Date: 11-Apr-2019 |
पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींमुळे भारताने २४ सिहॉक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यास दिली मंजुरी.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीत सतत वाढच होत आहे. हे पाहता यूएस ने भारताच्या एमएच -६० आर सीहॉक मल्टी-मिशन हेलिकॉप्टरच्या खरेदीची विनंती मंजूर केली आहे. भारत आता २४ हेलिकॉप्टर्स खरेदी करेल.
डिफेन्स सिक्योरिटी कोऑपरेशन एजन्सीने या मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार ही विक्री अंदाजे २.६ बिलियन डॉलर्स किमतीची आहे.
"या हेलिकॉप्टरमुळे भारत जमिनीवरील आणि पाण्यातील युद्धाचा सामना करू शकेल. तसेच या युद्धाच्या मिशन सोबतच दुसरी मिशन्स जसे की व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट, शोधकार्य, बचावकार्य आणि संदेशवहन यातही भारत स्वयंपूर्ण होईल. या वाढीव क्षमतेचा वापर भारताला प्रादेशिक धोक्यांना प्रतिबंध करण्यास आणि आपल्या मायभूमीला बळकट करण्यास करता येईल."
सहा आठवडे भारत आणि त्याच्या शेजारी देश यांच्यात चाललेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे ही अनाउन्समेंट करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये १४ दहशतवादी हल्ल्यांमध्ये ४० भारतीय सैनिक ठार झाल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतल्यानंतर भारताने पाकिस्तानला दहशतवाद्यांना या हल्ल्यात पाठीशी घालण्याबद्दल दोषी ठरविले.
या हल्ल्याला एक आठवडा होत नाही तोच भारताच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केले. त्यानंतर पाकिस्तान ने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांच्या एफ-१६ या विमानाने भारताचे जेट पाडले. यामध्ये पकडलेल्या भारतीय वैमानिकाला एका दिवसानंतर पाकिस्तानला सुरक्षित सोडावे लागले. या घटनेने या दोन देशांमध्ये युद्ध सुरु होते की काय अशी भीती जगाला वाटू लागली. हळूहळू परिस्थिती निवळली असली तरी भारतातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर याचा ताण असणारच आहे. त्यात गेल्या आठवड्यात भारताने अँटी-सॅटेलाईट चाचणी केल्याने तणाव पुन्हा निर्माण झाला आहे.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या ऑगस्टमध्ये २४ हेलीकॉप्टर खरेदी करण्याचे जाहीर केले. सीहॉक हे यूएच -६० ब्लॅक हॉक हेलीकॉप्टरचाच एक किंचित वेगळा असा प्रकार आहे. पाकिस्तानने त्यांचे नौदल विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे.
या २४ हेलिकॉप्टर व्यतिरिक्त, ३० एपीएस -१५३ (व्ही) मल्टी-मोड रडार्स, ६० टी ७०० -जीई -४०१ सी इंजिन्स, २४ एअरबोर्न लो फ्रिक्वेन्सी सिस्टम (एएलएफएस), १००० एएन / एसएसक्यू- ३६/५३/६२ सोनोबॉयस, १० एजीएम - ११४ हेलफायर मिसाइल; ३८ ऍडव्हान्सड प्रेसिजन किल वेपन्स सिस्टम (एपीकेडब्ल्यूएस) रॉकेट; ७० एएन / एव्हीएस-९ नाइट व्हिजन डिव्हाइसेस आणि रडार्स व इतर भागांचे वर्गीकरण देखील आहे.
डीएससीए अधिसूचना अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या किमतीवर आणि संख्येवर काँग्रेसमध्ये वाटाघाटी होऊन त्या बदलू शकतात. या प्रक्रियेदरम्यान सततच्या बदलणाऱ्या परिस्थितीमुळे आणि नाटकांमुळे भारतीय संरक्षण विभागाच्या या प्रयत्नांविषयी कंत्राटदारांमध्ये चलबिचल वाढली आहे. परंतु हा करार पूर्ण झालाच पाहिजे. न्यूयॉर्कमधील लॉकहीड मार्टिनचे रोटरी आणि मिशन सिस्टम युनिट हे प्राथमिक कंत्राटदार असतील.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: DefenseNews
Amidst tensions with Pakistan, India cleared to buy 24 Seahawk helicopters.