कोरोना व्हायरस वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरल्याची खात्री पटली?
         Date: 08-Apr-2020

कोरोना व्हायरस वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरल्याची खात्री पटली?

 

सरकारचे म्हणणे आहे की आमच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनांमधून अजूनही हेच दिसून येतेय की हा प्राणघातक विषाणू वुहानमधील लॅब मधून संक्रमित झाला नसून वुहान मधील सजीव प्राणी मार्केट मधून संक्रमित झाला आहे. यापुढे तो वुहानच्या लॅब मधून संक्रमित झाल्याचे ऐकून घेतले जाणार नाही.

 

बोरिस जॉनसन यांच्या इमर्जन्सी कमिटी कोब्रा च्या एका सदस्याने सांगितले की नुकत्याच संशोधनानुसार हा व्हायरस 'झुनोटिक' आहे असे मानले तरी तो आधी वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच मानवामध्ये पसरलाय हे नक्की. ह्या व्हायरसची सगळी लक्षणं प्राण्यांकडे निर्देश करत असली तरी वुहानमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. वरवर पाहता हा प्राण्यामुळेच होऊ शकतो असे असले तरी आणि हा व्हायरस झुनोटिकच दिसत असला तरी वुहानमधील लॅबला या संशयाचा फायदा नक्कीच मिळता नये.

 

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुख्यात अश्या सजीव प्राण्यांच्या मार्केट पासून १० मैलावर आहे. ही लॅब जगातील सर्वात सुरक्षित व्हायरलॉजी लॅब आहे. ही लॅब एवढी अद्ययावत आहे की अतिशय प्राणघातक असलेल्या इबोला च्या सूक्ष्म विषाणूंवर येथे सक्षमपणे प्रयोग होऊ शकतात. इथल्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा असे सांगितले की वटवाघळापासून याचे संक्रमण झाले. ९६%  वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळतो.

 
wuhan scientist _1 &

 

इतकी कडेकोट सुरक्षेची काळजी घेऊनही इथल्या स्थानिक अहवालानुसार त्यांचं म्हणणं आहे की लॅब मध्ये काम करणाऱ्या कामगार किंवा शास्त्रज्ञांच्या रक्तामधून हा रोग संक्रमित झाला आणि पुढे हे लोक स्थानिक बाजारात गेले आणि तिथल्या लोकांना पण याचा संसर्ग झाला. काही विवाद असे आहेत की वुहान मध्ये असलेल्या वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या दुसऱ्या लॅबने कदाचित वटवाघळांमध्ये हा रोग कश्या प्रकारे संक्रमित होतो याच्यावर संशोधन केले असावे आणि या संशोधनातून या लॅब मधूनही  हा व्हायरस प्राण्यांच्या मार्केट मध्ये पसरलेला असू शकतो कारण ही लॅब या मार्केट पासून केवळ ३ मैलांवर आहे.

 

न्यू जर्सीच्या रटजर्स युनिव्हर्सिटीच्या वॅक्समन इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजीचे अमेरिकन जैव-सुरक्षा तज्ञ प्रोफेसर रिचर्ड एब्राइट यांनी म्हटले आहे पुरावे असे सांगतात की कोविद-१९ हा वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला नाही. परंतु असेही होऊ शकते की या प्रयोगशाळेत त्याचे विश्लेषण करीत असताना तो तिथून लीक होऊन सगळीकडे संक्रमित झाला असेल. ते पुढे असेही म्हणाले," या व्हायरसचे विश्लेषण करताना ते सुरक्षेच्या लेव्हल-४ वर करावे. परंतु या शास्त्रज्ञांनी ती केवळ लेव्हल-२ वर केली. याचाच अर्थ त्यांनी ही चाचणी अथवा विश्लेषण करताना जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही आणि अतिशय निष्काळजीपणे हा विषाणू हाताळला. त्यामुळे यावर काम करणाऱ्या लोकांच्यात तो संक्रमित झाला. व्हायरसचे संकलन, त्याचा स्वभाव, विलगीकरण किंवा जनावरांच्या संसर्गामुळे प्रयोगशाळेतील एखाद्या कामगाराला संसर्गाचा मोठा धोका उद्भवू शकतो आणि त्यानंतर इतर कामगारांना आणि नंतर जनतेला याचा धोका असतो."

 

"पुरावे सांगतायत की हा व्हायरस मुद्दामहून प्रयोगशाळेत मानवातर्फे तयार करण्यात आलेला नाही तर विश्लेषण करताना अपघाताने सगळीकडे पसरलाय हे नक्की." प्रोफेसर रिचर्ड एब्राइट यांनी असा निष्कर्ष काढला आहे.

 

साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या अहवालात कोविद-१९ चा उगम वुहान लॅब मध्ये झाला असे म्हटले होते. हा अहवाल सोशल नेटवर्किंग साईट वर प्रकाशित झाल्याच्या काही काळातच तिथून हटविण्यात आला.

 

जानेवारी मध्ये सजीव प्राणी मार्केट बंद झाल्यानंतर बीजिंग न्यूजने व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमधील  संशोधक हुआंग यांलिंग याना 'पेशंट झिरो' म्हटले होते. पेशंट झिरो म्हणजे या व्हायरसमुळे संसर्ग झालेला पहिला रुग्ण.

 

लॅब ने हा दावा ' खोटी माहिती' म्हणून उडवून लावला. एवढेच नाही तर संशोधक हुआंग २०१५ मध्येच लॅब सोडून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची तब्बेत उत्तम असून त्यांना कोविद-१९ चा संसर्ग झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

बॅट्रेलटेड व्हायरसवर संशोधन करणाऱ्या अग्रगण्य संशोधक शी झेंगली यांनी स्वतःच्या जीवनाची हमी देऊन सांगितले की हा व्हायरस लॅब ने निर्माण केलेला नाही.

 

२००४ मध्ये चिनी लॅबोरेटरी मधून लीक झाल्यामुळे सार्स या रोगाचा उद्रेक झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि नऊ जणांना संसर्ग झाला. निष्काळजीपणामुळे याचा विषाणू लीक झाला आणि त्यापायी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्याचे चिनी सरकारने सांगितले.

 

हा व्हायरस चिनी प्रयोगशाळेतून पसरला असल्याचे आरोप अमान्य असल्याचे डाउनिंग स्ट्रीटचे म्हणणे आहे.

 

" जग सध्या जे अनुभवत आहे ते एक जागतिक संकट आहे. ते कुठून उद्भवले ते अनिश्चित आहे. आपले लक्ष रोगनिवारणाकडे असावे. आणि आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणाला संबोधित करणारी भाषा टाळली पाहिजे."  असे डब्ल्यूएचओ वारंवार सांगत आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : dailymail

 

Did coronavirus leak from a research lab in Wuhan?