@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@
चीनची दडपशाही
उयघूरमधील मुलांना जबरदस्तीने "बोर्डिंग स्कूल" मध्ये ठेवण्यात आले असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटले आहे.
चीनमधील झिनझियांग प्रांतातील किमान पाच लाख उयघूर मुस्लिम मुलांना त्यांच्या पालकांपासून जबरदस्तीने वेगळे करून ‘बोर्डिंग स्कूल’ मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे.
चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ राहण्याविषयी त्या मुलांच्या मनावर तसे बिंबवणे आवश्यक आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. झिनझियांग मधील उयघूर प्रांतातील बहुतेकांशी जनता ही तुर्की मुस्लिम आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे उयघूरांशी असलेले वागणे "मानवतेला काळिमा फासणारे" आहे असे म्हटले आहे.
या शाळेचे उद्दिष्ट उयघूर मुलांना चिनी भाषा शिकविणे, चीनविषयी त्यांच्या मनात देशभक्ती निर्माण करणे आणि कम्युनिस्ट पक्षाशी निष्ठा राखणे हे आहे. इथे याच गोष्टी शिकवल्या जातात. बाहेरील लोकांना या मुलांशी संपर्क साधण्यास मनाई आहे. मुलांना त्यांच्या पालकांना आठवड्यातून एकदा भेटू दिले जाते. सरकारने या मुलांना शिकविण्यासाठी चिनी शिक्षकांचीच नेमणूक केली आहे. इथली भाषा चिनीच असेल यावर कटाक्षाने लक्ष दिले जाते.
"व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र" असे वर्णन केलेल्या या शाळांमध्ये झिंजियांग मधील किमान दहा लाख मुस्लिम मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली ताब्यात घेतले गेल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाने या विषयी आवाज उठवला. चीनच्या या शिबिरांमध्ये मुलांना जबरदस्ती ठेवले गेल्याचा आरोप चीनवर केला गेला.
आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारिता संघटनेने या स्कूल विषयी सविस्तर माहिती गोळा केली आहे. या स्कूल विषयी कश्या प्रकारे गुप्तता पाळली जाते? इथून कुणी पळून जाऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली जाते? त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याविषयी काय नियम आहेत? त्या मुलांची टॉयलेट वापरण्याची वेळ कोणती आहे? या सगळ्या बारीक सारीक बाबींचा तपशील असलेला अहवाल या संघटनेने सादर केला. परंतु चिनी परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळून लावला.
यावेळी चीनने झिंजियांग प्रांत हा आमचा अंतर्गत मामला आहे असे ठणकावून सांगितले. या मुलांना दिले जाणारे प्रशिक्षण हे इस्लामी दहशतवाद आणि फुटीरतावाद रोखण्यासाठी आणि मुलांना नवनवीन कौशल्य शिकविण्यासाठी असल्याचेही चीनने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
-प्राची चितळे जोशी.
( ICRR Media Monitoring Desk)
Source: WION
Uighur children forcibly put in 'boarding schools': Report