चीनने पूर्व लडाखमध्ये तडकाफडकी सुमारे ५० ते ६० हजार सैन्य तैनात केलंय. त्यामुळे भारतानेही ताबडतोब त्याच्या तोडीस तोड सैनिकांची तैनात केली आहे. मे २०२० पासून चीन आणि भारत लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकलेत. चीनने एलएसी जवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्ते आणि दारुगोळा तैनात केलाय. भारतानेही जोरदार तयारी केली आहे.
Read More
अलीकडेच चीनने आपल्या हवाई दलाच्या कमांड साखळीत सैन्याच्या हवाई संरक्षण युनिटला एकत्रितपणे हवाई संरक्षण प्रणाली तयार करण्यासाठी भारताच्या सीमेवरील प्रदेशात पाचारण केले आहे. नवीन हवाई संरक्षण प्रणालीची स्थापना हा चीनच्या डब्ल्यूटीसीच्या (वेस्टर्न थिएटर कमांड) युद्ध सरावाचा भाग असल्याचे चीनने डेली या वृत्तपत्राजवळ कबूल केले.
तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी जी " ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेशन सिस्टम” (ओबीओजीएस) आहे तिचं रूपांतर आता नागरिकांच्या उपयोगासाठी केलं गेलं आहे. या महामारीमध्ये सापडलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरचा तुडवडा जाणवू लागल्यानंतर ताबडतोब हा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी सुरु झाली आहे. तेजससाठी लागणारा ऑक्सिजन बनवणारा प्लॅन्ट आता नागरिकांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवणार आहे. सुमारे १००० लिटर ऑक्सिजन दर मिनिटाला बनवू शकेल अशी या प्लॅन्टची क्षमता आहे.
सैन्यातील आयुष्य इतके धकाधकीचे आहे की इथे मागील घटनांचा अभ्यास करून मग पुढे जाण्याइतका वेळही कुणाकडे नाहीये. त्यांनी मागील घटनांचा अभ्यास केला तर युद्धाच्या नोंदी पाहून महत्त्वाच्या स्थानिक घडामोडी आणि तेथील लोकांची प्रवृत्ती त्यांच्या लक्षात येईल. स्थानिकांची प्रवृत्ती, त्यांचे मार्ग आणि त्यांची माध्यमे यांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले तर त्यांना उपयुक्त माहिती मिळेल.
शस्त्रात्रं निर्यातदार होण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. फिलिपाइन्ससोबत " बचावात्मक साहित्य आणि उपकरणे" यांच्या विक्रीचा भारताने करार केला आहे. ज्यात ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
भारत- फ्रांस वाढत्या मैत्रीमुळे भारताची वाढती सामरिक शक्ती हीच पाकिस्तानची खरी पोटदुखी एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन देशांमध्ये सर्वप्रथम फ्रान्सचा दौरा केला.पॅरिसशी नवी दिल्लीचे संबंध नजीकच्या काळात अधिक घट्ट होऊ शकतात याचे ते स्पष्ट संकेत होते आणि फ्रान्स हळूहळू या तिन्ही सामरिक (म्हणजे संरक्षण, अवकाश आणि आण्विक उर्जा) क्षेत्रांमध्ये भारताला भरीव तंत्रज्ञान पुरवठा करणारा देश म्हणून विकसित झाला.भारताची प्रचंड बाजारपेठ आणि प्रगत सामरिक तंत्रज्ञानाची भारत
भारत आणि रशिया एकमेकांचे तंत्रज्ञान वाटून घेत आहेत आणि रशियाने विक्रीनंतरची सेवा प्रणाली सुधारण्यासाठी कायद्यात सुधारणा घडवून आणली आहे.
नवी दिल्लीने प्रथमच आपल्या पहिल्या वेपन्स सेल्स पीचवर वॉशिंग्टन ची वर्णी लावली. विमानवाहू नौकांवरील लढाऊ जेट विमानांच्या पायलट प्रशिक्षणासाठी भारतीय जेट प्रशिक्षक पाठविण्याचा प्रस्ताव भारताने अमेरिकेला दिला आहे. अमेरिकन नेव्हीने अंडरग्रॅज्युएट जेट ट्रेनिंग सिस्टिम (यूजेटीएस) साठी जागतिक शोधमोहीम सुरु केली आहे.
लडाखमध्ये चीन आणि भारत यांच्यात झालेल्या संघर्षामुळे भारत संरक्षणाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायला तयार नाही. चीन मलाक्का बेटावरून समुद्रमार्गे क्रूड ऑईलची ने-आण याच भागातून करते. अंदमान निकोबार ही बेटे यासाठी खूप महत्त्वाची आहेत. गरज पडल्यास या मार्गावर भारत आपल्या युद्धनौका आणि एअरक्राफ्ट यांचा अंदमान निकोबार बेटांवरून व्यवस्थित वापर करू शकते. अंदमान निकोबार हे चीनसाठी ' चोक पॉईंट ' आहेत.
चीनने गलवान नदीच्या शिखरावर जी निरीक्षण पोस्ट उभारली होती ती खरंतर भारताच्या बाजूच्या एलएसीमध्ये होती हे चर्चेदरम्यान सिद्ध झाले. आणि ती हटविण्यासाठीचा करार करण्यात आला आणि चिन्यांनी ती हटवली. पण १४ जून रोजी एका रात्रीत चिन्यांनी पुन्हा आपल्या हद्दीत त्यांची नियंत्रण पोस्ट उभारली. हे लक्षात आल्यावर १५ जूनला संध्याकाळी पाच वाजता कर्नल बाबू यांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी करण्याचे ठरवले.
भारत आणि चीन यांच्या लडाख जवळील सीमेवरील सैनिकांच्या तैनातीबद्दल भारत सरकार मौन बाळगून आहे. सरकारचे मौन अनेक अफवांना जन्म देतंय. या सगळ्या अफवा आणि सरकारकडून अधिकृत बातमी नसल्यामुळे लडाखमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. एका रात्रीत अचानक सैनिकांची संख्या वाढली असल्याने सगळीकडे अजूनच दहशत निर्माण झालीय असे श्लोक गावातील नगरसेवक नामग्याल याकझी यांनी सांगितले.
भारत चीन सीमाप्रश्नी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका स्वीकारण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला भारताने अधिकृतरीत्या नाकारले आहे.
जुन्या एफ-१६ आणि मिराज जे-७ याच्या जोडीला पाकिस्तानने चीनकडून शंभरहून अधिक जेएफ -१७ विमाने मागवली आहेत. ही लढाऊ विमाने शत्रूच्या युद्धनौकेचा अचूक वेध घेण्यास सक्षम असतील. ही विमाने एकाच इंजिनावर चालतात. भारताकडे लढाऊ विमानांचा ताफा आहे. त्यापैकी अनेक विमाने युद्धनौकेवर आहेत. या विमानांना जेएफ-१७ भारी पडू शकते. २०१७-२०१८ मध्ये इस्लामाबादच्या हवाई दलाने साठ सीएम -४०० एकेजी नौकाविरोधी मिसाईल्स खरेदी केली होती.
भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी हिंदी महासागरामधील चिनी जहाजांच्या अस्तित्वाच्या बातमीला पुष्टी दिली. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सात ते आठ युद्धनौका हिंद महासागरात आढळून आल्या आहेत. जागतिक व्यापार मार्गाचे रक्षण करणे आणि तो तयार करणे हा चीनच्या महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग आहे.
कोविद-१९ ची लागण झाल्यामुळे अमेरिकन विमानवाहू युद्धनौका आणि तेथील नौसैनिकांना बंदरात परत यावे लागले. ही विमानवाहू युद्धनौका आण्विक क्षेपणास्त्र वाहून नेणारी होती. आमच्या माघार घेण्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा नाही हे आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी लक्षात घ्यावे असे मिले नी सांगितले.
ट्रम्प प्रशासनाच्या २०१८ च्या न्युक्लियर पोश्चर रिव्ह्यू (एनपीआर) च्या अहवालात अमेरिका गरज भासल्यास अण्वस्त्रे वापरेल असे आडवळणाने म्हटले आहे. जर तशीच आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर अमेरिका असे करू शकते असा इशारा या अहवालात दिला गेला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेय की "नॉन न्यूक्लियर हल्ले होऊ शकतात पण तशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही त्याची लेव्हल वाढवू शकतो."
तेजस लढाऊ विमानांच्या नौसैनिक मॉडेलच्या अरेस्टेड लँडिंगची जमिनीवरील पहिली चाचणी यशस्वी संरक्षण क्षेत्रातील "मेक इन इंडीया" कार्यक्रमाला अजुन एक प्राथमिक यश (ICRR Defense/ Military Hardware) स्वदेशात विकसित केलेल्या तेजस लढाऊ विमानाच्या नौसैनिक मॉडेलची "अरेस्टेड लँडींग" तंत्राची पहिली यशस्वी चाचणी भारतीय नौसेनेच्या गोव्यातील हंस तळावर यशस्वीरीत्या पार पडली. वायुसेनेची लढाऊ विमाने नौसेनेच्या ताफ्यात सामिल करताना त्यांना विमानवाहक नौकांवर उडण्यासाठी आणि उतरण्यासाठी योग्य बनवण्यासाठी त्यात अनेक महत्व
पाकिस्तान काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणायच्या तयारीत आहे का? अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे आणि काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. काहीतरी मोठं घडतंय किंवा घडणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय.
भारताने सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल ब्राह्मोसच्या व्हर्टिकल डीप डाइव्ह आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे जगातील सर्वात वेगवान असे क्षेपणास्त्र आहे. ५०० किमी पर्यंत याची क्षमता आहे असे ब्राम्होस एअरोस्पेसचे सीईओ सुधीर मिश्रा यांनी सांगितले.
लष्कराच्या वॉर फायटिंग मशीनरी मध्ये अधिक चांगले बदल घडवून आणणे आणि "कोल्ड स्टार्ट" ची संज्ञा अधिक रुंदावण्यासाठी, झटपट अॅक्शन घेऊ शकतील आणि पाकिस्तान ,चीन सीमापार जोरदार तडाखा देऊ शकतील अश्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स (आयबीजीज) ग्रुपची उभारणी भारतीय लष्कर लवकरच करेल.
भारतीय वायुसेना (आयएएफ) अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट करून सहीसलामत परतली. आणि हे ऑपरेशन केवळ ९० सेकंदामध्ये घडले. असे वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले.
पाकिस्तानने पुलवामावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. तेव्हा भारताने आपल्या नौदलाची चालू असलेली सर्व ऑपरेशन्स रद्द करून त्यांना पाकिस्तानी जलसीमेजवळ मोठ्या प्रमाणात तैनात केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीत सतत वाढच होत आहे. हे पाहता यूएस ने भारताच्या एमएच -६० आर सीहॉक मल्टी-मिशन हेलिकॉप्टरच्या खरेदीची विनंती मंजूर केली आहे. भारत आता २४ हेलिकॉप्टर्स खरेदी करेल.
Prima facie denying shooting of F-16 fighter jet and activist Ken Saro Viwa's murder by Nigerian military junta has nothing in common. First is military incidence and another is extrajudicial killing of energetic activist from Nigeria. But it has one common thing, i.e. Corporate's commercial interest. Let's see how Corporate Giants Brazenly wipe out everything which could hurt their Dollar Farming!
२६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताने जो एअरस्ट्राईक केला त्या स्थळानजीकच्या एका शाळेत जाऊन तपासणी करण्यासाठी राऊटर्सच्या पत्रकारांना वारंवार नाकारण्यात आल्याने पाकिस्तानकडे भारतापासून लपविण्यासारखे बरेच आहे असा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला आहे.
पळून जाणाऱ्या एफ-१६ या विमानातून अमेरिकेची बियाँड-व्हिज्युअल-रेंज एअर-टू-एअर मिसाईल (बीव्हीआरएएएम) यांचा मारा भारतीय सुखोई-३० या एकट्या विमानावर ४-५ वेळा करण्यात आला. ज्यामुळे ते फक्त पळून जाऊ शकले नाहीत तर त्यामुळे त्यांचेच रडार लॉक झाले आणि त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचता आले नाही. त्यांचे मिसाईल आणि रॉकेट लक्ष्याचा वेध न घेताच कोसळले. नुकतीच आयएएफने या गोष्टीला पुष्टी दिली आहे.
गेल्या काही महिन्यातील पाकिस्तानच्या हालचाली पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की पुलवामाचा हल्ला एक विशिष्ट उद्देश मनात ठेऊन करण्यात आला होता. जाणूनबुजून भारताला उसकवायचे जेणेकरून तो काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल असे पाकिस्तानला वाटत होते. सर्जिकल स्ट्राईकद्वारे उरीच्या हल्ल्याचा प्रतिशोध भारताने घेतला की ही फक्त हवा होती अशी शंका लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी खेळलेली ही खेळी होती. उरी या चित्रपटामुळे पाकिस्तान आधीच खवळले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदनशील सीमावर्ती भागातील भेटीला चीनने कडाडून विरोध केल्यानंतर अरुणाचल प्रदेश भारताचे "अखंड आणि अविभाज्य " अंग असल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे.
चीनच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने भारताने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच उत्तर सीमेजवळील रणनैतिक दृष्ट्या महत्त्वाचे सर्व रस्ते तीन वर्षात बांधून पूर्ण करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश मधील सेला पासच्या टनेलच्या पायाभरणी करिता ९ फेब्रुवारीला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अंदमान निकोबार बेटांवर गेल्या गुरुवारी भारतीय नौदलाने तिसरा विमानतळ सुरु केला आहे. मलाक्का वरून हिंद महासागरात येणाऱ्या चीनच्या जहाजांवर आणि त्यांच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा एअर बेस सुरु केल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने त्यांच्या F-16 विमानांच्या काही भागांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव भारताला दिला आहे. २० बिलियन डॉलर्सचा हा प्रस्ताव आहे. या निर्मितीचा प्रस्ताव भारतालाच देण्यामागे त्यांना भारताकडून मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांची ऑर्डर मिळविणे हाच उद्देश आहे असे विश्वसनीय वृत्तांकडून समजते.
भारताच्या पूर्वेस चीनच्या वाढत्या लष्कर उभारणीमुळे असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन चंदिगढ येथे असलेल्या भारताच्या आयटीबीपी कमांडला शासनाने लेह मध्ये हलविण्याचा आदेश दिला आहे. ३,४८८ किलोमीटर लांबीच्या सिनो-इंडिया सीमेचे शांततेच्या काळात याच इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) रक्षण केले होते. ज्याचे नेतृत्व लष्कराच्या मेजर जनरल पदाच्या बरोबरीचे पद असलेल्या इन्स्पेक्टर जनरल (आयजी) यांनी केले होते.
सीमेवरील सैनिकांच्या मदतीसाठी लवकरात लवकर आर्टिफिशल इंटेलिजन्स चा पुरवठा लष्कराकडून करण्यात येणार आहे. आर्मी डिझाईन ब्युरो (एडीबी) ने एक यंत्र विकसित केले आहे जे कठीण अश्या भूप्रदेशात आणि सीमेवरील सर्वात उंचीवर असणाऱ्या भागात घडणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली बरोबर टिपून घेऊन सैनिकांना धोक्याची सूचना ताबडतोब देईल. रात्रीच्या काळोखात होणाऱ्या सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी म्हणूनच मुद्दाम हे विकसित केले गेले आहे. या यंत्राला कोणतीही हालचाल जाणवल्यास हे यंत्र सैनिकाच्या हातावर घड्याळाच्या पट्ट्याप्रमाणे बांधल
जनरल अॅटोमिक्स प्रिडेटर एमक्यू ९ ची भरती लवकरात लवकर भारतीय नौसेना आणि लष्करामध्ये होण्याची आशा आहे. "भारतीय नौदलाला सुरुवातीला २२ युनिट्स मिळतील असे वाटत होते. परंतु या ड्रोन साठी लष्करही तितकेच उत्सुक असल्याने आता नौदल आणि लष्कर या दोघांनाही प्रत्येकी १० मानव रहित विमाने पुरविण्यात येतील. हे डील २०१९ मध्ये पूर्ण होऊन आपल्या ताफ्यात या ड्रोनला समाविष्ट करण्याची मनीषा दोन्ही दलांना आहे." अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
लवकरच जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात जास्त उंचीचा रेल्वे आर्च पूल बांधून पूर्ण होणार आहे. रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी या दोन ठिकाणांना जोडणारा हा पूल भारतीय रेल्वेच्या 'जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लाईन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यास उधमपूरला जोडणाऱ्या मेगा प्लॅनचाच एक भाग आहे. पूर्णत्वास पोहोचल्यानंतर ३५९ मीटर उंचीचा चिनाब नदीवरील हा पूल संपूर्ण जगातील सर्वात जास्त उंचीचा रेल्वे पूल म्हणून नावाजला जाणार आहे. याच्या पायाउभारणीचे काम २०१७ सालीच पूर्ण झाले असून सध्या याच
नोव्हेंबरमध्ये अमेरिकन बनावटीच्या M-777 आणि कोरियन बनावटीच्या K-9 वज्र या दोन तोफांचा भारतीय लष्करात समावेश झाल्यानंतर आता लवकरच भारतीय बनावटीच्या 'धनुष' या तोफेचा आपल्या लष्कराच्या ताफ्यात प्रवेश होणार आहे. स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स तोफांचा भारतीय अवतार असे या तोफांना म्हणता येईल. परंतु धनुष तोफा पूर्वीच्या बोफोर्स तोफांच्या तुलनेत अधिक अंतरावर मारा करण्यास सक्षम असून त्यात अत्याधुनिक उपकरणेही बसविण्यात आलेली आहेत.
भारताने ब्रह्मपुत्रा नदीवर रेल्वे-रस्ता पूल उभारला आहे. होय, या पुलावरून रेल्वे आणि वाहने एकाच वेळी धावू शकतात. या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. १९९७ साली माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कारकिर्दीत याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि याचे बांधकाम मात्र दिवंगत पंतप्रधान अटलजी यांच्या कारकिर्दीत २००२ साली सुरु झाले. वाजपेयींनी याच्या बांधकामाला सुरुवात केली.
रविवारी भारताने अग्नी-4 या आपल्या सक्षम परमाणू घेऊन जाणाऱ्या लॉन्ग रेंज बॅलेस्टिक मिसाईलची आणखी एक चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.
किती खरे आहे ना? आणि आपल्या सैनिकांना तर हे अगदी चपखल बसतंय; ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिलाय. अश्याच या वीरांपैकी एक नाव आहे 'जसवंत सिंग'. हे नाव ऐकल्यानंतर मी जसजशी इंटरनेट चाळत गेले तसतशी या नावाभोवती गुंफलेल्या अनेक अधिकृत-अनधिकृत कहाण्या मला सापडत गेल्या. त्यातल्याच काही गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न.
भारताने २०१६ मध्ये अग्नी-५ च्या केलेल्या चाचणीने चीनला युनाइटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल कडे भारताची तक्रार घेऊन जाणे भाग पाडले होते. चीनने यावर खूप थयथयाट केला होता.
पहिलीच पाणबुडी आयएनएस अरिहंतसह भारताने तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे आण्विक त्रिकूट पूर्ण केले असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी दिली. आयएनएस अरिहंतचा नौदलामध्ये समावेश होणे हा २०१८ सालातील नौदलाच्या यशामधला मानाचा तुरा आहे. आणि यामुळे भारताच्या आण्विक क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.
बोईंग या अमेरिकन कंपनीने बनविलेली सीएच-४७ चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या हवाई दलात समाविष्ट होण्यास सुरुवात होणार असल्याचे वृत्त आहे.