सीरियामधून एकूणएक इराण्याला अमेरिका हाकलून देईल- पॉम्पीओ

सीरियामधून एकूणएक इराण्याला अमेरिका हाकलून देईल- पॉम्पीओ

 

"दीर्घकाळ यातना सहन करणाऱ्या सीरियामध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. सीरियामधून जोपर्यंत इराण्यांचे नामोनिशाण नष्ट होत नाही तोवर अमेरिका प्रयत्न करीत राहील," असे पॉम्पीओ यांनी सांगितले.

 

जोपर्यंत इराण आणि त्यांचे प्रॉक्सी सीरिया सोडून जात नाहीत तोपर्यंत बशर अल-असद यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भागासाठी अमेरिका कसल्याही पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करणार नसल्याची चेतावणी पॉम्पीओ यांनी दिली.

 

 

 

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून अमेरिकेचे २००० सैनिक माघारी बोलाविण्याची धक्कादायक निर्णय अचानक घेतला तेव्हा वॉशिंग्टन मधील वरिष्ठ राजनीतीज्ञ वॉशिंग्टनच्या मिडल ईस्ट पॉलिसीच्या धोरणानुसार इजिप्त च्या दौऱ्यावर होते.
 

ट्रम्पच्या या निर्णयासंबंधी बऱ्याच चर्चा होत असल्या तरीही त्यांच्या सैनिक मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होईलच. असे जरी असले तरी अमेरिका कशातूनही अंग काढून घेणार नाही. "सैनिक मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही तसेच करू. आम्ही आमचे सैन्य, आमचे लष्कर सीरियामधून माघारी बोलावू आणि आमचे अभियान चालू ठेऊ." असे पॉम्पीओ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

इजिप्त मध्ये पॉम्पीओ यांनी आपले कॉउंटरपार्ट समेह शुकरी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सीसी यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा सर्वात मोठा दौरा आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी जॉर्डन, बगदाद आणि इराकी कुर्दिश प्रदेशांना भेट दिली होती.

 

ट्रम्पच्या पॉलिसी

माजी अध्यक्ष बाराक ओबामा यांचे नाव न घेता कैरो येथील अमेरिकन युनिव्हर्सिटी मध्ये " अ फोर्स फॉर गुड: अमेरिका रीइनव्हीगरेटेड इन ड मिडल ईस्ट" हे घोषवाक्य पॉम्पीओ यांनी उच्चारले.

 

ट्रम्पची योजना इस्लामचा हिंसक अतिरेकीपणा आणि कट्टरतेचा प्रभाव कमी करते. तसेच ओबामा यांनी २००९ मध्ये केलेल्या केलेल्या भाषणाची पुनरावृत्ती करताना पॉम्पीओ म्हणाले की मिडल ईस्ट आणि यूएस यांच्यातील संबंधांची खरोखरच "नवीन सुरुवात " झाली आहे.

 

इराण आणि जिहादींकडून असणाऱ्या "संभाव्य धोक्याला" एकत्र येऊन तोंड देण्यास सर्व प्रादेशिक सहयोगी देशांनी एकत्रितपणे राजी व्हावे यासाठीच पॉम्पीओ यांचा हा दौरा आहे.

 

२०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर भूप्रदेश ताब्यात आला असला तरी इराक मधून इस्लामिक स्टेटच्या जिहादीना मोठ्या प्रमाणात उखडून टाकण्यात आले आहे. सीरियामधील काही जागांवर अजूनही या जिहादींचे नियंत्रण आहे.

 

न्यू अरबच्या जेम्स ब्राउनसेल यांनी सांगितले की," ट्रम्प प्रशासनात हे भाषण खूप लोकप्रिय झाले असले तरी इजिप्तच्या नजरेत इराण इतका भीतीदायक नाहीय जितका अमेरिकेचे पॉलिसीमेकर्स भासवत आहेत."
 

पॉम्पीओ यांच्या इजिप्त भेटीमध्ये राज्य विभागाने " दहशतवादी लढ्याविरोधातील एक सशक्त साथीदार आणि कट्टर इस्लामच्या विरोधातील एक बुलंद आवाज" अश्या शब्दात कौतुक केले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Soruce: TheNewArab

Pompeo says US will expel 'every last Iranian boot from Syria