चाबहार बंदर आणि ते विकसित करण्याच्या कामात असणारा भारताचा सहभाग हा फक्त भारतासाठीच महत्वाचा नाही तर इराणसाठी त्यांच्या विजया समान आहे यावरून चाबहार इराणसाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. भारत पुरवित असलेल्या उपकरणांची दुसरी बॅच चाबहारला पोहोचली आहे. इराणी आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंदरात विकसित होणाऱ्या दोन टर्मिनलचे कामकाज जवळजवळ पूर्ण झाले आहे. इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापार वाढवण्यासाठी भारत ओमानच्या आखाती किनारपट्टीसह इराणच्या आग्नेय किनार्&
Read More
चाबहार बंदरातील व्यापार वाढविण्यासाठी मोठी मोठी जहाजे आणि मालवाहू जहाजे यांच्यावरील करामध्ये इराण, जवाहरलाल नेहरू बंदर आणि दीनदयाळ बंदर यांनी सवलत देऊ केली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून ट्रान्झिट कंटेनरच्या टर्मिनल हॅण्डलिंग शुल्कावर पन्नास टक्के सूटही देण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाने दिली.
छाबहार बंदरामार्गे भारताशी व्यापार करण्यास अफगाणिस्तान सज्ज. इराणच्या रस्ते आणि शहरी विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येत्या एक महिन्याच्या आत अफगाणिस्तान भारतात छाबहारमार्गे ५ कंटेनर असलेले एक कार्गो शिप पाठविण्याची तयारी करीत आहे.
सोमवारी भारताने अधिकृतपणे इराणमधील छाबहार बंदराचा कारभार हाती घेतला आणि अफगाणिस्तानला युद्धमुक्त करण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य असल्याचे तेथील जनतेला दाखवून दिले.
अलीकडे इराणच्या आग्नेय दिशेला असलेल्या छाबहार बंदरावर झालेला दहशतवादी हल्ला हा इराणच्या शत्रूकडून केला गेला होता. मकरान प्रदेशातील विदेशी गुंतवणुकीला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला केला गेला असे इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.