आयएसआयएसचा विकृत चेहरा: सेक्स स्लेव्ह मार्केट.

26 Jan 2020 20:35:51

आयएसआयएसचा विकृत चेहरा: सेक्स स्लेव्ह मार्केट.

 

- प्राची चितळे जोशी.

( ICRR Media Monitoring Desk)

 

इराकमधील टेलिग्राम अ‍ॅपवरील ही जाहिरात आपल्याला अस्वस्थ करून जाते. " १२ वर्षाची सुंदर आणि 'व्हर्जिन' मुलगी विकणे आहे. या घडीला तिची किंमत १२,५०० डॉलर आहे आणि लवकरच ती विकली जाईल.

 

याझिदी समाजाच्या स्त्रियांना आणि मुलांना हे अतिरेकी आपले सेक्स स्लेव्हज (लैंगिक गुलाम) म्हणून धरून नेत असल्याचे अल्पसंख्याक याझिदी समुदायाच्या एका कार्यकर्त्याने प्रेसशी बोलताना सांगितले. ज्याप्रमाणे जाहिरातींद्वारे प्राणी, शस्त्रे यांची विक्री करतात त्याप्रमाणे माणसांचीही विक्री होत असल्याचे त्याने सांगितले.

 

आयएसआयएस ने ३००० च्या वर सेक्स स्लेव्ह असलेल्या महिला आणि मुली पारंपरिक बर्बरिक पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विकल्या आहेत. स्मार्टफोन वरील अ‍ॅपद्वारे ते महिलांचे फोटो आणि त्यांच्या मालकांची नावे शेअर करीत आहेत. असे असले तरी या धंद्यातून मिळणाऱ्या पैशाला ओहोटी लागली आहे कारण या स्त्रियांना सोडवून नेण्यासाठी काही लोक (लोकल रेस्क्युअर्स ) खूप प्रयत्न करीत आहेत. अश्या लोकांना हे अतिरेकी स्मगलर्स म्हणतात.

 

ऑगस्ट २०१४ मध्ये उत्तर इराक मधील याझिदींची गावे च्या गावे आयसिसच्या अतिरेक्यांनी ताब्यात घेतली. कुर्दिश लोकांना संपविणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. या गावांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी हजारो याझिदी महिला आणि मुलांना कैदी बनवून आपल्या सोबत नेले होते. २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे या पाच वर्षात १३४ बंदी स्त्रियांना सोडविण्यात अरब आणि कुर्दिश रेस्क्युअर्सना यश आलं आहे. परंतु मे 2019 पासून या लोकांनी केवळ ३९ लोकांनाच सोडवून आणल्याचे कुर्दिश सरकारने सांगितले. याचे कारण देताना मिर्झा दाणी यांनी सांगितले," आता त्यांनी प्रत्येक गुलाम स्त्री किंवा मुलांचं आणि  त्यांच्या मालकांचंही रजिस्ट्रेशन केलं आहे.  जर एखादी पळून गेली तर कोण पळून गेलंय हे त्यांना लगेच कळतं.

सुन्नी धर्मांध लोक याझिदींची गणना माणसात करतच नाहीत. याझिदी धर्म हा इस्लाम, ख्रिश्चन आणि पारशी धर्म यांचं मिश्रण आहे. इराकमध्ये युद्ध सुरु होण्यापूर्वी त्यांची लोकसंख्या पाच लाख इतकी होती. परंतु आज ती किती आहे हे मात्र कोणी सांगू शकत नाही.

 

या दाईश लोकांच्या तावडीतून सुटून आलेल्या नादिया मुराद या महिलेने अमेरिका आणि युरोप यांच्याकडे मदत मागितली आहे." हे लोक याझिदींशी जे वागतात ते अमानुष आहे. आणि त्याबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायला नको का? मानवता धर्म आमच्या बाबतीत अस्तित्वातच नाही का?  असे प्रश्न तिने जगासमोर उपस्थित केलेत.

 

यासंबंधी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले की हे लोक स्त्रियांच्या विक्रीसाठी एनक्रिप्टेड ऍप चा वापर करतात. या कार्यकर्त्याने दोन व्यक्तींमध्ये या स्त्रियांना खरेदी करण्यासंबंधी चाललेल्या घासाघीसीचे चॅट दाखविले. हा व्यवहार मुख्यत्वे टेलिग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअप या ऍप द्वारे चालतो. कारण ही ऍप वापरकर्त्याच्या गोपनीयतेची हमी देतात. यात वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन वापरले आहे.

 

टेलिग्रामचे प्रवक्ते मार्कस रा. म्हणाले की लवकरच आयएसद्वारे वापरल्या जाणाऱ्या वाहिन्या आम्ही काढून टाकू आणि याचा गैरवापर थांबवू.

 

अशाप्रकारची जाहिरात व्हाट्सअ‍ॅप वर सुद्धा फिरत होती. ही गोष्ट लक्षात आल्यावर व्हॉट्सअ‍ॅपचे प्रवक्ता मॅट स्टेनफेल्ड यांनी हे कधीच सहन केले जाणार नाही असे स्पष्ट केले.

 
yazidi slave_1  

 

बायबल आणि कुराणातील काही पंक्ती गुलामीला मान्यता देतात. तसेच बहुपत्नीत्वाला मान्यता देतात.  गुलामांशी संबंध ठेवण्याची परवानगी देतात.

 

१९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला बऱ्याच मुस्लिम तरुणांनी कुराणाचाच आधार घेऊन गुलामीला बंदी घालण्याची मागणी केली. परंतु काही कट्टर धर्मांध लोकांनी शरिया चा आधार घेऊन सेक्स स्लेव्हरी ला परवानगी द्यावी अशी मागणी केली. तरीही उघडपणे या गोष्टी बाहेर आल्या नाहीत. इस्लामिक स्टेट ग्रुप (आयएसआयएस) हा पहिला गट आहे ज्याने राजरोसपणे सेक्स स्लेव्ह ची विक्री  सुरु केली.  

 

 विक्रीसाठी यांना भडक मेक अप आणि महागडे कपडे घालून कॅमेरासमोर उभे केले गेले.  या सर्व स्त्रिया ३० वर्षाच्या आतील होत्या. ऑगस्ट २०१४ मध्ये आयएस ने याझिदीचें सिंजार शहर ताब्यात घेऊन ४० लोकांना निर्घृणपणे ठार मारले आणि एकाच दिवसात २ डझन पेक्षा जास्त स्त्रियांना बंदी बनवले.     त्यातील एक नाझदार मुरत. एक १६ वर्षाची मुलगी. तिच्या आईने सांगितले की सहा महिन्यापूर्वी तिचा आम्हाला पहिल्यांदा काही सेकंद का होईना फोन आला. तिने सांगितले की ती इराक मधल्या मोसूल शहरात आहे. आणि फोन बंद झाला. अश्या ठिकाणाहून पळून येणाऱ्या लोकांना आम्ही तिच्याबद्दल विचारले असता काहींनी सांगितले की तिने आत्महत्या केली आहे.

 

या मुलींना सोडवून आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी  रेस्क्यू टीम ला हजारो डॉलर्स दिले आहेत. परंतु या मुलीभोवतीची सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याने रेस्क्युअर्स सुद्धा याना सोडवून आणण्यात अपयशी ठरत आहेत. कुर्दिश सरकारकडे आता पैसाच शिल्लक राहिला नाहीय. त्यामुळे या लोकांना सोडवून आणण्यास ते हतबल आहेत.

 

२०१४ मध्ये सिंजार जवळच्या कोचो गावातून लामिया हिचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांना मारण्यात आले असावे. तिच्या ९ वर्षाच्या बहिणीचेही अपहरण केले गेले. तिच्या पाच बहिणी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्या आणि त्यांना जर्मनीमध्ये स्थलांतरित केले गेले. तिच्या धाकट्या भावाला मोसूल मधल्या आयएसच्या प्रशिक्षण शिबिरात ठेवण्यात आले होते. पण तो तिथून पळून जाऊ शकला. आता तो तिच्या नातेवाईकांकडे दाहुक या प्रांतात राहतो. हा प्रांत इराक मध्येच आहे पण हा प्रदेश कुर्दिश लोकांच्या ताब्यात आहे.

 

अतिशय अलिप्तपणे लामियाने वार्ताहरांना आपली कर्मकहाणी ऐकवली. आयएसच्या एका मालकाकडून दुसऱ्याकडे ती सोपवली जात होती. प्रत्येक जण तिच्याशी अमानुषपणे वागत होता. तिला मारहाण करत होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पण अशाही परिस्थिती तिने पळून जाण्याचा निर्धार केला होता.

 

ज्या आयएस च्या हस्तकाकडे ती प्रथम होती त्याच्याकडून तिने २ वेळा पळून जायचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळा तो फसला आणि तिला भयंकर यातनांना सामोरे जावे लागले. एका महिन्यानंतर त्या अतिरेक्याने तिला मोसूल मधील दुसऱ्या अतिरेक्याला विकले. दोन महिने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर त्या दुसऱ्याने तिला आयएस साठी बॉम्ब बनविणाऱ्या तिसऱ्या अतिरेक्याला विकले. त्याने तिला जबरदस्ती आत्मघातकी बॉम्ब आणि कार बॉम्ब बनविण्याच्या कामास जुंपले. जोडीला लैंगिक अत्याचार होतेच. त्याच्याकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा ती पकडली गेली. आणि तिला मारहाण झाली. याने तिला काही महिने ठेऊन घेतले आणि नंतर एका आयएसच्या डॉक्टरला विकले. हा डॉक्टर हावीज या इराकी शहरात राहणारा होता. त्याने सुद्धा तिच्यावर खूप अत्याचार केले. त्याच्याकडून एकदा आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याची संधी तिला मिळाली. 

 

त्यानंतर तिच्या काकांनी लोकल रेस्क्यूआरर्सना तिला सोडविण्यासाठी ८०० डॉलर्स दिले. ती सुटून आली. आता ती तिच्या भावंडांसोबत जर्मनीमध्ये राहील. पण तिचं मन मात्र इराक मध्येच असेल. " आमचं घर खूप सुंदर होतं. मोठी शेती होती. मी शाळेत जात होते." असे तिचे स्वप्नभरले डोळे सांगतात.

 

मार्च मध्ये लामिया आजी बशर ही आपल्या सोबत ८ वर्षांच्या अल्मास आणि २० वर्षाच्या कॅथरीन सोबत पळून जाण्यात यशस्वी झाली. परंतु पळून जात असता अल्मास आणि कॅथरीन या दोघींचा भूसुरुंगामध्ये मृत्यू झाला. लामिया हिने यापूर्वी चार वेळा पळून जायचा प्रयत्न केला होता. या स्फोटामध्ये लामियाचा उजवा डोळा निकामी झाला. तर तिचा चेहरा विद्रुप झाला. परंतु त्या नारकयातनांपेक्षा हे खूप बरे असे तिचे म्हणणे आहे.

 

Source: New York Post

 

This is the face of the ISIS sex slave market.

 

 

 

 

 

Powered By Sangraha 9.0