Date: 04-Feb-2019 |
चीन आणि पाकिस्तानच्या मदतीने सौदी अरेबिया मिसाईल प्रोग्रॅम ठरवित आहे- यूएस तज्ज्ञ.
गेल्या आठवड्यात, द वॉशिंग्टन पोस्ट ने सौदी अरेबिया त्यांचा पहिला बॅलिस्टिक मिसाईलचे उत्पादन करण्याचा कारखाना उभारत आहे असे वृत्त प्रसिद्ध केले.
अमेरिकन कंपनी प्लॅनेट लॅब्स इंक यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा आणि मिडलबरी इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज इन मोंटेरे यांनी या प्रतिमांचे विश्लेषण करून या कारखान्याचे ठिकाण शोधून काढले आहे. हा कारखाना अल-वाताह या शहराजवळील विद्यमान मिसाईल बेसवरच आहे.
अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिटयूट येथे बोलताना पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अरब अभ्यासक मायकेल रुबीन म्हणाले की," शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरु झाली आहे. वॉशिंग्टनची व्हाइप्लाश पॉलिसी बदलल्याने त्याचे परिणाम रियाध वर झाले आहेत. या पॉलिसीमुळे सौदी अधिकारी व्हाईट हाऊसच्या दबावाखाली येणार नाहीत. ते यापुढे स्वतःच स्वतःचे निर्णय घेतील असे त्यांच्या कृतीतून वॉशिंग्टनला दाखवू लागले आहेत. "
मिसाईल तज्ज्ञ जेफ्री लुईस याने याबद्दल बोलताना," मिसाईल्स मधील मोठ्या प्रमाणात असलेली गुंतवणूक ही पुढे अण्वस्त्रांमध्ये बदलते. तेव्हा मला काळजी वाटतेय की आपण सौदीच्या महत्त्वाकांक्षेला कमी लेखून चालणार नाही."
याशिवाय, सीआयएचे माजी अधिकारी आणि पर्शियन गल्फ घडामोडींचे अभ्यासक ब्रूस रिडेल म्हणतात की," क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या सत्तेत येण्याच्या सुरुवातीच्या काळात असलेले वॉशिंग्टनसोबतचे संबंध आता जरा दुरावल्यानंतर सौदी मिसाईल कारखान्याचे बांधकाम सुरु झाले आहे. याचा अर्थ वॉशिंग्टनच्या इच्छा आणि धोरणे आम्ही धाब्यावर बसवितो हेच त्यांना या कृतीतून दाखवायचे आहे.
सौदीने यापूर्वी सुद्धा मिसाईल प्रोग्रॅम सुरु केला होता. १९८८ मध्ये सौदीच्या गुप्त स्ट्रॅटेजिक रॉकेट फोर्सेस (एसआरएफ) च्या साहाय्याने त्यांनी चीनकडून डी ३-एफ सिल्कवर्म बॅलिस्टिक मिसाईल्सची खरेदी केली होती.
नाव न सांगण्याच्या अटीवर पेंटागॉनच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की एसआरएफ चे कार्य चीनच्या सहयोगाने चालते. पाकिस्तानचे चीन आणि सौदी दोघांसोबत घनिष्ट संबंध आहेत. सौदी सुरक्षा संस्थांबरोबर पाकिस्तानचे असंख्य सल्लागार काम करीत आहेत. आता या कार्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे हे उघड झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी रियाधच्या मिसाईल बेसला बीजिंग मदत करीत असल्याचे फेटाळून लावले आहे.
सौदी अरेबियाच्या या मिसाईल प्रोग्रॅम मुळे अमेरिका आणि रियाधचे संबंध अजूनच गुंतागुंतीचे होणार आहेत. येमेनशी युद्ध छेडल्यामुळे अगोदरच अमेरिका सौदीवर भडकली आहे आणि त्यात ऑक्टोबर २०१८ मध्ये सौदी पत्रकार जमाल खाशोग्गी यांच्या हत्येत असलेल्या सौदीच्या सहभागामुळे अजूनच भर पडली आहे.
गेल्या नोव्हेंबर मध्ये रियाधमधील किंग अब्दुलअझीझ सिटी फॉर सायन्स अँड टेकनॉलॉजीच्या भेटीदरम्यान बिन सलमान यांनी राज्याच्या पहिल्या परमाणु संशोधन रिएॅक्टरची पायाभरणी केली.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: albawaba News
Saudi Arabia Pursuing Missile Program With China, Pakistan Help - US Experts Say.