Date: 11-Aug-2019 |
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतंय.
काही फोटोवरून आपल्या लक्षात येईल की कलम ३७० च्या निर्णयानंतर पाकिस्तान काहीतरी भयंकर करण्याच्या तयारीत आहे.
काश्मीर प्रश्न सतत खदखदत ठेवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा याकडे वळविण्यासाठी पाकिस्तान काहीतरी भयंकर करेल. पाकिस्तानचे लाडके पंतप्रधान आणि लष्कर यांची झालेली मानहानी भरून काढण्यासाठी आणि काहीतरी करून देशांतर्गत असंतोषाला चुचकारण्यासाठी पाकिस्तान नक्कीच काहीतरी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे हे आपल्या सॅटेलाईट ने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे आपण सहज बघू शकतोय. यासाठी सॅटेलाईट बेस्ड ओपन सोर्स इंटेलिजन्स ( ओएसआयएनटी) चे आभार मानावे तितके थोडे आहेत. खालील तीन छायाचित्रे बघता आपल्या लक्षात येईल की कराची, ओरमारा आणि ग्वादार या तीन मोठ्या नौदल बंदरामध्ये पाकिस्तानी सैन्य तयार आहे.
वरील छायाचित्रात ओरमारा येथील जिन्ना नौदल तळ आता पूर्णपणे रिकामा दिसतोय. उजवीकडील छायाचित्रात ग्वादार बंदर सुद्धा पूर्ण रिकामे दिसून येतेय आणि डावीकडील कराची बंदरावर फक्त ३ शिप आहेत. आत या ३ छायाचित्रांची तुलना शांती काळातील छायाचित्रांशी करून पाहू. गेल्या महिन्यात घेतलेल्या छायाचित्रात हीच तिन्ही बंदरे नौदलाच्या जहाजांनी भरलेली होती. त्यांच्या राखाडी रंगामुळे ती सहज ओळखली जात आहेत.
एवढेच नाही तर चकलाला, रावळपिंडी येथील नियंत्रण रेषेजवळील C- 130 हा लष्करी विमानतळ देखील रिकामे करण्यात आले आहे. ही चिंताजनक बाब आहे. काश्मीर मध्ये काहीतरी भयंकर घडण्याची भीती एका ऑनलाईन मेसेजिंग ग्रुप वर आली असता ४ ऑगस्ट रोजी घेतलेल्या छायाचित्रात खरोखर काहीतरी घडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. उजवीकडील छायाचित्र हे शांतता काळात घेतले गेले आहे. आणि डावीकडील ४ दिवसापूर्वीचे आहे.
खालील छायाचित्र या शुक्रवारी घेतले असून त्यात स्पष्ट दिसून येतेय की C-130 हा एकदम काहीतरी करण्याच्या तयारीत आहे.
गुरुवारी पुन्हा एकदा ओएसआयएनटीने नवीन छायाचित्रे घेऊन आपले पाळत ठेवण्याचे काम चोख बजावले. पाकिस्तानी विमाने मोठ्या प्रमाणात त्या भागात गस्त घालीत असल्याचे निदर्शनास आले. पाकिस्तानी लढाऊ विमाने एरियल रिफ्युएल सोबत घेऊन एका ठराविक पद्धतीने उड्डाण करीत असल्याचे दिसून आले. नक्कीच हे 7- PAF या पाच लढाऊ विमानाच्या मदतीकरिता असेल ज्याने दोन दिवसापूर्वी अचानक गस्त घालायला सुरुवात केली आहे.
या सर्व हालचाली टिपण्यासाठी ऑनलाईन मेसेंजर ग्रुपचे खूप मोठे सहकार्य लाभत आहे. मी पाकिस्तानी लष्कराने चालविलेल्या दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या लोकांच्या ऑनलाईन मेसेंजर गटांच्या संपर्कात असल्याने मला त्यांच्याकडून टिप्स मिळतात. ५ ऑगस्ट च्या रात्रीपर्यंत हे मेसेजेस अत्यंत जहाल आणि पाकिस्तानी सरकारला खूप दूषणं देणारे होते. आणि ६ ऑगस्टच्या सकाळी मात्र त्यांच्या रागाची जागा अत्यंत संतापाने घेतली. पाकिस्तान सरकारने काहीतरी करावं यासाठी त्यांच्यावर लोकांचा दबाव वाढू लागला.
या सॅटेलाईट इमेजेस आणि मेसेजेस यांचा एकत्र संबंध जोडला तर खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतो.
काश्मीरमध्ये दिसणारी लष्करी हालचाल ही वरवरची आहे, वस्तुस्थिती अशी काही की पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात घुसखोरी करणं अशक्य आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे त्यामुळे पाकिस्तान काहीही करून आंतरराष्ट्रीय समुदायाला यात लक्ष घालण्यासाठी विवश करण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान आपल्या स्थानिक एजंटना लोकांचा भडकविण्यास सांगत आहे. त्यांना रस्त्यावर उतरून दंगे करण्यास सांगत आहे. "रस्त्यावर उतरा आणि मरा' असं तेथील लोकांना सांगण्यात येत आहे. जेणेकरून मानवाधिकाराची ढाल पुढे करून यूएन आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यांच्यात मध्यस्थी करेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या मानवी संहारामुळे मानवतावाद्यांना यात हस्तक्षेप करावाच लागेल आणि या निमित्ताने पाकिस्तानला दिलासा मिळून सैन्याची जमवाजमव करता येईल. आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तान काहीही करेल. अशाप्रकारच्या मेसेजेसना खूप गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
पाकिस्तानी पे रोलवर ट्विटर अकाउंट हाताळणारा झैद जमान हमीद आणि इतरांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या कत्तलीच्या खोट्या कहाण्या पसरविण्यास सुरुवात केलीच आहे. 250 लोक मृत्युमुखी पडले असल्याचा कोणताही पुरावा नसताना ट्विटर वर तो दावा करतो.
भारताने कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये हाच या लेखाचा उद्देश आहे.
तसेच पाकिस्तान भारताविरूद्ध लगेच युद्ध छेडणार आहे असंही मला म्हणायचं नाहीये. एवढ्या लवकर पाकिस्तान समोरासमोर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे.
काश्मीरमध्ये ३७० हटवल्यानंतर घेतलेल्या छायाचित्रात पाकिस्तानने केलेली लष्कराची आणि नौदलाची तयारी दिसत आहे. याचा उद्देश फक्त भारताला घाबरविणे एवढाच आहे. असे करून आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधून घेण्याची त्यांची ही धडपड आहे.
अभिजीत अय्यर- मित्रा यांच्या लेखाचा अनुवाद.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: ThePrint
These images show Pakistan is planning something sinister after India’s Article 370 move.