चीनला केंद्रस्थानी ठेऊन जपान आणि भारत यांच्यात चौकोनी चर्चा.
         Date: 12-Apr-2021

 

चीनला केंद्रस्थानी ठेऊन जपान आणि भारत यांच्यात चौकोनी चर्चा.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

पूर्व आणि दक्षिण समुद्रात चीनच्या हालचालींना वेग आल्यामुळे जपान आणि भारत यांनी सुरक्षेविषयी सहकार्याबद्दल आपापल्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एप्रिलच्या उत्तरार्धात " टू प्लस टू " बैठक घेण्याची योजना आखली आहे.  

 

जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सु मोटेगी आणि संरक्षणमंत्री नोबुओ किशी तसेच त्यांचे भारतीय काउंटर पार्ट सुब्रह्मण्यम जयशंकर आणि राजनाथ सिंह यांच्याशी चर्चेत सहभागी होतील. स्वतंत्र आणि मुक्त इंडो - पॅसिफिक करण्यावर दोन्ही बाजू एकत्रितपणे काम करतील यावर शिक्कामोर्तब होईल.

 

एप्रिल उत्तरार्ध ते मे च्या प्रारंभीच्या काळात जपानच्या सुवर्ण सप्ताहातील सुट्टीच्या कालावधीत जपानचे पंतप्रधान योशिहिद सुगा आपल्या नियोजित भारतभेटीत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील तेव्हा हाच या सुरक्षा बैठकीचा आधार असेल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह दोन्ही देश 'क्वाड' या सुरक्षा गटाचे सदस्य आहेत.

 

चीन प्रश्नावर जवळचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर टोकियो आणि नवी दिल्ली यांची नोव्हेंबर २०१९ नंतरची दुसरी टू प्लस टू मीटिंग असेल. जपानच्या सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि भारतीय लष्कर यांच्यात अन्न आणि इंधन संसाधने सामायिक करण्यासाठी दोन्ही बाजूने गेल्या वर्षी अधिग्रहण आणि क्रॉस सर्व्हिसिंग करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

 

जपान विदेश धोरणांचे लक्ष क्वाड वर केंद्रित करत आहे आणि नवी दिल्लीशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी टू प्लस टू मीटिंगचा वापर करत आहे. औपचारिक आघाडी टाळण्याकडे भारताचा पारंपरिक कल असल्याने आणि भारत आपले रणनैतिक संबंध समतोल राखण्याचा प्रयत्न करत असल्याने चीनसोबतच्या वादात ओढले जाणार नाही याविषयी दक्ष आहे.

 
2 plus 2 _1  H

 

गेल्या महिन्यात जपानने भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांना विकासासाठी पहिली अधिकृत मदत दिली. ही बेटे मलाक्का समुद्रधुनीच्या अगदी तोंडावर आहेत. ही मदत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बसवण्याची आहे. विश्लेषकांच्या मते जपानची थेट उपस्थिती या बेटांवर नसली तरी दोन्ही देशांमधील सहकार्याचे संबंध अधिक दृढ होण्याचे हे प्रतीक आहे.

 

जपान ईशान्य भारतात मेघालय, मिझोराम, आसाम आणि त्रिपुरा तसेच बांगलादेश आणि म्यानमार सीमेवर रस्ते बांधणी प्रकल्प राबवत आहे. जपानची भारतामधील ही रणनैतिक गुंतवणूक चीनला चिंताजनक ठरू शकते.

 

टू प्लस टू बैठक समोरासमोर न होता व्हर्च्युअली होईल. कारण भारतात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची दिवसाला १ लाख इतकी नोंद होत आहे आणि टोकियोच्या मध्यवर्ती २३ वॉर्डांमध्ये १२ एप्रिल ते ११ मे दरम्यान या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात आहेत.

 

Source : nikkeiasia, google