पाकिस्तानी फुटीरतावाद्यांचे लक्ष्य - चीनचा बेल्ट अँड रोड प्रकल्प.
         Date: 10-Jan-2019

 पाकिस्तानी फुटीरतावाद्यांचे लक्ष्य - चीनचा बेल्ट अँड रोड प्रकल्प.

 

दोन आठवड्यांपूर्वी फुटीरतावाद्यांच्या कमांडरच्या हत्येनंतरही नैऋत्य पाकिस्तानातील फुटीरतावाद्यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पावर हल्ले चालू ठेवण्याची जणू काही शपथच घेतली आहे.

 

 

बलोच लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितले की," आम्ही आमच्या मृत कमांडर अस्लम बलोच याच्या मार्गावरच मार्गक्रमण करीत राहणार आहोत. जोपर्यंत चीन बलोच लोकांचे शोषण थांबवित नाही तोपर्यंत आमची ही लढाई चालूच राहील."

 

 

 

अफगाणिस्तानातील कंदहार येथे बलोच कमांडरला ठार मारले गेले. गेल्या १३ वर्षात झालेला हा भीषण हल्ला होता. या हल्ल्यात या कमांडर सह त्याचे ५ साथीदारही मारले गेले. हा बलोच फुटीरतावाद्यांवर केलेल्या हल्ल्यांपैकी सर्वात विनाशकारी हल्ला होता.
 

हा हल्ल्याची जबाबदारी जरी कोणत्याही गटाने घेतली नसली तरी बलुचिस्तानचे माजी मंत्री सरफराज बुगती यांनी त्याच दिवशी "पाकिस्तानसाठी अत्यंत चांगली बातमी " असे ट्विट केले. तर बीजिंगनेही या बातमीचे स्वागतच केले. "बलुचिस्तान प्रांतातील शांततेसाठी आणि सुरक्षेसाठी ही चांगली घडामोड आहे." असे चीनच्या राजदूतांनी सांगितले.

 

बलोच फुटीरतावाद्यांनी २००४ आणि २००६ मध्ये चीनवर खूप घातक हल्ले केले आणि मागील वर्षी एका अज्ञात इसमाने कराचीमधील कोस्को शिपिंग लाइन्सच्या चीनी जनरल मॅनेजर ची गोळ्या घालून हत्या केली.

 

ऑगस्ट मध्ये एका बस वर आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यामध्ये सहा लोक जखमी झाले होते त्यातील ३ चिनी इंजिनिअर होते. हा बलुचिस्तान मधील चिनी लोकांना लक्ष्य केलेला पहिला हल्ला होता. हा हल्ला ६२ बिलियन डॉलरच्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर च्या हद्दीत करण्यात आला. महामार्ग, रेल्वे आणि ऊर्जेसारख्या पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणालाच लक्ष्य करण्यात आले. हे सर्व बलुचिस्तानातील प्रकल्प थांबावेत आणि त्यातही बलुचिस्तानातील संसाधनांची चिनी लोकांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी त्यांना दिलेली चेतावणी असल्याची माहिती बीलए ने दिली.

 

आपल्या लीडरच्या मृत्यूनंतरही २०१९ च्या सुरुवातीलाच बलुचिस्तानातील सुरक्षा रक्षकांवर बीलए ने ३ हल्ले केले. १ जानेवारीला ३ फुटीरतावाद्यांनी लोरालाई जिल्ह्यातील छावणीत प्रवेश करून चार सुरक्षाकर्मी मारले. ६ जानेवारीला दोघाजणांनी पिशुन आणि पंजगूर जिल्यातील सुरक्षा दलांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी स्फोटके पेरली आणि ती वाहने उडवून लावली.

 

जरी बीलए ने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली नसली तरीही याची सूत्रे बलोच फुटीरतावाद्यांनी आश्रय घेतलेल्या अफगाणिस्तानातून हलविली गेल्याचे बलुचिस्तान सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बलोच लोकांनी कंदहार मध्ये आश्रय घेतल्याचा संशय इस्लामाबादला आहे.आणि त्यांनी अफगाण सरकारकडे बलोच लपलेल्या ठिकाणाचा तपास करण्याची मागणी केली आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी दिली.

 

वॉशिंग्टनमधील विश्लेषक मलिक सिराज अकबर यांनी सांगितले की, बलोचच्या फुटीरतावाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे हे उघड गुपित आहे. जरी ही गोष्ट बलोच नाकारत असले तरी सर्व जगाला ज्ञात आहे की या लोकांना लपण्यासाठी सर्वात जवळची आणि सुरक्षित जागा ही अफगाणिस्तानच आहे.

 

बलोच लोकांच्या हत्येमुळे बलुचिस्तानातील चिनी लोकांवर होणारे हल्ले थांबतील का हे पाहणे आवश्यक आहे. परंतु यांच्या लीडरच्या हत्येमुळे यांच्या संघटनेची ताकद कमी झाली आहे हे नक्की. त्यामुळे बीआरआय प्रकल्पाला असलेला यांचा धोका नष्ट होईल याची अनेकांना खात्री आहे.

 

" अस्लम बलोच चा मृत्यू हा बलोच फुटीरतावाद्यांवर झालेला मोठा आघात आहे. त्याच्या मुत्यूमुळे आमचे जाळे जरी थोडेसे कमकुवत झाले असले तरी याचा अर्थ असा नाही की बीआरआय प्रकल्पाला असलेला आमच्यापासूनचा धोका नष्ट होईल." अकबर याने सांगितले.

 

पाकिस्तानातील काही भागात चीनने वसाहतवाद पसरविला आहे. आणि आता स्थानिक गोष्टींमध्येही चीन हस्तक्षेप करू लागला आहे जसे की पाकिस्तान सरकार आणि बलोच फुटीरतावादी. जोपर्यंत बलोच आणि पाकिस्तान यामधील हा तिढा सुटत नाही तोपर्यंत चीनला असणारा धोका वाढतच राहील असे वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील स्कूल ऑफ सोशल सायन्सचे प्रमुख दिबेश आनंद म्हणाले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: ASIAN REVIEW

Pakistani separatists vow to target Belt and Road projects.