सीमेवरील भारतीय सैनिकांसाठी नाईट व्हिजन एआय डिवाइस लवकरच सेनेत तैनात होणार-
सीमेवरील सैनिकांच्या मदतीसाठी लवकरात लवकर आर्टिफिशल इंटेलिजन्स चा पुरवठा लष्कराकडून करण्यात येणार आहे. आर्मी डिझाईन ब्युरो (एडीबी) ने एक यंत्र विकसित केले आहे जे कठीण अश्या भूप्रदेशात आणि सीमेवरील सर्वात उंचीवर असणाऱ्या भागात घडणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली बरोबर टिपून घेऊन सैनिकांना धोक्याची सूचना ताबडतोब देईल. रात्रीच्या काळोखात होणाऱ्या सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी म्हणूनच मुद्दाम हे विकसित केले गेले आहे. या यंत्राला कोणतीही हालचाल जाणवल्यास हे यंत्र सैनिकाच्या हातावर घड्याळाच्या पट्ट्याप्रमाणे बांधलेल्या अश्या एका जोड यंत्राद्वारे कंपित होऊन सैनिकाला सूचना देईल. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये आर्मी डे च्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यापासून अश्या प्रकारच्या सेमिनार्स घेण्याची प्रथा पडली असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लष्कराची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने आर्मी डे च्या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक आणि तांत्रिक विषयांवर सेमिनार्स सुद्धा घेतली जावीत असे मोदींनी या वेळी सुचविले. तेव्हापासून आर्मी टेक्नॉलॉजी (ARTECH) सेमिनार्सना सुरुवात झाली.
चीनच्या पीएलए सैनिकांच्या बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आपल्या सैनिकांना खूप अडचणी येतात. मंडारीन ही अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची भाषा आहे. फार थोडे लोक ही भाषा वापरू शकतात. तसेच या भाषेचे आपल्या भाषेत भाषांतर करणारेही अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. त्याचमुळे चीन सैनिकांशी संपर्क करण्यास आमच्या सैनिकांना खूप कठीण जाते. "आम्ही हे डिवाइस ३,४८८ किलोमीटर दूर असलेल्या चीनच्या नियंत्रण रेषेवर तैनात केले आहे. यांच्यामध्ये आम्ही एक भाषांतर करणारे यंत्र बसविले आहे जे या मंडारीन भाषेचे तिथल्या तिथे भारतीय भाषेत भाषांतर करेल आणि त्याद्वारे भारतीय सैनिकांना चीन सैनिकांशी संपर्कात राहणे सोपे जात आहे. यामध्ये एकच गोची अशी आहे की हे भाषांतर इंटरनेट आणि त्याची कनेक्टिव्हिटी यावर अवलंबून आहे. आणि सीमेवरील भागात या दोहोंची खूप कमतरता आहे.
हे डिवाइस सैनिकांच्या फार उपयोगात येणार आणि सैनिकांची क्षमता वाढविणार हे नक्की.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: INDIAN EXPRESS
Army develops night vision AI device for border jawans.