Date: 03-May-2020 |
चीनमधील ख्रिश्चन धर्माचे समूळ उच्चाटन करण्याचा चीनने उचलला विडा.
" अतिरिक्त धार्मिक स्थळे नियंत्रित करणे " या सरकारी मोहिमेचा भाग म्हणून चीन सरकारने चीनमधील दोन हजाराहून अधिक क्रॉस सक्तीने दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) ने या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. चीनमधील बहुतांशी चर्चच्या शिखरावर असणारे क्रॉस काढून टाकण्यात येतील. देशातून ख्रिश्चनिटी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी सर्व चिन्हे किंवा प्रतीके नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कम्युनिस्ट पार्टी ख्रिश्चन धर्माचे उच्चाटन करण्याच्या मागे लागली आहे. ज्यांनी याचा विरोध केला अश्या अनेक लोकांना चिनी सरकारने अटक केले आहे. हेनान प्रांतातील बिशपच्या अधिकारातील झिंजियांग प्रदेशातील चर्चच्या शिखरावरील क्रॉस ईस्टर संडेच्या दिवशीच उतरवण्यात आला.
व्हॅटिकन आणि सिसीपी यांच्यातील कराराचा परिणाम -
ब्लॉगर फादर शॅनरेन शेनफू म्हणाले की क्रॉस नष्ट होण्यासंबंधी मौन बाळगणे म्हणजे देशातील बिशपांच्या नियुक्तीसंदर्भात सीसीपीबरोबर झालेल्या व्हॅटिकनच्या कराराची मोजावी लागणारी किंमत आहे. " तेव्हा जेव्हा क्रॉस उतरवला जाईल तेव्हा तेव्हा ख्रिश्चनांनी ते शांतपणे आणि हसत हसत स्वीकारणे भाग आहे. आता यापुढे क्रॉस हटविणे हा दिनक्रमाचा एक भाग असणार आहे. व्हॅटिकन करार पाळण्याच्या दृष्टीने चिनी ख्रिश्चनांनी हसत हसत सर्व स्वीकारण्याचे योगदान दिले पाहिजे. जर कोणी रागावून या गोष्टीचा विरोध केला तर तो गुन्हेगार मानला जाईल. " फादर शेनफू म्हणाले.
अस्थायी करारानुसार पोपला चीनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) ने नियुक्त केलेल्या बिशपच्या नेमणुकीची आणि बडतर्फीची परवानगी दिली. व्हॅटिकनशी निष्ठा ठेऊन असलेल्या चर्चमध्ये राज्यांनी चालवलेली चर्च विलीन करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.
चीनमधील प्रतीके हटविणे -
अन्हुई प्रांतातील सुझहौ शहरातील एका चर्चवरील क्रॉस त्याच्या दुसऱ्याच दिवशी काढण्यात आला. अतिशय पुरातन अश्या हेफेई प्रांतातील चर्चवरील क्रॉस २७ एप्रिल रोजी हटविण्यात आले. हे चर्च १८९६ सालातील आहे. क्रॉस हटविण्याचे काम सुरक्षा दलाच्या संरक्षणात होतं. त्यावेळी लोक चर्चमध्ये प्रवेश करू शकत नाहीत, बाहेर जमू शकत नाहीत किंवा होणाऱ्या विध्वंसाची छायाचित्रे घेऊ शकत नाहीत.
अन्हुई येथील फादर चेन म्हणाले की विशिष्ट ठिकाणच्याच चर्च वर कारवाई करण्यात आलेली नाही तर ही कारवाई सम्पूर्ण चीन भर चालू आहे. जर सर्व चर्चनी एकत्र येऊन याला विरोध केला नाही तर अनेक क्रॉस हटवले जातील असे फादर चेन म्हणाले.
चीनमधील चर्चच्या फादरनी क्रॉस हटवण्याच्या निर्णयाबद्दल अजिबात विरोध न करण्याचे ठरवले आहे. त्यांनी क्रॉस हटविण्यासंबंधी विरोध केल्यास संपूर्ण चर्च हटविले जाण्याची त्यांना भीती वाटते.
चर्चवरील निर्बंध
२०१५ मध्ये झिंजियांग प्रांतातील चर्चच्या छतावर क्रॉस लावण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच ख्रिश्चन धर्मियांना त्यांच्या धर्माचे कोणतेही प्रतीक आपल्या घरावर लावण्यास मज्जाव केला गेला. २०१५ पूर्वी ज्यांनी आपल्या बिल्डिंगवर अथवा घराच्या छपरावर क्रॉस बसवले आहेत त्या सर्वाना क्रॉस हटवण्यासाठी जबरदस्ती केली गेली.
२०१८ पासून खिस्ती लोकांविरुद्ध मोहीम राबवली गेली ज्यात शेकडो क्रॉस हटविले गेले. सरकारी कायद्याचे उल्लंघन होते असे सांगून झिंजियांग, हेनान, हेबेई आणि गुइझो प्रांतातील अनेक क्रॉस काढले गेले.
कोणत्याही बिल्डिंगच्या किंवा घराच्या दर्शनी भागात क्रॉस चालू शकेल पण छतावर लावण्यास बंदी घालण्यात आली. दर्शनी भागाच्या एक दशांश पेक्षा जास्त आकाराचा क्रॉस नियमात बसत नाही. २०१४ मध्ये तर झिंजियांग अधिकाऱ्यांनी चीनचे जेरूसलेम म्हणून ओळखल्या जाणार्या व्हेन्झू शहराला लक्ष्य केले कारण त्या प्रांतातील चर्चची संख्या चार हजाराच्यावर आहे.
- प्राची चितळे जोशी.
( ICRR Media Monitoring Desk )
Source : opindia
China launches ‘crusade’ against Christianity, begins to remove crosses from churches across the country