Date: 05-Jul-2019 |
अरबांशी इराणसंदर्भात शांतीवार्ता करण्याची एक संधी इस्राएलच्या स्पायमस्टरला दिसली आहे.
इस्राएल आणि युएसपाठिंबा असलेल्या अरब देशांना इराणसंदर्भातील समस्यांविषयी एकमेकांशी चर्चा करण्याची एक संधी नक्कीच आहे असे इस्राएलच्या मोसाद या गुप्तहेरसंघटनेच्या प्रमुखाने म्हटले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमात क्वचितच दिसणाऱ्या मोसाद च्या प्रमुखांनी, जोसेफ (योस्सी) कोहेन यांनी त्या प्रदेशात शांतता नांदण्याकरिता म्हणून एका टास्क फोर्स ची निर्मिती केली असल्याचे जाहीर केले. त्या प्रदेशात इजिप्त आणि जॉर्डन सोडल्यास बाकी कुठल्याही अरब देशांशी इस्राएलचे राजनैतिक संबंध नाहीत.
"मध्य पूर्वेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की या प्रांतात शांतता नांदण्यासाठी येथील समाजपद्धतीवर भाष्य करण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी मोसाद स्वतःहून या देशांना शांतता चर्चेची संधी देत आहे," असे तेल अवीव येथील हॅर्जलिया कॉन्फरन्स (वार्षिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंच परिषद ) मध्ये बोलताना त्यांनी सांगितले.
"सामायिक उद्दिष्टे, इराण आणि जिहादी दहशतवादासारख्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढा, व्हाईट हाऊसशी असलेले घनिष्ठ संबंध आणि क्रेमलिनशी वार्तालाप करण्याची माध्यमे या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणून मोसाद एक संधी देत आहे," असे त्यांनी सांगितले.
इस्राएलशी शांती वार्ता करण्याच्या दृष्टीने काहीतरी मदत होऊ शकेल म्हणून अमेरिकेने गेल्या आठवड्यात बहारीनमध्ये अरब आणि इतर देशांना बोलावून पॅलेस्टाईन अर्थव्यवस्थेला उचलून धरण्याकरिता तेथे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते.
एकसंध राष्ट्र असण्याच्या बाबतीत ट्रम्प प्रशासन इस्राएल विरोधी असल्याचेच पॅलेस्टाईनच्या निदर्शनास आले आहे. एवढेच नाही तर इस्राएल विरोधात अमेरिका काहीतरी डावपेच आखून त्यांचे एकसंध राष्ट्राचे स्वप्न हाणून पाडण्याच्याच विचारात असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने पॅलेस्टाईनने मनामा येथील बैठकीवर बहिष्कार घातला होता. इस्राएलने आपला अनधिकृत प्रतिनिधी पाठवला होता जेणेकरून त्यांना अरब राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची काहीतरी संधी प्राप्त करता येईल.
इस्राएल ला सशस्त्र गटांकडून असलेल्या धोक्याकडे निर्देश करणे एवढाच हेतू कोहेन यांच्या भाषणाचा होता."इराणच्या दमदाटीच्या वर्तणुकीला बरेचसे अरब देश सहन करू शकत नाहीत" असे ते म्हणाले.
त्यांनी न्यूक्लियर प्रोग्रॅम, लेबनॉन, सीरिया, येमेन आणि इतर ठिकाणी केलेले छुपे हल्ले, गल्फ मधील तेलाच्या टँकरवर केलेला जोरदार हल्ला अश्या प्रकारचे आरोप इराणवर केले. इराणने मात्र हे सगळे आरोप धुडकावून लावले.
कोहेन यांनी इस्राएल-ओमान यांच्या सौहार्दपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. गेल्या ऑक्टोबर मध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ओमानला मोसादच्या प्रयत्नांमुळेच भेट दिली असे सांगून त्यांचे आणि इस्राएलचे निकटचे संबंध असल्याचे सांगितले.
" जबाबदार आणि शांततेसाठी गंभीरपणे विचार करणाऱ्या देशांचा एक गट " ज्यामध्ये ज्यांच्याशी औपचारिक संबंध नाहीत अश्या देशांनाही सामावून घेण्याचा आणि सर्वतोपरी सहकार्य देण्याचे त्यांनी सांगितले.
इस्राएलचे परराष्ट्र मंत्री इस्राएल कात्झ यांनी अबुधाबी येथे द्विपक्षीय संबंध तसेच इराणियन धोक्यांवरील चर्चा करण्यासाठी एका अनामिक इमिराती अधिकाऱ्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
" मोसाद किंवा इस्राईलने न्यूक्लियर डील वर स्वाक्षरी केली नाही आणि जर इराण न्यूक्लियर शस्त्रे बाळगण्याची स्वप्ने पहात असेल तर इस्राएल त्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही ," असे कोहेन यांनी निक्षून सांगितले. इराणने न्यूक्लियर बॉम्ब बाळगल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: reuters
Israeli spymaster sees 'one-time' chance for peace with Arabs sharing Iran worries.