भारताचे सायकॉलॉजीकल वॉरफेयर
         Date: 06-Sep-2019

भारताचे सायकॉलॉजीकल वॉरफेयर

(Intelligence & Counter Intelligence)

पाकची ब्रिगेड तैनाती आणि भारतीय आक्रमक प्रचारतंत्र

नियंत्रण रेषेच्या पलीकडे काल पाकिस्तानी सैन्याने बाघ आणि कोटली सेक्टर्समध्ये एक ब्रिगेड तैनात केली (साधारण २००० सैनिक). ही तैनाती भारतीय चौक्यांपासून साधारण ३० किमी अंतरावर आहे. सध्याची दोन देशातील तणावाची स्थिती बघता यात नवीन काहीही नाही.

मग आश्चर्यकारक काय?

पाकिस्तानने ही ब्रिगेड तैनात केल्या केल्या ही माहिती व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट असलेल्या आणि मिडीया जगतात अत्यंत खात्रीशीर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या एका भारतीय पत्रकाराने ट्विट केली. याचे मनोवैज्ञानिक परिणाम खुप मोठे आहेत. ते कसे ते पाहु.

Pakistan Army has moved an entire brigade to the Bagh and Kotli sector near Poonch of Pakistan Occupied Kashmir, as per Sources. Indian Army closely monitoring the movement of these more than 2000 troops who have come from a peace station in Pakistan towards LoC in PoK. (1/n) https://twitter.com/AdityaRajKaul/status/1169605454873399302?s=17

कुणीतरी बघतंय!

सैनिकी हालचाली गुप्त राहणं हे भविष्यातील यशाचं गमक असतं. अशाप्रकारे तैनाती झाल्या झाल्या शत्रूने यासंदर्भात जाहीर ओरडणे यामुळे एक मानसिक धक्का बसतो. भारतीय सेना, इस्रोचे मिलिटरी सरविलन्स उपग्रह, मित्र राष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणा आपल्या हालचाली टिपतंय ही भावना भीतीदायक आहे. याशिवाय याचे दुष्परिणाम मोठे आहेत.

खोईरत्ता हवाई हल्ला!

गेल्या आठवड्यात नियंत्रण रेषेवरील खोईरत्ता सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यावर भारतीय विमानांनी हवाई हल्ला केल्याची बातमी सोशल मीडियावर आली, याची मोठी बातमी झाली नाही पण पाकिस्तानी सोशल मीडियावर याची 'जबरदस्त भारतीय शेलिंग' अशी चर्चा होती. ही ब्रिगेड साईज फोर्स डिप्लोयमेंट येणाऱ्या काळात अशाच एखाद्या भारतीय हवाई हल्ल्याची शिकार होऊ शकते. ही तैनाती भारतीय चौक्यांपासून फक्त ३० किमीवर असल्याने भारतीय विमानांना भारतीय वायूसीमा पार नं करता असे हल्ले करणं शक्य आहे. यात पाकिस्तानी सैनिकांचं मनोबल तोडणं आणि अंदाधुंदी पसरवणं हे उद्देश असु शकतील.

सायवॉर तंत्र

बालाकोट नंतर पाकिस्तानने भारतावर सायकॉलॉजीकल युद्धात कुरघोडी केली, ती चुक भारत आता सुधारताना दिसत आहे हाच याचा अर्थ.