चीनने माजी सैनिकांना केले अटक.
         Date: 27-Jan-2019

चीनने माजी सैनिकांना केले अटक.

 

गेल्या वर्षी लष्कराच्या सैनिकांविरुद्ध उठाव केल्याच्या आरोपाखाली चीन सरकारने १९ माजी सैनिकांना अटक केल्याचा हुकूम शुक्रवारी काढला.

 

ऑक्टोबर मध्ये पिंगडू या चीनच्या पूर्वेकडील शहरात आणि गेल्या वर्षी जून मध्ये जिंजियांग शहरात "जाणूनबुजून केलेल्या हल्ल्याचा" आणि " गर्दी गोळा करून शहरातील जनजीवन विस्कळीत करण्याचा" आरोप या १९ लोकांवर लावण्यात आला.

 

निवृत्तीनंतर चांगले पेन्शन मिळावे यासाठी वयस्कर माजी सैनिकांनी जो मोर्चा काढला होता तो मोर्चा मोडून काढण्यासाठी चिनी सैनिकांनी त्यांना जी मारहाण केली त्या मारहाणीचा विरोध करण्यासाठी म्हणून जिंजियांग मध्ये पुन्हा मोर्चा काढण्यात आला होता असे समजते.


 

 

अवाढव्य लष्कर बाळगणाऱ्या चीनच्या माजी सैनिकांमध्ये आपल्याच सरकारविरुद्ध जी असंतोषाची आग धुमसत होती त्याचंच हे प्रात्यक्षिक होतं. अनेक वर्ष आपल्याला पेन्शन अथवा काही आर्थिक मदत मिळावी यासाठी जो लढा चालू आहे त्याचा परिणाम म्हणून जी निदर्शने चालू आहेत ती जिनपिंग सरकारची एक मोठी डोकेदुखीच बनली आहे.
 

चीनमधील अधिकाऱ्यांच्या मनात लोकांविषयी थोडी सहानुभूती आहे. परंतु येथे पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्याच्या सैनिकांबद्दल त्यांना निष्ठा आहे.

 

जिंजियांग मधील हा लढा पोलिसांचा हस्तक्षेप होईपर्यंत बरेसचे दिवस चालूच राहिला. यातील नऊ लोकांवर बेकायदेशीरपणे जवळपास १००० लोकांना सरकारविरुद्ध भडकविणे, त्यांना सरकारविरुद्ध एकत्र गोळा करणे आणि पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध हिंसक कारवाया करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत अशी शिन्हुआ यांनी माहिती दिली.

 

पिंगडू मध्ये १० माजी सैनिकांनी निषेध म्हणून पोलिसांवर हल्ला केला, कारची तोडफोड केली आणि सरकारी कामात अडथळा आणला असे शिन्हुआ यांनी सांगितले.

 

जे जे सरकारी कर्मचारी या लोकांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळवून देत नव्हते त्या त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने माजी सैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे.

 

बीजिंगमध्ये २०१६ मध्ये अश्याप्रकारच्या मोर्चाला संबोधून चीनच्या संरक्षण मंत्रालयाने यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या जातील असे त्यांना आश्वासन दिले होते. १९८० पासून चीनने जवळपास लाखो सैनिकांना निवृत्त केले आणि गेल्या वर्षी तर २ मिलियन सैनिकांना जबरदस्तीने रजा देण्यात आली होती.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: DAWN

China to arrest 19 over military veteran protests: state media.