@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ पाकिस्तानातील बालाकोटवरील हवाई हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत कुणालाच माहित नसलेली माहिती हल्ला करणाऱ्या एका पायलटनेच उघड केली.

पाकिस्तानातील बालाकोटवरील हवाई हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत कुणालाच माहित नसलेली माहिती हल्ला करणाऱ्या एका पायलटनेच उघड केली.

पाकिस्तानातील बालाकोटवरील हवाई हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत कुणालाच माहित नसलेली माहिती हल्ला करणाऱ्या एका पायलटनेच उघड केली.

 

भारतीय वायुसेना (आयएएफ) अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट करून सहीसलामत परतली. आणि हे ऑपरेशन केवळ ९० सेकंदामध्ये घडले. असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले.

 

या मिशन विषयी इतकी कडक गोपनियता आणि सुरक्षा राखण्यात आली होती की या मिशनमध्ये सहभागी होणाऱ्या पायलटच्या घरच्या सदस्यांनाही या विषयी काहीही कल्पना देण्यात आली नाही. २६ फेब्रुवारीला काही घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. असे द डेली वृत्तपत्रात म्हटले आहे.


 

४० जवानांचे प्राण घेणाऱ्या पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर मोदी सरकारने आयएएफला सर्वाधिकार दिले आणि त्यानुसार आपल्या मिराज २००० फायटरने पाकिस्तानातील अंतर्गत भागात शिरून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील जैश-ए-मोहम्मदाचे तळ उध्वस्त केले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ४८ वर्षात असे पहिल्यांदाच घडले. भारतीय विमाने पाकिस्तान हद्दीत घुसून ४० जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊन सुखरूप परतली.

 

या मिशन मध्ये सहभागी असलेल्या एका मिराज २००० च्या पायलटने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की," ९० सेकंदात सगळं पार पडलं. आम्ही गेलो, शस्त्रे डागली आणि आम्ही परत फिरलो. कुणालाही याची माहिती नव्हती. अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा,"  यात सहभागी असलेल्या एका पायलटने स्ट्राईक नंतर इतक्या दिवसांनी प्रथमच याची माहिती मीडियाला दिली.

 

"दुसऱ्या दिवशी, जेव्हा बातमी झळकली तेव्हा माझ्या पत्नीने मला विचारले की तू या स्ट्राईकचा हिस्सा होतास का? तेव्हा मी शांत बसलो आणि झोपून गेलो," असे दुसऱ्या पायलटने सांगितले.

 

आएएफच्या फायटरनी बालाकोटवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानी एअर फोर्स ((पीएएफ) गाढ निद्रेत होते. ते जागे होऊन मग प्रतिहल्ला करेपर्यंत आयएएफचे मिराज २००० सुरक्षितपणे स्वगृही परतले होते.

 

दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण आएएफ ने त्यांना हुसकावून लावले आणि पाकिस्तानचे एक F-16 पाडले. परंतु या सगळ्या प्रकारात भारताचे मिग-२१ भारताला गमवावे लागले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते जाऊन पडले आणि त्याचा पायलट अभिनंदन पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडला.

 

या ऑपरेशनच्या दरम्यान आएएफ ने अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढविल्या आणि पाकिस्तानी एअर डिफेन्सला चकमा दिला. "आम्ही नियंत्रणरेषेवर अनेक वेळा कॉम्बॅट एअर पॅट्रोल्स (सीएपी) नेऊन शत्रूची दिशाभूल केली," असे एका पायलटने सांगितले.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source - Swarajya

 

IAF Pilots Who Dropped Bombs In Pakistan’s Balakot Reveal Never Before Known Details Of The Air Strike.