इराणच्या छाबहार बंदराचा विकास आता भारतातर्फे
         Date: 26-Dec-2018

 इराणच्या छाबहार बंदराचा विकास आता भारतातर्फे-

 

सोमवारी भारताने अधिकृतपणे इराणमधील छाबहार बंदराचा कारभार हाती घेतला आणि अफगाणिस्तानला युद्धमुक्त करण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य असल्याचे तेथील जनतेला दाखवून दिले.

 

भारताच्या या छाबहार बंदर विकसित करण्यामुळे भारतास पाकिस्तानला बाजूला सारून अफगाणिस्तानशी समुद्रीमार्गे दळणवळण करणे सोपे झाले आहे. वॉशिंग्टनने इराणवर जे निर्बंध लादले आहेत त्यातून त्यांनी छाबहार बंदराला वगळल्याने भारताला याचा फायदा झाला आहे.

 

 

 

इराण, अफगाणिस्तान आणि भारताच्या तेहरानमध्ये छाबहार बंदराच्या कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात झालेल्या फॉलो-अप समितीच्या पहिल्या बैठकीत इराणने औपचारिकपणे छाबहार बंदराचा कारभार भारताकडे सोपविला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण) दीपक मित्तल यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. तर इराणचे नेतृत्व पोर्ट्स अँड मॅरीटाइम ऑर्गनायझेशनचे उपमुख्यमंत्री मोहम्मद अली हसनजादे यांनी केले होते.
 

"अफगाणिस्तानला पाठिंबा देण्यासाठी भारताने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे," असे नवी दिल्लीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

इर्ना न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत सिस्तान-बलुचिस्तान पोर्ट्स आणि मॅरीटाइम ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल बेहरोज एक्काई म्हणाले," इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (आयपीजीएल) ने अधिकृतपणे छाबहारमधील शाहिद बेहेष्टी बंदराचा कारभार हाती घेतला आहे. यामध्ये माल चढविणे -उतरविणे, खरेदी-विक्री यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

 

या बैठकीत जकात शुल्क, जकात मंजुरी, रेल ट्रांझिट आणि वाहतूक या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती एक्काई यांनी दिली. या बैठकीमध्ये रस्ते, जकात, आणि परराष्ट्रव्यवहार यामध्ये सुसंगती आणण्यासाठी नियम आणि तरतुदी काय असतील ते ठरविणे यावर विचारविनिमय झाला.

 

जून २०१५ मध्ये छाबहार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये इराणच्या गार्डीयन काउन्सिल ने त्यास मान्यता दिली.

 

मध्य आशियाई देशांसोबतच भारत, इराण आणि अफगाणिस्तानातील व्यापारासाठी छाबहार बंदर हे प्रवेशद्वार आहे.

 

मे २०१५ मध्ये एमओयूने केलेल्या करारानुसार या बंदराच्या विकासाकरिता ईएक्सआयएम बँकेने १५० मिलियन डॉलर्सचे कर्ज देऊ केले आहे. तसेच या बंदराच्या विकासाकरिता जी उपकरणे लागतील त्या उपकरणांच्या खरेदीकरिता अतिरिक्त ८५ मिलियन डॉलर्स देऊ केले आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Defence News India

India takes over operations of Iran’s strategic Chabahar Port, can bypass Pak on way to Afghanistan