शिंजो आबे यांच्या राष्ट्रवादी धोरणांमुळे तणाव सदृश परिस्थिती उद्भवू शकते.
जपानला चीनविषयी धोरण ठरवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कुशलतेने धोरणात्मक चर्चा करतानाच आपल्या हिताच्या नसलेल्या गोष्टींना तितक्याच धोरणात्मक पद्धतीने विरोध सुद्धा करावा लागणार आहे. अमेरिकेकडून असलेल्या सुरक्षेसंबंधातील अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीवर ठोस उपाय म्हणून जपानी लष्कराची कुवत वाढविण्यासाठी प्राईम मिनिस्टर शिंजो आंबे यांची बीजिंग सोबत उत्तम राजनैतिक आणि आर्थिक संबंध विकसित करण्याची योजना आहे. हेलिकॉप्टर्स वाहून नेणाऱ्या फ्लॅट-टॉप केलेल्या जहाजांचे रूपांतर जेट फायटर विमाने वाहून नेणाऱ्या जहाजांमध्ये करून त्याला विमानवाहू जहाज असे न संबोधता " बहुउद्देशीय आरमारी छोटी नौका" असे संबोधणे हा एक अत्यंत हुशारीने केलेला शब्दच्छल आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षातील राष्ट्रवादी लोक देशाच्या शांततावादी संविधानाचे बलशाली राष्ट्रांमध्ये पुनरुथ्थान करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना देशातील सर्वसामान्य लोक कशाप्रकारे प्रतिसाद देतील याचा त्यांनी विचार करावयास पाहिजे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी मालावरील जकात आणि अनेक देशांमध्ये व्यापार करण्यावर केव्हाही लागू होणाऱ्या बंधनांच्या भीतीने जपानला चीनच्या जवळ नेले आहे. मे मध्ये दक्षिण कोरियातील सैन्याची ताकद कमी करण्यासाठी त्यांनी पेंटागॉन ला दिलेल्या आदेशामुळे अमेरिकेच्या सतत असलेल्या जपान मधील लष्कराच्या उपस्थितीबद्दल अनिश्चितता निर्माण केली आहे. शी जिनपिंग आणि आबे यांची ऑक्टोबर मध्ये भेट झाली आणि टोकीयोने "बेल्ट आणि रोड इनिशिएटिव" चा स्वीकार केला असला आणि चीन आणि जपान मधील संबंधांमध्ये जरा सुधारणा झाली असली तरी चीनचे प्राबल्य वाढण्याची भीती कायम आहेच. या प्रदेशातील चीनच्या हेतूंविषयी शंकाच आहे. ईस्ट चायना सी मध्ये सतत प्रवेश करणाऱ्या युद्धनौका आणि तेथील आकाशात सतत घिरट्या घालणारी चीनची लष्करी विमाने आणि उत्तर कोरिया कडून असणारा धोका या गोष्टींमुळे जपान कायम काळजीत पडलेला आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात जपान जगातील सर्वात शक्तिशाली आरमार होते. विमानवाहू जहाजांचा तांडाच त्यांच्याकडे होता. चीन, ऑस्ट्रेलिया आणि पर्ल हार्बरवरील बॉम्बहल्ल्यात त्यांचा हात होता. जपानच्या आक्रमक अश्या साम्राज्यशाहीचा तडाखा आशियाला सहन करावा लागला आहे.
"आवश्यकता भासल्यास, फायटर जेट ची लवचिकता वाढवण्याच्या दृष्टीने आता वापरात असलेल्या लढाऊ जहाजांवरून फायटर जेट वापरात आणली जावीत." अश्या आशयाचा मसुदा असलेल्या संरक्षण मार्गदर्शक तत्वांना या आठवड्यात सरकारने मंजुरी दिली आहे. त्यात F35B या फायटर विमानाला वाहून नेण्यासाठी इझुमोला या जहाजाला पुन्हा दुरुस्त करणे या सारखी महत्त्वाची कामे सुद्धा समाविष्ट होती. आपल्या सुरक्षेला घातक अश्या आव्हानांना त्वरित आणि प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे आबे यांनी म्हटले.
हा निर्णय नानकिंग हत्याकांडाला ८१ वर्षे पूर्ण व्हायला २ दिवस असताना घेण्यात आला. या हत्याकांडात जपानी सैनिकांनी ३,००,००० चिनी लोकांना ठार मारले होते. जपानचे चीन, कोरिया आणि इतर आशियायी देशांवर केलेले अनन्वित अत्याचार आजही तितकेच ताजे आहेत. आपल्या राष्ट्रवादी धोरणाच्यावेळी या देशाचा भूतकाळ आणि आर्थिक तसेच राजकीय वातावरणाचा विचारही आबे याना ध्यानात ठेवायला हवा.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: South China Morning Post
Shinzo Abe’s nationalist push could easily heighten tension in the region