंभीर घटना डेटॉल या प्रसिद्ध अँटिसेप्टिक ब्रँडच्या बाबतीत घडली. डेटॉलच्या बाटलीवर " kills corona virus" असे लिहिले आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरायला वेळ लागला नाही. आणि लोकांनी या बाटल्या विकत घ्यायला रांग लावली. त्यामुळे डेटॉलचा तुटवडा पडू लागला. हे सर्व कोरोना या नावामुळे झाले. काहींनी डेटॉलला या येणाऱ्या महामारीबद्दल माहित होते  आणि त्यांनी जाणूनबुजून आपला खप वाढविण्यासाठी ते लपवून आपला फायदा करून घेतला असा आरोप केला. नंतर डेटॉलने स्पष्ट केले की हा कोरोना वेगळा आहे. जग अत्ता ज्या कोरोनाला सामोरे जातेय तो कोरोना हा नव्हे. हा सगळा गोंधळ एका 'कोरोना' नावामुळे झाला. म्हणून या विषाणूला वुहान किंवा चायना व्हायरस असे विशिष्ट नाव देणे गरजेचे आहे.

 

एक विवाद असाही आहे की हा विषाणू मानव निर्मित आहे. आणि तो जैविक शस्त्र म्हणून वापरण्यात येणार होता. जे यावर विश्वस ठेवतात त्यांचे असेही म्हणणे आहे की हा विषाणू चीनच्या व्हायरलॉजी रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये हा मुद्दाम तयार करण्यात आला. हा व्हायरस चुकीने लॅबच्या बाहेर आला आणि सगळीकडे हाहाकार पसरला. हा सिद्धांत जरी विवादास्पद असला तरी यावर अनेक देशांचा विश्वास बसला आहे. असे म्हणतात की अशाप्रकारचा व्हायरस यापूर्वी कधीच झाला नाही. एवढेच नाही तर त्याचे कुठेच अस्तित्व नव्हते.

 

बायो वेपन्स अ‍ॅक्टचे निर्माते डॉ. फ्रान्सिस बॉयल दावा करतात की कोरोना व्हायरस अनुवांशिक अभियांत्रिकी डीएनए असलेले एक आक्रमक जैविक युद्ध विज्ञान शस्त्र आहे.कॅनडामधील चिनी शास्त्रज्ञांवर हेरगिरीच्या आरोप आणि त्यांना कॅनडाच्या नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये प्रवेश करण्यावरील बंदी या विधानाला बळकटी देतात. हे जैविक शस्त्र आहे असा सिद्धांत मांडणारे लोक ज्या वेगाने या विषाणूचा प्रसार झाला त्या वेगाकडे आपले लक्ष वेधतात. त्यांच्या म्हणण्यानुसार हा रोग ज्या वेगाने पसरतोय तेच सिद्ध करते की हा जैविक हल्ला आहे. जर हे खरे असेल तर ही जगातील सर्वात अमानुष कृती आहे. जर असे असेल तर चीनवर कठोर कारवाई करायला हवी. तसेच सर्वात आधी त्या विषाणूचे नाव बदलून वुहान व्हायरस किंवा चायना व्हायरस केले जावे.

 

हा सिद्धांत चुकीचाही असू शकतो. पण हे मात्र खरे आहे की या विषाणूचा उगम चीन आहे. या विषाणूला विशिष्ट नाव देणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रम्प या विषाणूचा उल्लेख 'चायनीज व्हायरस ' असा करतात ते योग्यच आहे. कदाचित कुणाला ते वर्णद्वेषी वाटू शकते. पण हा व्हायरस चीन मधून आलाय ही सत्यपरिस्थिती आहे. चायनीज व्हायरस हे फारच कठोर वाटत असल्याचे कारण देऊन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या विषाणूला 'वुहान व्हायरस ' असे संबोधले.

 

परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत चीनने या विषाणूची वस्तुस्थिती आणि आकडेवारी जगापासून लपवली. हा खूप मोठा गुन्हा आहे. चीनला आणि त्यांच्या येणाऱ्या पिढयांना याची शिक्षा झालीच पाहिजे. चीन अमेरिकेवर हा विषाणू पसरवल्याचे जे आरोप करतेय ते निव्वळ द्वेषापोटी आलेले आहे. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आपली जबाबदारी झटकणे आहे. चीनला जरब बसवलीच पाहिजे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: organiser

 

World should call it as ‘Wuhan Virus’ or ‘China Virus’ instead of Novel Corona or Covid-19 Virus - Here’s Why?

 

 
Powered By Sangraha 9.0