Date: 31-Jan-2019 |
भारतीय जहाजाचे छाबहारमध्ये अधिकृतपणे आगमन.
छाबहार बंदरामार्गे भारताशी व्यापार करण्यास अफगाणिस्तान सज्ज. इराणच्या रस्ते आणि शहरी विकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार येत्या एक महिन्याच्या आत अफगाणिस्तान भारतात छाबहारमार्गे ५ कंटेनर असलेले एक कार्गो शिप पाठविण्याची तयारी करीत आहे.
कार्गोमध्ये मूग बीन्स असतील आणि प्रत्येक कंटेनरची वजन २२ टन असेल. कार्गोचे वितरण आंतरराष्ट्रीय मार्ग परिवहन (टीआयआर) अंतर्गत केले जाईल.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय आणि वाहतूक मंत्रालयाच्या मते अफगाणिस्तान तर्फे भारतात पाठविण्यात येणारे हे कार्गो सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पाठविण्यात येईल. अशी माहिती इराण मंत्रालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, भारताने अधिकृतरीत्या छाबहार बंदरात शिपिंग लाईन स्थापन केल्या आहेत. अश्याप्रकारचे पहिलेच जहाज या रविवारी छाबहार बंदरात पोचेल अशी अधिकृत घोषणा इराण पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली.
दर दोन आठवडयांनी मुंबई, कांडला आणि मुंद्रा या तीन भारतीय बंदरातून यापुढे नियमितपणे इराणच्या बंदरात जहाजे जातील. मुंबई-मुंद्रा-कांडला हा सागरी मार्ग ३७००टीईयू या कंटेनरच्या छाबहार बंदरातील प्रवेशासाठी पहिल्यांदा खुला करण्यात आल्याची माहिती सीस्तान-बलुचिस्तान बंदरे आणि सागरी प्रदेश संस्थेचे संचालक बेहरोज अंकाई यांनी दिली.
भारताने या बंदराचे कामकाज हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच वेगाने हालचाली झाल्या. ३० डिसेंबर ला ७२४५८ एमटी कार्गो या सायप्रस निंदणीकृत मोठ्या जहाजाच्या आगमनाने या बंदराच्या अधिकृत व्यावसायिक उपयोगाला सुरुवात झाली. स्वतःच्या देशाच्या बाहेर भारताने प्रथमच एक अख्खे बंदर चालवायला घेतले आहे.
अफगाणिस्तान, सेंट्रल एशिया आणि उत्तर-दक्षिण कॉरिडॉरला मुंबई आणि माॅस्कोशी जोडण्यासाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. संपूर्णपणे जमिनीनेच वेढलेल्या अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी हे बंदर खूप उपयुक्त आहे. तसंही २०१७ मध्ये अफगाणिस्तान आणि भारत एकमेकांशी हवाई मार्गे जोडले गेले आहेतच.
उझबेकिस्तानला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडू शकणारे कोणतेही प्रकल्प असतील तर आम्ही त्याचा नक्कीच सकारात्मकदृष्ट्या विचार करू. छाबहार सारख्या प्रकल्पामुळे सेंट्रल एशियाला फार चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. असे उद्गार भारतातील उझबेक राजदूत फरहोद अरजीव्ह यांनी काढले.
-प्राची चितळे जोशी.
(ICRR Media Monitoring Desk)
Source: DNA
It’s official: Country has shipping lines to Chabahar.